संजय राऊत आदित्य ठाकरेंना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत, आणखी एका भाजप नेत्यानं डिवचलं…

नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं चित्र आहे. यावर दरेकर म्हणाले, नारायण राणे सडेतोड बोलतात, ही त्यांची स्टाइल आहे. कधी कधी त्यांचे समर्थन करता येणार नाही. पण संजय राऊत यांचा पहिल्यांदा इतका तोल ढासळेला दिसतोय.

संजय राऊत आदित्य ठाकरेंना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत, आणखी एका भाजप नेत्यानं डिवचलं...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 2:04 PM

भूषण पाटील, कोल्हापूरः संजय राऊत (Sanjay Raut) हे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत.. आता ठाकरे गटाकडे अशी किती शिवसेना शिल्लक आहे, असा सवाल भाजप नेत्याने केला आहे. कोल्हापुरात (Kolhapur) भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना या वक्तव्याने डिवचण्याचा प्रयत्न केलाय. संजय राऊत यांच्या हातात आता काहीच राहिलेलं नाही. शिवसेनेचा कारभार आधीच आदित्य ठाकरेंकडे गेला आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

पुढचा फेब्रुवारी महिना शिंदे सरकार पाहणार नाही, असा दावा पुन्हा एकदा संजय राऊतांनी केलाय. त्यावर प्रवीण दरेकर म्हणाले, सध्याचं सरकार उत्तम पद्धतीने सुरु आहे. शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या क्षमतेने अनेक निर्णय घेतले जातात. पुढची दोन वर्षच काय पुढची 25 वर्षे आम्ही सत्ते राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं चित्र आहे. यावर दरेकर म्हणाले, नारायण राणे सडेतोड बोलतात, ही त्यांची स्टाइल आहे. कधी कधी त्यांचे समर्थन करता येणार नाही. पण संजय राऊत यांचा पहिल्यांदा इतका तोल ढासळेला दिसतोय.

संजय राऊत हे 100 टक्के वैफल्यग्रस्त झाल्याचं त्यांच्या बोलण्यावरून दिसत आहे. अशा प्रकारे हमरी-तुमरीवर येणं म्हणजे राऊत यांच्या वैचारिकतेचा ऱ्हास झाल्याचं दिसतंय, असं वक्तव्य दरेकर यांनी केलंय.

संजय शिरसाट यांना सुनावलं…

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या 20 ते 22जानेवारीपर्यंत होणार असं वक्तव्य औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी केलंय. मंत्रिमंडळ विस्तारातील तांत्रिक अडचणी काही दिवसात दूर होतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संजय शिरसाट म्हणालेत. यावर प्रवीण दरेकर यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे माहिती नाही.. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब याबाबत निर्णय घेत असतात. आमदारांच्या पातळीवर हा निर्णय होत नाही, त्यामुळे कुणी हवेत तारखा देऊ नये, असा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिलाय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.