रिकामटेकडे दौरा करतात की टीका हे महाराष्ट्र पाहतोय; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. केवळ मीडियात येऊन अश्रू पुसणं आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांची अश्रू पुसणं वेगळं आहे. (pravin darekar)
मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. केवळ मीडियात येऊन अश्रू पुसणं आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांची अश्रू पुसणं वेगळं आहे. तौक्ते वादळातही आम्ही साईटवर होतो. आताही होतो. त्यामुळे रिकामटेकडे दौरा करतात की फक्त टीका करतात हे महाराष्ट्राची जनता पाहात आहे, असा जोरदार हल्ला प्रविण दरेकर यांनी चढवला. (pravin darekar slams shivsena leader sanjay raut)
प्रविण दरेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांना चोख उत्तर दिलं. संजय राऊत यांनी बोलताना उक्ती आणि कृती याचं तारतम्य बाळगावं. एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?, कुठे पाहणी करायला गेले का?, केवळ मीडियात येऊन वेगवेगळी वक्तव्य करणं अश्रू पुसणं हे वेगळं आहे. तोक्ते निसर्ग वादळात आम्ही साईटवर गेलो होतो. आता रिकामटेकडे दौरा करतात की टीका करतात हे महाराष्ट्राची जनता पाहते आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. देवेंद्र फडणवीस ग्रासरूटचे नेते आहेत. सर्वसामान्य जनतेचा कानोसा राऊतांनी घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
राऊतांच्या बोलण्याला अर्थ नाही
पुन्हा येईन… पुन्हा येईन… हा विषय आता जूना झाला आहे. ते शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस लोकनेते आहेत. राणे हे शिवसैनिक होते, ते त्यांनी कधी नकारलं नाही. राऊतांनी राणेंचं उदाहरण देत कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्याचं काम केलंय. त्यांच्या बोलण्याला अर्थ नाहीये, असा टोलाही त्यांनी लगावला.
पंतप्रधानांकडे आणखी निधीची मागणी करणार
राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांवर काही बोलत नाहीत. त्यामुळे राऊतांच्या बोलण्याला महत्व नाही. पंतप्रधानांनी राज्याला 700 कोटी रुपये दिले आहेत. राज्याला आणखी निधी मिळावा म्हणून भाजप पंतप्रधांनाकडे मागणी करेल, असं त्यांनी सांगितलं. पूरग्रस्त भागात भीषण परिस्थिती आहे. व्यापारी आणि शेतकऱ्यांचं जीवनच उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने जीआर काढून जशी मदत केली होती. तशीच मदत लोकांना जाहीर करणं अपेक्षित आहे, असंही ते म्हणाले.
राऊत काय म्हणाले होते
संजय राऊत आज नगरमध्ये होते. यावेळी त्यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना डिवचले होते. संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. पक्ष सोडून गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. हा नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं. तुम्ही कुठंही जा लोकं तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार, असा टोला राऊत यांनी राणेंना लगावला. आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही, असंही ते म्हणाले. सत्ता हा मानसिक आधार आहे. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या, असं राऊत म्हणाले होते. (pravin darekar slams shivsena leader sanjay raut)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 July 2021 https://t.co/Uik3veHOCH #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 31, 2021
संबंधित बातम्या:
कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच; संजय राऊतांचा राणेंना टोला
क्रेडिट कार्ड नसेल तरीही हप्त्यांवर खरेदी करु शकता; जाणून घ्या सर्वकाही
चिपळूणला पुराचा फटका का बसला?, पाटबंधारे विभागाचा अहवाल सरकारकडे; दिलं ‘हे’ कारण!
(pravin darekar slams shivsena leader sanjay raut)