शाखा स्थापनेपासून मतदार नोंदणीपर्यंत… उद्धव ठाकरे यांचा संपर्क प्रमुखांना सहा कलमी कार्यक्रम काय?

विधानसभा निवडणुका जवळ आल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिकच सक्रिय झाले आहेत. आज मुंबईत तुफान पाऊस असतानाही त्यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली. यावेळी त्यांनी सर्व संपर्क प्रमुखांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. गावागावात जाऊन शाखा स्थापन करण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

शाखा स्थापनेपासून मतदार नोंदणीपर्यंत... उद्धव ठाकरे यांचा संपर्क प्रमुखांना सहा कलमी कार्यक्रम काय?
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 3:48 PM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा संपर्क प्रमुखांची मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन करतानाच पाच सूत्री कार्यक्रम दिला आहे. गावागावात शाखा स्थापन करण्यापासून ते मतदार नोंदणी करण्यापर्यंतच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. निवडणुकांना अवघे 41 दिवस उरले आहेत. त्यामुळे कामाला लागा. चांगलं काम करा, अशा सूचनाच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आज विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांशी संवाद साधून त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील 41 दिवसात आचार संहिता लागेल, त्यामुळे जोमाने काम करा, असे आदेशच उद्धव ठाकरे यांचे विधानसभा संपर्कप्रमुखांना दिले आहेत. 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना दिले आहेत.

भगवा सप्ताहचे आयोजन करा

शिवसेनेच्या या भगवा सप्ताहमध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी बैठका घेण्याचे आदेशही देण्यात आले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील 4 महिन्यात 15 दिवसातून दोन दिवस विधानसभा क्षेत्रात संपर्कप्रमुखांनी स्वतः उपस्थितीम राहून आढावा घेण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले.

संपर्क प्रमुखांना दिलेला पाच सूत्री कार्यक्रम काय?

1. सर्व विधानसभा संपर्कप्रमुखांनी मतदारसंघात दौरा करणे आवश्यक. सोबत संबंधित उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख असणे आवश्यक आहे.

2. सदर मोहिमेअंतर्गत प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये बैठक आयोजित करणे आवश्यक आहे.

3. बैठकीसाठी स्थानिक विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख (पुरुष-महिला), युवासेना शाखा युवा अधिकारी आदी पदाधिकारी अपेक्षित आहेत.

4. सदर मोहिमेअंतर्गत खालील माहिती अपेक्षित आहे.

१) गावातील शाखाप्रमुख, शाखासंघटक, युवासेना शाखा युवा अधिकारी इत्यादींची नावे आणि दूरध्वनी

२) गावात किती शिवसैनिकांची नोंदणी झाली आहे?

३) नवीन मतदारांची नोंदणी किती झाली?

४) किती गावांमध्ये शाखा नाही?

५) नसल्यास कधीपर्यंत स्थापन करणार

5. विभागात कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांची यादी मोबाईल क्रमांकासहित जोडावी.

१) गटप्रमुखाचे नाव

२) यादी क्रमांक

३) संपर्क क्रमांक

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.