द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला देशातील अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सकाळी 9.25 – द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचतील
(राष्ट्रपती भवनात पोहोचल्यानंतर नवनियुक्त राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल)
सकाळी 9.50 – द्रौपदी मुर्मू आणि राम नाथ कोविंद राष्ट्रपती भवनातून संसद भवनाकडे ताफ्यात एकत्र रवाना होतील.
10:03 – हा ताफा संसदेच्या गेट क्रमांक 5 येथील संसद भवनात पोहोचेल, गेट क्रमांक 5 येथे उतरेल, दोन्ही उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतरांसह सेंट्रल हॉलकडे रवाना होतील.
10:10 – सेंट्रल हॉलमध्ये आगमन आणि राष्ट्रगीत वाजवले जाईल
10:15 – शपथविधी
10:20 – नवीन राष्ट्रपतींचे भाषण
10:45 – नवे आणि बाहेर जाणारे राष्ट्रपती संसदेतून राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले
10:50 – राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभ
11:00 – राष्ट्रपती भवनातून मावळत्या राष्ट्रपतींना निरोप