Presidential election 2022 LIVE Updates : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मु यांना इतर पक्षातील नेत्यांचेही मतदान होईल, फडणवीसांना विश्वास

| Updated on: Jul 20, 2022 | 12:05 PM

Presidential election 2022 LIVE Updates : शिवसेनेने या निवडणुकीत मुर्मू यांनाच मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची मतं ही यशवंत सिन्हा यांना होणार आहेत. संपूर्ण देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे.

Presidential election 2022 LIVE Updates : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मु यांना इतर पक्षातील नेत्यांचेही मतदान होईल, फडणवीसांना विश्वास
द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?, देशाचा नवा राष्ट्रपती कोण?; Image Credit source: tv9 marathi

मुंबई : आपल्या देशाला लवकरच नवे राष्ट्रपती (President Election 2022) मिळणार आहेत. राष्ट्रपती निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहेत. यात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजेच आमदार आणि खासदार हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एनडीएकडून राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर यूपीएकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सध्याचा कल पाहिल्यास मुर्मू यांचं पारडं जड झाल्याचे दिसून येत आहे. देशभरातून मुर्मू यांना मिळणारा पाठिंबा हा वाढला आहे. शिवसेनेने या निवडणुकीत मुर्मू यांनाच मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची मतं ही यशवंत सिन्हा यांना होणार आहेत. संपूर्ण देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Jul 2022 03:54 PM (IST)

    राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मु यांना इतर पक्षातील नेत्यांचेही मतदान होईल, फडणवीसांना विश्वास

    मुंबई- राष्ट्रपतीपदाच्या मतदानासाठी व्हीप नसतो. इतर पक्षातील नेतेही आम्हाला मते मिळतील, किती मिळतील हे माहीत नाही, पण नक्की मिळतील -फडणवीस

  • 18 Jul 2022 03:05 PM (IST)

    मुलायम यादव यांना आयएसआय एजंट म्हणणाऱ्यांचे समर्थन नाही-शिवपाल सिंह

    शिवपाल सिंह यादव यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मुलायम सिंह यादव यांना आयएसआय एजंट म्हणणाऱ्या यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले आहे. समाजवादी पार्टीचे कट्टर नेते आणि तंत्त्वांचं पालन करणाऱ्यांवर असे आरोप करणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार नाही.

  • 18 Jul 2022 02:32 PM (IST)

    बस दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांना शोधण्याचा प्रयत्न सुरु- देवेंद्र फडणवीस

    मुंबई- मध्यप्रदेश बस दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे, मोठ्या प्रमाणात प्रवासी बेपत्ता सुद्धा आहेत. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी पूर्ण यंत्रणा कामाला लावली, त्यासाठी त्यांचे आभार. गिरीश महाजन यांना तातडीने इंदूरला रवाना केले आहे. ते ऑपरेशनवर लक्ष देतील. जळगाव जिल्ह्यातही मृतांच्या नातेवाईकांना मदत पोहचेल यासाठी यंत्रणा उभी केली आहे. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी आमचा संवाद झाला आहे. बेपत्ता प्रवाशांना शोधण्याचा प्रयत्न आहे.

  • 18 Jul 2022 02:18 PM (IST)

    मुंबईत ट्रायडन्ट हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाची बैठक

    मुंबई – राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत ट्रायडन्ट हॉटेलमध्ये शिंदे गटातील आमदारांची बैठक सुरु झाली आहे. आज रात्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार आहे. उद्या भाजपा पक्षश्रेष्ठींशी पुन्हा चर्चा करण्याची शक्यता आहे. २० तारखेला सुप्रीम कोर्टातही सुनावणी आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

  • 18 Jul 2022 02:15 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ वाटपाआधी आज रात्री दिल्लीला रवाना होणार

    मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ वाटपाआधी आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी पुन्हा चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

  • 18 Jul 2022 02:09 PM (IST)

    मध्यप्रदेश बस दुर्घटनेतील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती – अजित पवार

    मुंबई- मध्य प्रदेशातून इंदूरहून येत असलेल्या बसला झालेल्या अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, असा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. बस उंचावरुन खाली नर्मदेत कोसळली आहे. १३ मृतदेह सापडले असले तरी इतर मृतदेह वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.

  • 18 Jul 2022 02:00 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    इंदूरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. अंमगळेरला येत असलेली बस अपघातग्रस्त झाली. १२ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दोनदा फोनवर बोललो. त्यांनी हा अपघात गांभिर्याने घेतला आहे. त्यांनी तिथे एका मंत्र्यांची बचावकार्यासाठी नियुक्ती केली आहे.

    योगेश कदम आमच्यासोबत आहेत. रामदास कदम यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहेत.

    पूर परिस्थितीतपंचनामे लवकर झाले पाहिजेत, नुकसान भरपाई द्यावी. विरोधी पक्षांचं काम करायचं नाही ही भूमिका नाही. जनतेच्या हिताची कामे केली आहे.

    कालच युवासेनेचे पदाधिकारी सोबत येत आहेत. लोकप्रतिनिधी भूमिका मान्य करीत आहेत. द्रौपदी मुर्मु या आदिवासी आहेत. त्यांच्याविषयी सन्मान आहेत. शिवसेना भाजपासह, खासदार, इतर पक्षांचे नेतेही त्यांना मतदान करण्याची शक्यता आहे.

  • 18 Jul 2022 01:56 PM (IST)

    शिवसेना नेतेपदाचा रामदास कदम यांचा राजीनामा

  • 18 Jul 2022 01:19 PM (IST)

    उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरची प्रतिक्रिया

    उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जगदीप धनगड यांनी दिलेली प्रतिक्रिया आहे.

  • 18 Jul 2022 01:15 PM (IST)

    Presidential Election Update : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Live

    आमचं हिंदूत्व तेच आहे जे आधी होतं. अनुभवातून आलेले ही विचार आहेत. शिवसेने राष्ट्रपती निवडणुकीत मुर्मू यांनाच पाठिंबा दिला आहे.

  • 18 Jul 2022 01:07 PM (IST)

    राष्ट्रपती निवडणुकीसाठी गोव्यात मतदान

    विधानसभेत करण्यात आली आहे मतदानाची व्यवस्था, सत्ताधारी भाजपासह विरोधी आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क, पहिल्या दोन तासात 40 पैकी 34 जणांनी बजावला मतदानाचा हक्क, काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची मते कुणाला मिळणार याकडे आहे सगळ्याचे लक्ष, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपा आणि समर्थकांची मिळून 25 मते मिळणारच. त्याशिवाय आम्ही इतर पक्षाना सुद्धा आवाहन केल्याने आणखी सुद्धा मिळतील याची खात्री असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • 18 Jul 2022 12:59 PM (IST)

    मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची प्रतिक्रिया

    मला खात्री आहे की 21 जुलैला निकाल द्रौपदी मुर्मूंच्या बाजूने लागेल. आम्ही 25 जुलै रोजी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू. हरियाणातून आम्हाला त्यांच्या बाजूने सांगितली त्यापेक्षाही जास्त मते मिळतील: मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर

  • 18 Jul 2022 12:51 PM (IST)

    मोदींच्या उपस्थितीत धनगड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

    पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत जगदीप धनगड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे.

  • 18 Jul 2022 12:38 PM (IST)

    अरविंद केजरीवाल यांनीही केलं मतदान

  • 18 Jul 2022 12:28 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

  • 18 Jul 2022 12:24 PM (IST)

    माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बजावला मतदानाचा हक्क

  • 18 Jul 2022 12:12 PM (IST)

    ‘मुर्मू मोठ्या फरकाने जिंकून भारताच्या राष्ट्रपती बनतील’

    NDA अध्यक्षपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मोठ्या फरकाने जिंकून भारताच्या राष्ट्रपती बनतील

    या देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    भारतातील आदिवासी समाजाला यापूर्वी कधीही हे पद भूषवण्याची संधी मिळाली नव्हती,

    अशी प्रतिक्रिया बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी दिली आहे.

  • 18 Jul 2022 12:08 PM (IST)

    देशभरात मतदान सुरू

    देशभरात मतदान सुरू

    राष्ट्रपतीपदासाठीचं मतदान सुरू

    मुर्मू यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा

    महाराष्ट्रात मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा

  • 18 Jul 2022 12:08 PM (IST)

    Presidential Election Update : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जगदीप धनगड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  • 18 Jul 2022 11:58 AM (IST)

    ‘पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाई’

    ‘पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाई होणार’

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती

  • 18 Jul 2022 11:45 AM (IST)

    Presidential Election Update : राज्यात 100 हून अधिक आमदारांनी मतदान केलं

    राज्यात आत्तापर्यंत 100 हून अधिक आमदारांनी मतदान केलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनीही आपला मतदानचा हक्क बजावला आहे.

  • 18 Jul 2022 11:43 AM (IST)

    Presidential Election Update : भाजप आमदारांनी काँग्रेस आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतला

    नितीन राऊत यांनी रांग मोडून मतदान केल्याचा आरोप हा भाजप आमदारांनी केला आहे. तसेच त्याचं मत बाद करण्यात यावं अशी मागणीही केली आहे.

  • 18 Jul 2022 11:03 AM (IST)

    Navneet Rana Live : खासदार नवनीत राणा Live

    द्रोपदी मुर्मू यांना मतदान करून आदिवासी समाजाचे ऋण फेडण्याची ही संधी आहे. एकही आमदार महाविकास आघाडीत खूश नव्हता. एकही खासदार खूश नसेल. तर तेही बाळासाहेबांच्या मूळ शिवसेनेत येऊ शकतात.

  • 18 Jul 2022 10:45 AM (IST)

    Presidential Election Update : शिवसेना आमदार दीपक केसरकर Live

    महाराष्ट्राला वारसा हा अहिल्यादेवी होळकरांचा आहे. त्यामुळे मुर्मू यांना आमदारांनी आपली मतं द्यावी. आपल्या मतांना खूप किंमत असते. त्यामुळे एकही मत फुकट जाऊ नये याची काळजी घ्या, अशा पंतप्रधानाच्या सूचना होत्या. आम्ही सध्या एनडीएचे घटक पक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करणार. 200 मतं आम्हाला मिळतील. आपण 21 तारखेला त्यांचा विजय साजरा करूया. आमदारांचा पाठिंबा आम्हाला वाढत असेल तर चांगली गोष्ट आहे. आम्ही महाराष्ट्राची संस्कृती जपलेली आहे.

  • 18 Jul 2022 10:36 AM (IST)

    Presidential Election Update : मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे. भाजपच्या 50 हून अधिक आमदारांनी आतापर्यंत मतदान केलं आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 18 Jul 2022 10:32 AM (IST)

    Presidential Election Update : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार Live

    आदीवासी भगिनीला 200 पेक्षा जास्त मतं मिळतील हा विश्वास आहे. पर्यावरणाचा आदर करणाऱ्या उमेदवाराला एक संधी दिली आहे. त्यामुळे आदारांचा आतरआत्मा मुर्मू यांनाच मतदान करतील. नाना पटोले हे इकडे तिकडे न पाहाता टीका करतात, त्यांना अनेक गैरसमज आहेत. काँग्रेसच्या अनेक आमदारांनी आम्हाला मतदान केलं. व्हीपचा कोणताही सवाल उपस्थित होत नाही.

  • 18 Jul 2022 10:16 AM (IST)

    Presidential Election Update : शिंगे गटातील आमदार अब्दुल सत्तार Live

    द्रौपदी मुर्मू यांना राज्यातून भरभरून मतं मिळतील. माझ्याही विरोधात हे सुप्रीम कोर्टात गेले आहेत. मात्र कोर्टात आम्हाला न्याय मिळेल हा विश्वास आहे. यात शंका घेण्याचं काम नाही. आम्ही पन्नासपेक्षा जास्त आमदारांचं समर्थन आहे. मुख्यमंत्री आणि मख्यमंत्र्यांच्या नियोजनाला यश मिळेल.

  • 18 Jul 2022 10:14 AM (IST)

    Presidential Election Update : राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात

    पंतप्रधान मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, तसेच राज्यात आमदार नितीन राऊत यांनी पहिलं मतदान केलं आहे.

  • 18 Jul 2022 09:54 AM (IST)

    Presidential Election Update : शिवसेना खासदार संजय राऊत Live

    शिवसेना पक्षप्रमुखांनी या आधीच स्पष्ट केलेलं आहे मुर्मू यांना हा पाठिंबा यासाठी आहे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आदिवासी समाजाचा मोठे योगदान आहे. अनेक शेकडो आदिवासी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले आहेत. त्यांचा संघर्ष फार मोठा आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये जंगलामध्ये डोंगरावर दऱ्याखोऱ्यांमध्ये आदिवासी समाजाने जे लढे दिले आहेत त्या सगळ्यांचे प्रतिनिधित्व द्रौपदी मुर्मू करत आहेत. आमचे अनेक खासदार आमदार कार्यकर्ते पदाधिकारी हे आदिवासी समाजाचे आहेत या सगळ्यांच्या चर्चेतून असं जाणवलं की प्रथमच या समाजाला इतक्या मोठ्या सर्वोच्च पदावर जायला संधी मिळते आहे, आपण पाठिंबा दिला पाहिजे त्यानंतर पक्ष प्रमुखांनी ताबडतोब पाठिंबा जाहीर केला, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

    आम्ही आधीही असे निर्णय घेतले आहेत. आमच्या पाठिंब्याने त्यांच्या मतांचा टक्का वाढणार आहे. शिवसेना काय आहे हे येणारा काळ ठरवेल. मंत्रिमंडळातील विस्तार जो टाळला जात आहे. तो टाळला गेला नसता. उद्या जो  बायडेन यांचा पक्ष फोडण्याचाही प्रयत्न होईल. उद्या ऋषी सुनक पंतप्रधान झाले तर ते आमचेच म्हणून भाजपवाले सांगतील. पण शिवसेना पुन्हा उभा राहील.

    आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आम्ही कायदा आणि नियमांवरच भरोसा ठेऊन आहे. इतके मोठे बहुमत मिळून का सरकार स्थापन होत नाही. अपात्रतेची टांगती तलवार आहे.

    देशात अनेक मुद्दे आहेत. महागाई, अग्निवीर, ईडीचा फेरा, चीन, असे अनेक विषय अधिवेशनात चर्चेला आहेत.

  • 18 Jul 2022 09:38 AM (IST)

    Presidential Election Update : पंतप्रधान मोदी Live

    हा स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव आहे. देशाचा प्रवास कसा राहिल. किती गतीमान होईल, याचा संकल्प करण्याचा काळ आहे. देशाला दिशा देण्याचा हा काळ आहे. सदनातील सर्व सदस्य नवी ऊर्जा भरतील. त्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत महत्वाचे आहे. राष्ट्रपती पद आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकाही होत आहेत. त्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. नेहमी सदनाला सक्षम माध्यम मानतो, तिर्थक्षेत्र मानतो. याठिकाणी मोकळ्या मनाने संवाद व्हावा, वादविवाद व्हावेत, टीका व्हावी. मी सर्व खासदारांना हेच आवाहन करतो की गहन चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. सर्वांच्या प्रयत्नांनीच चांगले निर्णय होतात. सर्वांनी आपल्या कर्तव्याचं पालन करत या अधिवेशनाचा चांगला उपयोग करून घ्यावा.

  • 18 Jul 2022 09:33 AM (IST)

    Presidential Election Update : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Live

    आम्हाला विजयाचा विश्वास आहे. शिवसेना आमच्या सोबत नसताना जास्त मतं मिळाली. आता तर शिवसेना बरोबर आहे. त्यामुळे आम्ही २०० पेक्षा जास्त मिळवू. मी जो राज्यसभा सांगितला त्याची पुनरावृत्ती होणार आहे. जे मागच्या निवडणुकांना नव्हते ते विवकबुद्धीला स्मरून मतं देतील.

    भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना एकत्र आणलं. नाना पटोलेंना ही सवय नाही. मात्र आमची ही संस्कृती आहे. मुक्ता टिळक निघाल्या आहेत. त्या आमच्या आधी पोहोचतील. लक्ष्मण जगतापांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

  • 18 Jul 2022 09:31 AM (IST)

    Presidential Election Update : शिवसेना खासदार विनायक राऊत Live

    राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार या आदीवासी महिला आहेत. त्यांना पाठिंबा देणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे. शिवसेना एनडीएमध्ये नाही. ज्या पद्धतीने आम्ही आधी पाठिंबा दिला तीच भूमिका आता आम्ही घेतली आहे.

    जी परिस्थिती येईल त्याला आम्ही सामोरे जाऊ, शिवसेनेला पुन्हा नव्या ताकदीने उभी करू, आमच्या खासदारांना मतदानासाठी सूचना करणार आहोत. त्याचं त्या पालन करतील.

    पाहा व्हिडिओ

  • 18 Jul 2022 09:18 AM (IST)

    Presidential Election Update : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Live

    ज्या लोकांना लोकशाहीच मान्य नाही. आजपासून अधिवेशन सुरू होत आहे. मात्र काल देशाचे पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांना रावणासारखा अहंकार आला आहे. बहुमताचा अपमान कसा करायचं हे भाजप रोज दाखवत आहे. जे लोक लोकशाहीला विकत घेण्याची भाषा करतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या. एका आमदाराची किंमत यांनी पन्नास कोटी लावली आहे. एकीकडे जनता पुरात आहे, दुसरीकडे हे फाईव्ह स्टारमध्ये आहे. त्यामुळे जनताही यांना धडा शिकवेल.

    गोवा हॉटेलमध्ये जे काय झालं ते तुम्ही पाहिलं की आमदार सोबत गेले होते ते आमदारांनी ही भाषा केली आहे .लोकशाही विकत घेण्याची भाषा माझी नाही. ईडीचे सरकार महाराष्ट्रा मधलं आलेलं आहे, त्या सरकारच्या माध्यमातून ही भाषा केली जात आहे. ज्या पद्धतीने पैशाच्या भरोशावर दबाव तंत्राच्या भरोशावर आणि केंद्राच्या तपास यंत्रणांच्या दबाव यंत्रणांच्या आधारावर दुसऱ्या पक्षाच्या आमदारांना तोडण्याचा जो प्रयत्न आणि त्या प्रकारचा मानस व्यक्त करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे, हा महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम हे करत आहेत, त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आमचा एकही आमदार फुटणार नाही.

  • 18 Jul 2022 09:12 AM (IST)

    Presidential Election Update : भाजप आमदार आशिष शेलार Live

    द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. आम्हाला रेकॉर्डब्रेक आमदारांचं समर्थन मिळेल. पक्ष बंधनं सोडून हे मतादान सर्वपक्षी होईल. आम्हाला जी वाढीव मतं मिळतील ती इतिहास घडवणारी असतील. राज्यात आता महाविकास आघाडीचं अस्तित्व दिस नाही. त्यांच्या समन्वयाचा तर विषयच नाही. जे रोज तोंडावर आपटले ते आता पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यसभा, विधानपरिषदेतही विरोधक हेच बोलत होते. कायदा स्पष्ट आहे, संविधान स्पष्ट आहे. ज्यांना अभ्यास माहिती आहे त्यांना माहिती आहे. हा निर्णय शिंदे गटाच्या बाजुने लागेल. शिवसेनेच्या काही नेत्यांना सकाळी मीडियात बोलायचं आणि दुपारी कोर्टात जायचं याशिवाय काही काम उरलं नाही.

  • 18 Jul 2022 09:09 AM (IST)

    Presidential Election Update : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात Live

    आम्ही यशवंत सिन्हा यांना मतदान करणार, ही विचारांची लढाई आहे. ही जातीची लढाई नाही. लोकशाही मोडायला भाजप निघालेला आहे. ज्या पद्धतीने शिवसेनेत फूट झाली आहे ते कायदेशीर वाटत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 18 Jul 2022 08:59 AM (IST)

    Presidential Election Update : भाजप आमदार म्हणतात मुर्मू यांचा विजय ठरलेला

  • 18 Jul 2022 08:53 AM (IST)

    Presidential Election Update : आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

    आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यासाठी संसद परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज राष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 18 Jul 2022 08:50 AM (IST)

    Presidential Election Update : विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी मुर्मू यांच्यावर निशाणा साधला

    Presidential Election Update : राष्ट्रपतीपदाचे संयुक्त विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांनी रविवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला प्रतिस्पर्धी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यावर कडाडून हल्लाबोल चढवला. यशवंत सिन्हा यांनी खासदारांना निवडणुकीत विवेकबुद्धीने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

  • 18 Jul 2022 08:47 AM (IST)

    Presidential Election Update : राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे 5 आमदार चेन्नईहून गोव्यात परतले

    Presidential Election Update : आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने चेन्नईला पाठवलेले पाच आमदार रविवारी गोव्यात परतले. राज्यात पक्षाचे 11 आमदार आहेत. गोवा विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पाच आमदारांना चेन्नईला पाठवण्यात आले. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 11 जुलैपासून सुरू झाले.

  • 18 Jul 2022 08:35 AM (IST)

    Presidential Election Update : पश्चिम बंगालमध्येही राष्ट्रपती निवडणुकीची लगबग

  • 18 Jul 2022 08:05 AM (IST)

    Presidential Election Update : ही टीम यशवंत सिन्हा यांच्यासोबत

    आतापर्यंत विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना काँग्रेस, एनसीपी, टीएमसी, सपा, सीपीआय (एम), आरएलडी, आरजेडी, आरएसपी, टीआरएस, डीएमके, नॅशनल कॉन्फरन्स, सीपीआय, केरळ काँग्रेस (एम) या पक्षांकडून पाठिंबा दिला जात आहे. विरोधी उमेदवाराला आतापर्यंत 3 लाख 89 हजार मते आहेत.

  • 18 Jul 2022 07:38 AM (IST)

    Presidential Election Update : मुर्मू यांच्यासोबत सिन्हा यांचे समर्थक आले

    एनडीएचे उमेदवार मुर्मू यांना लहान-मोठ्या एकूण 27 पक्षांचा पाठिंबा आहे. यशवंत सिन्हा यांचे समर्थक मानले जाणारे ते बिगर एनडीए पक्षही त्यांच्या समर्थनात उतरले आहेत. सपाच्या मित्रपक्षांचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांच्याशिवाय भाजप, निषाद पक्ष आणि अपना दल (एस), बसपा आणि राजा भैय्या यांचा पक्ष मुर्मू यांना पाठिंबा देत आहेत. शिवपाल सिंह यादवही मुर्मू यांच्या बाजूने मतदान करतील.

  • 18 Jul 2022 07:13 AM (IST)

    Presidential Election Update : द्रौपदी मुर्मूंसोबत कोण?

    NDA च्या घटक दल व्यतिरिक्त BJD, YSR काँग्रेस, BSP, AIADMK, TDP, JD(S), शिरोमणी अकाली दल, शिवसेना, JMM यांनी देखील NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशा स्थितीत या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांच्याविरोधात द्रौपदी मुर्मू यांना कल मिळणार असल्याचे मानले जात आहे. जर द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्या तर त्या देशाच्या राष्ट्रपती होणार्‍या पहिल्या आदिवासी महिला असतील.

  • 18 Jul 2022 07:02 AM (IST)

    Presidential Election Update : द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी राज्यातून दोनशे मतं मिळवणार-मुख्यमंत्री

    द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी राज्यातून दोनशे मतं मिळवणार असा निर्धार मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी केला आहे. त्यासाठी त्यांचे विरोधी पक्षातील नेत्यांनाही फोन सुरू असल्याच्या चर्चा आहेत. एकनाथ शिंदे यांना 200 आमदार प्रतिसाद देणार?

  • 18 Jul 2022 06:56 AM (IST)

    Presidential Election Update : नाना पटोले यांची रविवारची प्रतिक्रिया

    यशवंत सिन्हा यांना आम्ही मतदान करणार आहोत. खालच्या सभागृहात राष्ट्रवादीचा सदस्य आहे. वरच्या सभागृहात शिवसेनेकडे उप सभापतीपद आहे. त्यामुळं आम्ही विरोधी पक्षनेते पद मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहोत. 20 तारखेला महत्वाचा निर्णय येईल असं वाटतंय. मागच्या अडीच वर्षांत ज्या घटना घडत आहेत त्या चुकीच्या आहेत. त्यामध्ये राज्यपाल यांची देखील भूमिका संशयास्पद आहे. कोर्टाचे कारण सांगून त्यानी अध्यक्षपदाची निवडणूक राखून ठेवली आणि भाजप सरकार आल्यानंतर लगेचच निवडणूक घेतली. आमची मागणी राहणार आहे सरन्यायाधीश यांनी आम्हाला न्याय द्यावा.

  • 18 Jul 2022 06:28 AM (IST)

    Presidential Election Update : आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान

    सकाळी साडेनऊ वाजता मतदानाला सुरू होणार

    राज्यातही मतदान प्रक्रिया वेगवान होणार

Published On - Jul 18,2022 6:24 AM

Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.