Presidential Election Results 2022 LIVE : द्रोपदी मुर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, अखेर विजयाची घोषणा

| Updated on: Jul 21, 2022 | 9:56 PM

Presidential election 2022 Results LIVE Counting Updates in Marathi : आज दिवसभरात राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालाची धामधूम राहणार, फास्ट घडामोडी पाहा एका क्लिकवर

Presidential Election Results 2022 LIVE : द्रोपदी मुर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, अखेर विजयाची घोषणा
Presidential election Result LIVEImage Credit source: tv9marathi

मुंबई : राष्ट्रपतीपदाची निवडणूक ( Presidential Election Results 2022 LIVE,) पार पडल्यानंतर आज मतमोजणी सुरू होणार आहे. काही वेळातच या मतमोजणीला सुरूवात होणार असून देशाचे 15 राष्ट्रपती कोण असणार हे स्पष्ट होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (NDA) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि संयुक्त पुरोगामी आघाडीकडून (UPA) यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होणार असल्याने आजच्या निकालाकडे (Presidential Election Results)सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळपासून मतमोजणीाला सुरुवात झाली आहे (Presidential Election vote counting LIVE) भाजपाला त्यांचा उमेदवार जिंकणार असल्याची खात्री आहे. त्यामुळे त्यांनी तशी तयारी दे्खील केल्याची माहिती मिळाली आहे. (Presidential Election 2022 LIVE)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Jul 2022 08:14 PM (IST)

    राज्यतले 16 आमदारही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फुटले

    राज्यतले 16 आमदारही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फुटले असल्याची माहिती समोर आली आहे. यात शिवसेनेच्या आमदारांनी आधीच मुर्मू यांना उघडपणे पाठिंबा जाहीर केला होता. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.

  • 21 Jul 2022 07:48 PM (IST)

    द्रौपदी मुर्मु देशाच्या नव्या राष्ट्रपती

    नवी दिल्ली – देशाच्या नव्या राष्ट्रपती म्हणून ओडिशाच्या आदिवासी महिला नेत्या द्रौपदी मुर्मु यांची निवड झाली आहे. त्यांनी यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. यानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. पहिल्यांदाच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाचा मान मिळाला आहे.

  • 21 Jul 2022 07:11 PM (IST)

    भाजप मुख्यालयात जल्लोषाचे वातावरण

    राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आघाडीवर आहेत. मतमोजणीची तिसरी फेरी सुरू आहे. दरम्यान भाजप मुख्यालयात जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. तेथे मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत.

  • 21 Jul 2022 07:10 PM (IST)

    द्रौपदी मुर्मूंचे संपूर्ण मतदान मूल्य 105299

    राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीनंतर 10 राज्यांतील आमदारांची 809 मते मिळाली. ज्यांचे एकूण मत मूल्य 105299 आहे.

  • 21 Jul 2022 07:03 PM (IST)

    एसपी सिंह बघेल यांनी विजयापूर्वीच अभिनंदन केले

    केंद्र सरकारमधील राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांनी द्रौपदी मुर्मूंच्या विजयाची घोषणा करण्यापूर्वीच मुर्मू यांचं अभिनंदन केले आहे.

  • 21 Jul 2022 06:39 PM (IST)

    जेपी नड्डा म्हणाले मुर्मू यांचा कार्यकाळ खूप यशस्वी होईल

    द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी वक्तव्य केलं आहे. त्यांचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी होईल, याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले आहेत.

  • 21 Jul 2022 06:19 PM (IST)

    विरोधकांच्या 17 खासदारांचं द्रौपदी मुर्मूंना मतदान, भाजपचा दावा

    राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. अशावेळी भाजपच्या नेत्यांकडून मोठा दावा करण्यात आलाय. भाजपच्या मते 523 खासदार मुर्मूंना मतदान करतील अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्या टप्प्यात मुर्मू यांना 540 मतं पडली आहे. त्यामुळे भाजपचा दावा आहे की विरोधकांच्या 17 खासदारांनी मुर्मू यांना मतदान केलं आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या मतांची मोजणी झाली होती.

  • 21 Jul 2022 05:38 PM (IST)

    दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणीही संपली, मुर्मू यांचं निर्विवाद वर्चस्व

    एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आतापर्यंत 1 हजार 349 आणि यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 537 मतं मिळाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणी आता पूर्ण झाली आहे.

  • 21 Jul 2022 05:21 PM (IST)

    राष्ट्रपती निवडणूक निकालापूर्वीच देशभरात आनंदोत्सव

    राष्ट्रपती निवडणूक निकालापूर्वीच देशभरात आनंदोत्सवाला सुरुवात झालीय. दिल्लीपासून ते ओडिशापर्यंत उत्सव साजरा केला जातोय. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान दिल्लीतील लोक कलावंतांसह आदिवासी नृत्यात सहभागी झाली.

  • 21 Jul 2022 05:18 PM (IST)

    एक ते दीड तासात राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालाची शक्यता

    राष्ट्रपती निवडणुकीत आमदारांच्या मतांची मोजणी सुरु आहे. पुढील एक ते दीड तासात निकाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान, निकालापूर्वीच द्रौपदी मुर्मू यांच्या गावासह देशभरात आनंदोत्सव सादरा केला जातोय.

  • 21 Jul 2022 04:34 PM (IST)

    निकालाआधीच दिल्लीत जल्लोषाला सुरुवात, दिल्लीत ढोल वाजवून आनंदोत्सव

    द्रोपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय. मात्र निकालाआधीच दिल्लीत जल्लोषाला सुरुवात झालीय. आदिवासी महिला नाचून आनंद साजरा करत आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिला विराजमान होत असल्याने देशभरात आनंद साजरा केला जातोय. त्याचाच भाग म्हणून दिल्लीत ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला जातोय.

  • 21 Jul 2022 04:31 PM (IST)

    गणेशोत्सवासाठी मुंबईतील नियमावली राज्यभर लागू राहणार- मुख्यमंत्री

    गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क भरावे लागणार नाहीत याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना शुल्कातून सूट दिली आहे. खड्डे खोदण्यासाठी पैसे घेतात. मंडपाचे चार्जेस यातून सवलत दिली आहे. तसेच मंडळांकडून हमी पत्र घेत होते. ते घेण्यास मनाई केली आहे. वर्षानुवर्ष गणेशोत्सव करणाऱ्यांकडून हमी पत्र घेऊ नका असं सांगितलं. नियमांचं पालनं करावं लागेल. पण त्याचा बागुलबुवा उभा करू नये याच्या सूचना केली आहे. मुंबईची जी नियमावली आहे. तीच राज्यभर लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूर्त्यांच्या ऊंचीवर मर्यादा होती. ती काढून टाकली आहे.

  • 21 Jul 2022 04:30 PM (IST)

    यंदाची दहीहंडी, गणेशोत्सव निर्बंधमुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

    कोविडमुळे सण साजरे करता आले नाहीत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखून शांततेत सण साजरे झाले पाहिजेत याच्या सूचना दिल्या. जिल्हा प्रशासनालाही सूचना दिल्या. गणेशोत्सव आणि इतर सण सुरळीत पार पाडण्यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजे यासाठी खेटे घालायला लागू नये यासाठी एक खिडकी योजना आणि ऑनलाईन परवानग्या दिल्या आहेत.

  • 21 Jul 2022 04:20 PM (IST)

    आज नवा इतिहास रचला जाणार, एका आदिवासी घरातील मुलगी देशाची राष्ट्रपती होणार- धर्मेंद्र प्रधान

    केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज देशात नवा इतिहास रचला जाणार असल्याचं म्हटलंय. देशाच्या नव्या राष्ट्रपतींची थोड्याच वेळात घोषणा केली जाईल. एका आदिवासी घरातील मुलगी देशाची पुढली राष्ट्रपती होईल. देशात लोकशाहीचे खरे फायदे आता समोर येत आहेत, अशी प्रतिक्रिया धर्मेंद्र प्रधान यांनी दिलीय.

  • 21 Jul 2022 04:15 PM (IST)

    राष्ट्रपती निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणी सुरु

    राष्ट्रपती निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यात एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मागे टाकलंय. आता दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या आमदारांच्या मतांची मोजणी सुरु आहे. काही वेळातच अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

  • 21 Jul 2022 04:00 PM (IST)

    पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात द्रौपदी मुर्मू यांना भेटायला जाणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठई जाणार आहेत. त्यावेळी मोदी मुर्मू यांचे विजयानिमित्त अभिनंदन करतील. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा देखील असणार आहेत.

  • 21 Jul 2022 03:58 PM (IST)

    द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित, भाजप जल्लोष करणार

    द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. विजयानंतर त्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. मुर्मू यांच्या विजयानंतर भाजप देशभरात जल्लोष साजरा करणार आहे.

  • 21 Jul 2022 03:25 PM (IST)

    द्रौपदी मुर्मु यांना एनडीए व्यतिरिक्त अन्य पक्षाच्या 99 खासदारांनी मतदान केलं, सिन्हांना अपेक्षेपेक्षा कमी मतं.

    द्रौपदी मुर्मु यांना पहिल्या टप्प्यातील मतमोजणीमध्ये एकूण 540 मतं मिळाली आहे. त्यानुसार एनडीए व्यतिरिक्त अन्य पक्षाच्या 99 खासदारांनी मुर्मु यांना मतदान केल्याचं सांगितलं जात आहे. तर यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना अपेक्षेपेक्षा कमी मतं पडल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 21 Jul 2022 03:10 PM (IST)

    पहिल्या टप्प्यातील मतमोजणीत द्रौपदी मुर्मुंना 540, तर यशवंत सिन्हा यांना 208 मतं

    राज्यसभेचे महासचिव पीस सी मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यातील मतमोजणीत द्रौपदी मुर्मु यांना 540 मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना 208 मतं मिळाली आहे. तर 15 मतं बाद ठरली. हे खासदारांच्या मतदानाचे आकडे असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    Draupadi Murmu Vote

    पहिल्या टप्प्यात द्रौपदी मुर्मु यांना 540 मतं

  • 21 Jul 2022 02:49 PM (IST)

    सोनिया गांधींची ईडी चौकशी संपली, अडीच तासांनंतर सोनिया गांधी ईडी कार्यालयातून बाहेर

    नॅशनल हेराल्ड प्रखरणात काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून चौकशी करण्यात आली. साधारण 12 वाजता सोनिया गांधी दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाल्या. जवळपास अडीच तास त्यांची ईडी चौकशी चालली. या चौकशी दरम्यान प्रियंका गांधीही सोनिया यांच्यासोबत ईडी कार्यालयात हजर होत्या.

  • 21 Jul 2022 01:58 PM (IST)

    president election result 2022 : द्रौपदी मुर्मू यांच्या ओडिशातील रायरंगपूर गावात उत्सव सुरू

  • 21 Jul 2022 01:35 PM (IST)

    President Election Results : द्रौपदी मुर्मूचा गावोगावी उत्सव नृत्य

    द्रौपदी मुर्मूच्या गावात लोक आनंदात आहेत. शालेय विद्यार्थिनी नाच-गाणी करत आनंदोत्सव साजरा करत असताना गावात 20 हजार लाडू बनवण्यात आले आहेत.

  • 21 Jul 2022 01:21 PM (IST)

    President Election Results : मतमोजणी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुर्मू यांच्या घरी भेट देणार

    राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 4 वाजता द्रौपदी मुर्मूच्या घरी भेट देणार आहेत.

  • 21 Jul 2022 01:16 PM (IST)

    President Election Results : संसदेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे

  • 21 Jul 2022 01:10 PM (IST)

    Presidential Election Results 2022 India : यशवंत सिन्हा यांचे आश्वासन राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया संसदेत सुरू

  • 21 Jul 2022 01:03 PM (IST)

    Presidential Election Results 2022 India : यशवंत सिन्हा यांचे आश्वासन

    राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा निवडून आले तर नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होणार नाही याची काळजी घेईन.

  • 21 Jul 2022 12:56 PM (IST)

    president election 2022 result date : द्रौपदी मुर्मूच्या गावात जल्लोषाची जय्यत तयारी

    देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे गाव भावनेश्‍वरपासून 260 किमी अंतरावर आहे. त्यांचे गावकरी आधीच त्यांच्या विजयाचा दावा करत आहेत. अशा स्थितीत तेथे जल्लोषाची तयारी सुरू आहे. तिथे मिठाईवाल्यांनी मिठाई बनवायला सुरुवात केली आहे.

  • 21 Jul 2022 12:53 PM (IST)

    president election 2022 result date : द्रौपदी मुर्मू यांनी सकाळी एक ट्विट केल आहे

  • 21 Jul 2022 12:47 PM (IST)

    presidential election results date : यशवंत सिन्हा यांनी मतमोजणीपूर्वी केंद्रावर हल्लाबोल

    राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी यशवंत सिन्हा यांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे. राजकीय नेत्यांचा अपमान ईडीचा मी ईडीचा तीव्र निषेध करतो. संचालनालयाचे अधिकारी सोनिया गांधी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रश्न विचारू शकतात.

  • 21 Jul 2022 12:40 PM (IST)

    who won presidential election in india 2022 : मुर्म यांचे अभिनंदन करण्यासाठी केंद्रीय नेते दिल्लीत दाखल

    पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती झाल्यामुळे केवळ आदिवासीच नाही, तर देशातील प्रत्येकाला अभिमान वाटेल. मला कळले आहे की सर्व प्रमुख आदिवासी नेते मुर्मू यांचे राष्ट्रपती होण्याची शक्यता असल्याने अभिनंदन करण्यासाठी दिल्लीत येत आहेत असं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं.

  • 21 Jul 2022 12:35 PM (IST)

    presidential election results live : भारताच्या पुढील राष्ट्रपतीसाठी मतमोजणी लवकरच सुरू होणार आहे

    भारताच्या पुढील राष्ट्रपतीसाठी मतमोजणी लवकरच सुरू होणार आहे.  मतमोजणी संसदेत मतपेट्यांची वर्गवारी केली जात आहे

  • 21 Jul 2022 12:30 PM (IST)

    presidential election results date : द्रौपदी मुर्मू यांची थोडक्यात माहिती

    भारतातील राष्ट्रपती पदावर विराजमान होणार्‍या द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला आहेत. ओडिशाच्या दुर्गम मयूरभंज जिल्ह्यातील संथाल गावातून आलेली आणि राज्य सरकारी कर्मचार्‍यापासून,शालेय शिक्षक, राजकारणी ते भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राज्यपालापर्यंत मुर्मूची अनेक संघर्षातून मुर्मू या आल्या आहेत. आता त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. ओडिशातील 4.5 कोटी लोकांसाठी मुर्मू राज्याचा आहे ही आनंदाची बाब आहे.

  • 21 Jul 2022 12:17 PM (IST)

    नँशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची चौकशी

    सोनिया गांधी ईडी कार्यलयात हजर

    ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

    दिल्लीसह महाराष्ट्रातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

    नँशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी सुरू

  • 21 Jul 2022 11:58 AM (IST)

    काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज ईडी चौकशी होणार

    काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज ईडी चौकशी होणार

    ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

    दिल्लीसह महाराष्ट्रातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

    नँशनल हेराल्ड प्रकरणात होणार चौकशी

    सोनिया गांधी आणि राहुल गांधीवर गैरव्यवहाराचा आरोप.

    ईडी कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात

    चौकशीसाठी सोनिया गांधी येणार का ? अजूनही स्पष्टता नाही

  • 21 Jul 2022 11:45 AM (IST)

    presidential election results date : देशातील प्रत्येकाला अभिमान वाटेल असा क्षण

    केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणतात “फक्त आदिवासीच नाही तर देशातील प्रत्येकाला पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती मिळाल्याने अभिमान वाटेल”

  • 21 Jul 2022 11:33 AM (IST)

    president election 2022 result date : सकाळी 11 वाजता राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

    सकाळी 11 वाजता राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. आज देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. दरम्यान, दुपारी 2.30 वाजता पीएम मोदी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

  • 21 Jul 2022 11:28 AM (IST)

    presidential election 2022 live : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला विजयाचा विश्वास आहे

    राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला विजयाचा विश्वास आहे. पक्षानेही विजयी मिरवणुकीची तयारी सुरू केली आहे. एवढेच नाही तर द्रौपदी मुर्मूच्या विजयानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 3 किमी लांबीचा रोड शो करणार आहेत. या कार्यक्रमात अनेक केंद्रीय मंत्रीही सहभागी होणार आहेत.

  • 21 Jul 2022 11:20 AM (IST)

    Presidential Election Results : 34 विरोधी पक्षांचा यशवंत सिन्हा यांना पाठिंबा

    34 विरोधी पक्षांचा यशवंत सिन्हा यांना पाठिंबा…

    काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह जवळपास 34 विरोधी पक्ष सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत.

  • 21 Jul 2022 11:18 AM (IST)

    Presidential Election Results 2022 LIVE : काहीवेळापुर्वी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

    सकाळी 11 वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. भारताचा पुढील राष्ट्रपती कोण असेल हे जाणून घेण्याच्या आम्ही एक पाऊल जवळ आलो आहोत. विविध पक्षांनी दिलेला पाठिंबा पाहता, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना या निवडणुकीत विरोधी पक्षातील यशवंत सिन्हा यांच्यावर स्पष्ट आघाडी मिळाली आहे. निवडून आल्यास, मुर्मू देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणार्‍या पहिल्या आदिवासी महिला ठरतील.

  • 21 Jul 2022 10:53 AM (IST)

    थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात, कोण होणारे देशाचे 15 वे राष्ट्रपती?

    थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात

    कोण होणारे देशाचे 15 वे राष्ट्रपती?

    देशासह अवघ्या जगाचं लक्ष

  • 21 Jul 2022 10:50 AM (IST)

    राज्यात सत्तांतर, राजकीय पेच कोर्टात. उल्हास बापट म्हणतात…

    सध्याच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात खूप मोठे घटनात्मक प्रश्न निर्माण झालेत

    त्यामुळे घटनात्मक पीठ तयार करून हे प्रश्न कायमचे संपवून टाकणं हा सुप्रीम कोर्टाचा उद्देश असायला हवा

    सध्या परिस्थितीत राज्यपाल खूप मोठ्या प्रमाणात अडवणूक करत आहेत असं घटनेचा प्राध्यापक म्हणून वाटतं त्यामुळे राज्यपालांचे अधिकार काय हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करणे गरजेचे आहे

    पक्षांतर बंदीच्या कायद्यामध्ये घटनादुरुस्ती करून बदल करायला हवा किंवा सुप्रीम कोर्टाने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करायला हवी

    शिंदे गटाचा जो दावा आहे त्याला या क्षणाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळालेली नाही सुप्रीम कोर्टानेही याच्यावर काहीही बोललेलं नाही त्यामुळे शिंदे गटात कायद्याचं स्थान काय हे अजूनही अनिश्चित आहे

    त्यामुळे सुप्रीम कोर्टाने घटनापीठ स्थापन करून एकदा निश्चित करावं कारण या घटना यापुढेही वारंवार घडणार आहेत

    त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एकदा निर्णय दिला की तो कायदा होतो तो सर्वांना बंधनकारक राहतो

    शिवसेना कोणाची हे ठरवण्यासाठी आधी निवडणूक आयोगाकडे जावं लागेल आणि यामध्ये शेवट काय बरोबर काय नाही हे सुप्रीम कोर्ट ठरवणार

  • 21 Jul 2022 10:47 AM (IST)

    आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

    आदित्य ठाकरेंनी उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात गेला वाहून

    पूर्वी प्रमाणेच लाकडी बल्ल्यावरून पाण्याचे हंडे घेऊन जात महिलांना करावी लागतेय कसरत

    आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

  • 21 Jul 2022 10:30 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस बालिश, पाच वर्षांनंतर त्यांना राजकारणात किंमत राहणार नाही- अनिल गोटे

    धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे शिवसेना नेते संजय राऊतांच्या भेटीला

    दिल्लीतील निवासस्थानी घेतली भेट

    शिवसेना आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केली

    दोन जणांच मंत्रीमंडळ घटनाबाह्य

    यामध्ये राज्यपाल, राज्याचे सचिव ,मुख्यमंत्री, दोषी आहेत

    दोन जणांची कँबिनेट बोलावणं हे लोकशाहीला कलंकित करणार आहे

    देवेंद्र फडणवीस बालिश आहेत

    मुख्यमंत्री पदासाठी खूप आसुसलेले आहेत

    अजित पवार म्हटले तुम्ही मुख्यमंत्री गेले पहाटेच शपथ घ्यायला

    पाच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीसांना राजकारणात किंमत राहणार नाही

    शरद पवारांनी शिवसेना फोडली नाही अशी कोणी सुपारी देत नाही

    पवारांना करायचं असतं तर मागेच केलं असत

    आज सहज संजय राऊतांची भेट घेतली, असं गोटे म्हणालेत

  • 21 Jul 2022 10:26 AM (IST)

    खासदार विनायक राऊत यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं

    खासदार विनायक राऊत यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं

    विनायक राऊत म्हणतात-

    काल लोकसभा पोर्टलवर गटनेता म्हणून नवीन नाव वाचायला मिळालं

    यापूर्वी माझी निवड करण्यात आली होती

    आम्ही यापूर्वी 18 जुलै रोजी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं होतं

    पण आमच्या पत्राची दखल न घेता त्यांनी बदल केला

    पण हा निर्णय त्यांनी 18 जुलै लाच घेतला

    19 जुलै ला त्यांनी हा बदल केला

    पण बदल केल्याचं पत्र आदल्या दिवशी काढलं

    अंमलबजावणी आधी झाली,यात पक्षपातीपणा झालाय

    आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत

    गटनेता पदाबाबत निर्णय घाईघाईने घेतला

    हा एकतर्फी निर्णय आहे

    या बाबत आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहे

  • 21 Jul 2022 10:16 AM (IST)

    द्रोपदी मुर्मु चांगल्या मतांनी विजयी होतील, संजय राऊतांना विश्वास

    द्रोपदी मुर्मु चांगल्या मतांनी विजयी होतील

    आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान होईल

    जो डर गया वो मर गया हे जागतिक सत्य आहे

    ट्टीटवरती प्रतिक्रिया

    ईडीचं समन्स आलेलं मला माहिती नाही

    चौकशीसाठी 27 जाणार का ? विचारलं असता मला माहिती नाही

    द्रोपदी मुर्मु चांगल्या मतांनी विजयी होतील संजय राऊतांची प्रतिक्रिया

  • 21 Jul 2022 09:43 AM (IST)

    राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 मतं मिळणार?

    राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 मतं मिळणार?

  • 21 Jul 2022 09:01 AM (IST)

    आज सकाळी अकरा वाजता मतमोजणीला सुरुवात

    मतमोजणीला अकरा वाजता सुरुवात होणार आहे

    महाविकास आघाडीने आम्हाला अधिक मतं असा दावा केला आहे

  • 21 Jul 2022 08:48 AM (IST)

    यशवंत सिन्हा यांचा थोडक्यात परिचय

    यशवंत सिन्हा यांचा 6 नोव्हेंबर 1937मध्ये पटनाच्या कायस्थ कुटुंबात जन्म झाला. 1960मध्ये ते सनदी अधिकारी बनले. 24 वर्ष सनदी अधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांनी 1984मध्ये आयएएस पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते राजकारणात आले. राजकारणाची सुरुवात त्यांनी जनता पार्टीतून केली. त्यानंतर भाजपमध्ये आले. 1998, 1999, 2009मध्ये ते हजारीबागमधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. नोव्हेंबर 1990 ते जून 1991मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये ते अर्थमंत्री झाले. मोदी सरकार आल्यानंतर 2018मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • 21 Jul 2022 08:48 AM (IST)

    द्रौपदी मुर्मू यांचा थोडक्यात परिचय

    द्रौपदी मुर्मू यांचा ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात 20 जून 1958मध्ये जन्म झाला. त्या आदिवासी संथाल कुटुंबातून येतात. त्यांच्या पतीचं नाव श्याम चरण आहे. त्यांनी शिक्षिका म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी क्लर्क म्हणून नोकरी केली. 1997मध्ये त्या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या. 2000 आणि 2009मध्ये त्या रायगंज विधानसभा मतदारसंघातून दोनदा विजयी झाल्या. मे 2015मध्ये त्या झारखंडच्या राज्यपाल झाल्या.

  • 21 Jul 2022 08:16 AM (IST)

    एकूण किती मतदार आहेत

    एकूण मतदार किती?

    लोकसभा – 543 खासदार

    राज्यसभा – 233 खासदार

    विधानसभा – 4120 आमदार

  • 21 Jul 2022 08:15 AM (IST)

    मताचं गणित असं असणार

    मतांचं गणित काय?

    एकूण मते – 10, 79, 206

    एनडीए- 5, 26, 420

    यूपीए- 2, 59, 892

    इतर- 2,92, 442

    विजयासाठी आवश्यक मते – 5,49, 442

  • 21 Jul 2022 07:05 AM (IST)

    18 जून रोजी मतदान झालं

    राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी म्हणजे 18 जून रोजी मतदान झालं. यावेळी 98.90 मतदान झालं. 727 खासदार आणि 9 आमदारांसह एकूण 736 लोकप्रतिनिधींना संसद भवनात मतदानाला परवानगी देण्यात आली होती.

  • 21 Jul 2022 06:46 AM (IST)

    निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे

    राष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाल्यापासून राष्ट्रपती पद कोणाकडे जाणार याची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. आज दिवसभरात जाहीर होईल. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (NDA) द्रौपदी मुर्मू आणि संयुक्त पुरोगामी आघाडीकडून (UPA) यशवंत सिन्हा यांनी निवडणूक लढवली होती. निवडणूक अटीतटीची होणार असल्याने सगळ्यांचं लक्ष निकालाकडे आहे.

Published On - Jul 21,2022 6:39 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.