Amol Mitkari : तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते; अमोल मिटकरी असं का म्हणाले?

Amol Mitkari : आपण एक वेळेस समजू शकतो 40 आमदार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेले. मात्र अब्दुल सत्तार कशाला गेले हे मोठ कोडं आहे. सत्तार यांचं कोणतं हिंदुत्व धोक्यात आलं होतं? असा चिमटाही त्यांनी काढलाय.

Amol Mitkari : तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते; अमोल मिटकरी असं का म्हणाले?
तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते; अमोल मिटकरी असं का म्हणाले? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 9:37 AM

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर मोठं भाष्य केलं आहे. ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल, त्या दिवशी हे 16 आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळले. त्यामुळे महाराष्ट्रात (maharashtra) राष्ट्रपती राजवट (presidential rules) लागू शकते, असं भाकीत अमोल मिटकरी यांनी केला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवरही टीका केली. शिंदे गटाचे आमदार म्हणतात आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर शिंगावर घेऊ. मग आता बैलांवर लिहिलं 50 खोके, एकदम ओके. पान टपरीवर चुना लावणारे गद्दार निघाले, अशी खरमरीत टीका करतानाच भाजपच्या 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडे यांचं नाव नाही हे दुर्देव आहे, असंही मिटकरी यांनी सांगितलं.

बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. या यात्रेला संबोधित करताना अमोल मिटकरी यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. अधिवेशनाच्या पायऱ्यांवर 50 खोके आणि एकदम ओके असं म्हटलं. लहान लहान मुलं देखील म्हणतात पन्नास खोके एकदम ओके. त्या खोक्यात बिस्किट असू शकतात इंजेक्शन असतात. तुम्हाला का एवढं लागल? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला.

सोमय्यांसारखा महानव महाराष्ट्रात

अमोल मिटकरी यांनी यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही हल्ला चढवला. किरीट सोमय्यांसारखा महामानव आपल्या महाराष्ट्रात आहे, असं म्हणत मिटकरी यांनी तोतरे बोलत सोमय्यांची खिल्ली उडवली. प्रताप सरनाईक आता जेलमध्ये जातील, असं सोमय्या सांगत होते. ते तर शिंदे गटात गेले. यशवंत जाधव भाजपमध्ये गेले. वॉशिंग पावडर निरमा. भावना गवळीताईंनी तर शिवबंधन काढून मोदीजींना राखी बांधली. ईडी पिडा टळो असे म्हटले असेल. त्या पण झाल्या वाशिंग पावडर निरमा सारख्या साफ झाल्या, अशी टीका त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

कोण हा मोहित कंबोज?

सिस्टीम ठरलेली आहे. मोहित कंबोजचा भोंगा म्हणतो, अब महाकाल आयेगा. कोण हा मोहित कंबोज? कृपाशंकर सिंह यांच्या दयेवर महाराष्ट्रात आला. महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असा हल्ला त्यांनी चढवला.

सत्तारांचं कोणतं हिंदुत्व धोक्यात आलं?

यावेळी त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही टीका केली. आपण एक वेळेस समजू शकतो 40 आमदार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेले. मात्र अब्दुल सत्तार कशाला गेले हे मोठ कोडं आहे. सत्तार यांचं कोणतं हिंदुत्व धोक्यात आलं होतं? असा चिमटाही त्यांनी काढलाय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.