Sanjay Raut | त्यादिवशी मी अमित शाहांना फोन केला, राऊतांनी त्यारात्रीचं गोपनीय संभाषण उघडपणे सांगितलं

साहेबांची प्रेरणा आमच्या मागे आहे. आम्ही आधीही म्हटलं होतं. आता पुन्हा सांगतो. डरेंगे नहीं, झुकेंगे नाही.... महाराष्ट्रात ठाकरे सरकारच राहणार.. तेव्हा हे घाबरवणारे कुठे असतील, ते बघून घेऊ, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

Sanjay Raut | त्यादिवशी मी अमित शाहांना फोन केला, राऊतांनी त्यारात्रीचं गोपनीय संभाषण उघडपणे सांगितलं
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 5:19 PM

मुंबई| शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवनातून भाजपच्या दबावतंत्रविरोधात तोफा डागल्या. भाजपच्या किरिट सोमय्या यांच्यावर विशेष भर देत संजय राऊत यांनी एकामागून एक पुरावे दाखवत ईडीच्या वसुली एजंटांची नावं जाहीर केली.  ईडीच्या माध्यमातून भाजपने महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे ईडी (ED) चौकशीचा ससेमिरा लावला आहे, त्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला. मात्र मी कोणताही गुन्हा, कोणताही गैर व्यवहार केलेला नाही. त्यामुळे असा कोणताही तुरुंग नाही, जो मला दोन वर्षे ठेवू शकेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. ईडीच्या या कारवायांपुढे आम्ही झुकणार नाहीत, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. ईडीचे अधिकारी मित्र, नातेवाईकांच्या घरी छापे मारत होते, त्या दिवशी रात्री आपण अमित शाह (Amit Shah) यांना फोन केल्याचा किस्सा संजय राऊत यांनी सांगितला.

त्या रात्री मी अमित शहांना फोन केला…

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना म्हटले, ‘ईडीचे अधिकारी माझे नातेवाईक, मित्र, मुलगा, मुलगी यांना फोन करून धमकावतात. नातेवाईकांवर, मित्रांवर छापे टाकतात. अरे लहान मुलांनाही धमकावतात. तुमच्या वडिलांना उद्या ईडीच्या चौकशीसाठी जावे लागणार. अटक होणार म्हणून. ज्या दिवशी माझ्या नातेवाईकांच्या घरावर ईडीचे छापे सुरु होते, त्याच दिवशी रात्री मी अमित शाह यांना फोन केला होता. जे सुरु आहे, ते चांगलं नाही म्हटलं. तुमची माझ्याशी दुश्मनी आहे तर मला टॉर्चर करा. पण तुम्ही माझ्या जवळच्या लोकांना टार्गेट करताय हे चुकीचं आहे. ”

80 वर्षाच्या म्हाताऱ्याला पकडून नेलं..

ईडीचे अधिकारी चौकशीसाठी कुणालाही कधीही घेऊन जात आहेत, असा आरोप करताना संजय राऊत म्हणाले, त्यांनी एक दिवस 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला पकडून नेलं. मागील अनेक वर्षांपूर्वीच्या एका व्यवहाराची चौकशी करू लगाले. तो म्हणाला, मला खरच काहीच आठवत नाही. तेव्हा ईडीवाल्यांनी त्यांच्यावर दबाव आणला. म्हणाले, तू यहाँ मरेगा, घर नही जाएगा..’ अशी वागणूक देण्याची ही काय पद्धत आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

डरेंगे नही, झुकेंगे नहीं- संजय राऊत

ईडीच्या या कारवायांपुढे आम्ही झुकणार नाहीत, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. ते म्हणाले, ईडीवाले कुणालाही धमकावतात. चौकशीसाठी घेऊन जातात. पण आधी म्हटल्याप्रमाणं हे शिवसेना भवन आहे. साहेबांची प्रेरणा आमच्या मागे आहे. आम्ही आधीही म्हटलं होतं. आता पुन्हा सांगतो. डरेंगे नहीं, झुकेंगे नाही…. महाराष्ट्रात ठाकरे सरकारच राहणार.. तेव्हा हे घाबरवणारे कुठे असतील, ते बघून घेऊ, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

इतर बातम्या-

ईडी सुनो, मै नंगा आदमी हुँ, जितेंद्र नवलानी कौन है, राऊतांनी ईडीच्या वसुली एजंटांची मांडली कुंडली!

International Childhood Cancer Day: आजही जगात लाखो मुलांचा मृत्यू कर्करोगामुळे होता, वेळीच जाणून घ्या लक्षणं , कॅन्सरही बरा होता, फक्त एवढच करा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.