पंतप्रधान मोदी यांनी 9 वर्षांत फक्त हे काम केलं, नाना पटोले यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. दुसऱ्याची घर फोडायची ही भाजपची नीती आहे. विधानपरिषद निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी यांनी 9 वर्षांत फक्त हे काम केलं, नाना पटोले यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका
नाना पटोले
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 5:12 PM

मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) अखेर स्पष्टता आली. सत्यजित तांबे (Satyajit Tambe) हे अपक्ष उमेदवार आहेत. भाजपनं त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला नाही. तर, भाजपातून ठाकरे गटाच्या शिवसेनेत गेलेल्या शुभांगी पाटील यांना आता महाविकास आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असतील. नाशिक विभाग हा काँग्रेस विचाराचा आहे. सुधीर तांबे यांची स्पष्टता झाली. त्यामुळं आता महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व लोकं एकसंघ काम करतील, अशी अपेक्षा नाना पटोले ( Nana Patole ) यांनी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट झाली. गोंधळ कुणी झाला, यावर बोलणार नाही. पाचही महाविकास आघाडीची नाव आम्ही जाहीर केले, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये भाजपचा उमेदवार नाही

नाशिकमध्ये भाजपचा गोंधळ आता स्पष्ट होणार आहे. भाजपला उमेदवार मिळाला नाही. भाजपचा उमेदवार तिथं नाही. त्यामुळं त्यांचा काय गोंधळ होतो, हे पाहावं लागेल, असंही पटोले म्हणाले.

या पत्रकार परिषदेला विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. अंबादास दानवे म्हणाले, विक्रम काळे औरंगाबादमध्ये उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मी दहा तालुक्यांत फिरतो.

नाना पटोले यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. दुसऱ्याची घर फोडायची ही भाजपची नीती आहे. विधानपरिषद निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासकामांचं उद्घाटन करतात. पंतप्रधान पदाच्या गरिमेला भाजप धक्का देत असल्याचं पटोले म्हणाले.

मोदी यांनी गेल्या ९ वर्षात भाजपच्या प्रचाराव्यतिरिक्त काही केलं नाही. येते आल्यानंतर त्यांनी राज्याच्या जनतेला उत्तर द्यावं. राज्यातला शेतकरी आत्महत्या का करतो. याची उत्तरं पंतप्रधानांनी द्यावं. नुसत्या घोषणा चालणार नाही, असा सवालही नाना पटोले यांनी विचारला.

जाहिरातीसाठी राज्याच्या तिजोरीची लूट

राज्याच्या तिजोरीची लूट जाहिरातीच्या माध्यमातून केली जात आहे. मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे. आता बॅनरबाजी खूप झाली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केली.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.