नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे त्यांच्या संवादामुळे कायम चर्चेत राहतात. यावेळी ही ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत असून त्यांनी आपल्यावर माझ्यावर असे संस्कार तसे झाल्याचे म्हटले आहे. ते टोकियोमध्ये (Tokyo) भारतीय समुदायाला संबोधित करत होते. यावेळी मोदी म्हणाले, मला लोणीवर (butter) रेषा काढण्यात मजा येत नाही, मी दगडांवर रेषा काढतो. माझ्यावर असे संस्कार आहेत की मी नेहमी मोठ्या आव्हानांसाठी आणि ध्येयांसाठी काम करतो. ते म्हणाले की, आज भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना आम्ही येत्या 25 वर्षांचा आराखडाही तयार करत आहोत. आम्ही खूप मोठे संकल्प घेतले आहेत, जे कठीण वाटतात. पण मला मिळालेली मुल्ये आणि ज्या लोकांनी मला घडवले त्यांच्याकडून हा गुण मला मिळालेला आहे.
#WATCH | Because of the teachings I have got in my life, I have developed a habit that “Mujhe makhan par lakeer karne mein maza nahi aata hain, main patthar par lakeer karta hoon,” said Prime Minister Narendra Modi interacting with the Indian diaspora in Tokyo pic.twitter.com/vjODOVYNVK
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 23, 2022
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मला लोण्यावर रेषा काढण्यात मजा येत नाही, मी दगडांवर रेषा काढतो. माझ्यासोबत 130 कोटी देशवासीयांचा आत्मविश्वास, संकल्प आणि स्वप्ने आहेत. त्यांची पूर्तता करण्याची आमच्यात अफाट क्षमता आहे आणि त्याचा परिणाम नक्कीच होईल. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत जागतिक पुरवठा साखळी बिघडली असून त्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भविष्यात हे संकट टाळण्यासाठी आम्ही स्वावलंबनाच्या संकल्पाकडे वाटचाल करत आहोत. आमची ही गुंतवणूक केवळ भारतासाठी नाही तर जागतिक पुरवठा साखळीसाठी आहे. आज संपूर्ण जगाला हे जाणवत आहे की भारत ज्या गतीने आणि ज्या प्रमाणात काम करू शकतो ते अभूतपूर्व आहे.
आपण पायाभूत सुविधा आणि संस्थांच्या उभारणीसाठी किती वेगाने काम करत आहोत हेही जगाने पाहिले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेटसह अनेक प्रकल्प भारत आणि जपान यांच्यातील सहकार्याची उदाहरणे आहेत. तसेच पंतप्रधान म्हणाले, ‘भारतातील बदलांचे कारण म्हणजे आपण मजबूत लोकशाहीची ओळख निर्माण केली आहे. आणि ती लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आज ते लोकही देशाच्या लोकशाही व्यवस्थेत सामील होत आहेत. ज्यांचा आपणही एक भाग आहोत यावर कधी विश्वास नव्हता. भारतीय निवडणुकांमध्ये आता पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त मतदान करत आहेत. भारतातील लोकशाही सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी किती जागरूक आणि समर्पित आहे, याचे उदाहरण आहे.
हर हर महादेव आणि भारत माता की जय अशा घोषणा देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भारताचा गमावलेला विश्वास परत मिळत आहे. आज जगभरात पसरलेला कोणताही भारतीय भारताबद्दल मोठ्या अभिमानाने बोलत आहे. हा बदल आला आहे. आज खादी ग्लोबल झाली आहे. भारताच्या हळदीला जगभरात मागणी आहे. आजच्या भारताला त्याच्या भूतकाळाचा जितका अभिमान आहे. तंत्रज्ञान आणि प्रतिभेवर तितकाच विश्वास आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, आपण भारतीयांनी एकदा तरी जपानला भेट दिली पाहिजे. पण आज मी म्हणेन की जपानच्या प्रत्येक तरुणाने भारताला भेट दिलीच पाहिजे.
कोरोनाच्या काळात आपल्या सरकारच्या कामाची मोजदाद करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर अंतर्गत कोरोनाच्या काळातही लोकांना थेट मदत केली. या कठीण परिस्थितीतही भारताची बँकिंग व्यवस्था अखंडपणे सुरू होती. याचे कारण भारतातील डिजिटल क्रांती. आपल्या लोकांना हे जाणून आनंद होईल की संपूर्ण जगात जे डिजिटल व्यवहार होतात त्यापैकी 40 टक्के व्यवहार एकट्या भारतातून होतात. कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, सर्व काही बंद असतानाही, भारत सरकार एका क्लिकवर बटण दाबून करोडो भारतीयांपर्यंत पोहोचत होते. एवढेच नाही तर कोणासाठी मदत होती, ती वेळेवर मिळाली आणि दिली गेली. आज भारतात लोकांचे नेतृत्व करणारे शासन आहे. त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वाढला आहे.