मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन, तृणमूल काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
नवी दिल्ली : केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (19 मे) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे म्हणत, तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मोदींविरोधात तक्रार केली आहे. तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहत मोदींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेसाठी गेले […]
नवी दिल्ली : केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (19 मे) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे म्हणत, तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मोदींविरोधात तक्रार केली आहे. तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहत मोदींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेसाठी गेले आहेत. केदारनाथ येथे पूजा केल्यानंतर ते छत्री आणि छडी घेऊन पायी गरुडचट्टीसाठी रवाना झाले. या दौऱ्याला प्रसारमाध्यांकडून मोठी प्रसिद्धी देण्यात आली होती. त्यावेळी मोदींनी केदारनाथच्या विकासाच्या प्लॅनची घोषणा केली होती. मोदींच्या या घोषणेमुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे मोदींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
#WATCH PM Modi in Kedarnath, “I have had a special relationship with Kedarnath. After 2013 natural tragedy, we have made a master-plan for the re-development for Kedarnath.” pic.twitter.com/s2jla0XnFW
— ANI (@ANI) May 19, 2019
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ आणि ब्रदीनाथ यात्रेसाठी गेले होते. यावेळी त्यांनी जवळपास 18 तास एका गुफेमध्ये ध्यानधारणा केली. या ध्यानधारणेनंतर मोदींनी आज (19 मे) सकाळी केदारनाथ मंदीरात पूजा केली. या पूजेनंतर मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला.
PM Modi at Kedarnath says, “I want people of our nation to see the country. While, I don’t have any objection to them travelling to foreign countries but they should also travel to see the different places in our country.” pic.twitter.com/porDMyYlgx
— ANI (@ANI) May 19, 2019
देवदर्शनला आल्यानंतर मी देवाकडे काही मागत नाही, देवाकडे काही मागण्यावर माझा विश्वास नाही, देवाने आपली निर्मिती देण्यासाठी केली आहे, मागण्यासाठी नाही असे मत मोदींनी व्यक्त केले.
निवडणुकीच्या धामधुमीनंतर मला येथे ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली. आध्यात्मिक क्षेत्राला जाण्याची संधी मिळाली. केदारनाथच्या विकासासाठी कामं सुरु आहेत, या विकासकामांवर माझे कायम लक्ष असते, असही त्यांनी यावेळी म्हटलं.
#WATCH Prime Minister Narendra Modi greets devotees at Kedarnath temple. pic.twitter.com/7ExtXokdw4
— ANI (@ANI) May 19, 2019
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ धामला भेट देत महादेवाचे दर्शन घेतले, तसेच येथे पूजाविधीही केला. गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान मोदींचा हा चौथा केदारनाथ दौरा आहे. त्याशिवाय नरेंद्र मोदींनी बद्रिनाथ मंदिरातही दर्शन घेतलं.
संबंधित बातम्या :
पंतप्रधान मोदी ध्यान धारणेसाठी गरुडचट्टीवर, 34 वर्षांपूर्वीही याच ठिकाणी तपस्या