Narendra Modi : एक फोटो हजारो शब्दांपेक्षा जास्त बोलतो! पंतप्रधान मोदींचा हा फोटो त्यापैकी एक…
Narendra Modi Viral Photo : पीएमओकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं मोदी काय करताना दिसले? तुम्हीच पाहा..
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Video News) हे एक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व आहे. मोदी (PMO) हे सर्वाधिक पाहिलं, ऐकलं जाणारं व्यक्तिमत्त्व असल्याच्या नोंदी अनेक सर्वेक्षणांनी नोंदवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हावभावाकडे, हालचालींकडे, कृतीकडे कॅमेऱ्यांचं बारीक लक्ष असतं. आता नरेंद्र मोदी यांचा एक फोटो (Narendra Modi Photo News) समोर आला आहे. हा फोटो हजारो शब्दांपेक्षा जास्त बोलका आहे. शेकडो लोक यावर असंख्य शब्दांत व्यक्त होतील, अशी किमया या फोटोत आहे. विरोधक-समर्थक प्रत्येकजण या फोटोवर व्यक्त होईल. नव्हे व्यक्त व्हायला सुरुवात झालेलीच आहे. त्यामुळे हा फोटो तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर फटाफट या फोटो मागची बातमीही जाणून घेऊयात..
नेमका कुठचा फोटो?
दिल्लीमध्ये एक बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोदींच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. दिल्लीतील प्रगती मैदान इंटिग्रेटेड ट्रान्झिंट कॉरीडोर येथे खास कायर्क्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा ठिकाणची पाहणी करताना मोदींनी आजूबाजूच्या परिसरात पडलेला पाला-पाचोळा, एक प्लास्टिकची बाटली आपल्या हाताने उचलली.
व्हिडीओही बघा
याबाबतचा एक तीस सेकंदाचा व्हिडीओही एएनआयने शेअर केला आहे. पीएमओकडून हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं मोदी काय करताना दिसले? तुम्हीच पाहा..
#WATCH | Prime Minister Narendra Modi picks up litter at the newly launched ITPO tunnel built under Pragati Maidan Integrated Transit Corridor, in Delhi
(Source: PMO) pic.twitter.com/mlbiTy0TsR
— ANI (@ANI) June 19, 2022
याकडे लक्ष गेलं का?
दरम्यान, यावेळी मोदींच्या आजूबाजूला कुणीच नव्हतं. सुरक्षा रक्षकही व्हिडीओमध्ये दिसून आलेले नाहीत. या भोगद्या पाहणी करतानाच्या या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी एकटेच दिसून आलेलेत. सुरक्षेच्या कारणास्तव ही काळजी घेण्यात आल्याचाही तर्क लढवला जातोय.
या कार्यक्रमावेळी मोदी काय म्हणाले? : पाहा व्हिडीओ
Pragati Maidan Integrated Transit Corridor will ensure ease of living by helping save time and cost of commuters in a big way. https://t.co/e98TMk3z0i
— Narendra Modi (@narendramodi) June 19, 2022
समुद्र किनाऱ्यावरची साफसफाई आठवतेय ना?
Plogging at a beach in Mamallapuram this morning. It lasted for over 30 minutes.
Also handed over my ‘collection’ to Jeyaraj, who is a part of the hotel staff.
Let us ensure our public places are clean and tidy!
Let us also ensure we remain fit and healthy. pic.twitter.com/qBHLTxtM9y
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2019
पीएमओकडून जारी करण्यात आलेला हा व्हिडीओ हजारो जणांनी शेअर केला. फेसबुक, ट्वीटरसह वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हा व्हिडीओ शेअर केला जातोय. याआधी मोदींचा महाबलीपूरम समुद्र किनाऱ्यावर कचरा गोळा करतानाही व्हिडीओ समोर आला होता. जवळपास अर्धा तास मोदींनी 12 ऑक्टोबर 2019 रोजी ट्वीट कर स्वच्छता अभियान राबवल्याची माहिती दिली होती.
या पुन्हा एकदा मोदींच्या या दिल्लीतील या व्हिडीओवरुन चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाच्या भूमिकेवर देशातील जनतेचं लक्ष वेधलंय. स्वच्छतेचा आग्रह करणाऱ्या मोदींचा आताचा व्हिडीओ पुन्हा एकदा त्याचीच आठवण करुन देतोय.