पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहेर, विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईची मागणी

भाजपकडून दोन्ही विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलं. मात्र, पक्षाची मतं फुटल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. चव्हाण यांनी या पराभवावरुन आज पक्षाला घरचा आहेर दिलाय.

पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहेर, विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईची मागणी
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 5:01 PM

मुंबई : राज्यातील सत्तांतरापूर्वी पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत (MLC Election) विरोधी पक्षात असलेल्या भाजपनं महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिला होता. विजयी होण्यासाठी लागणारी मतं आपल्याकडे नसतानाही भाजपनं आपले उमेदवार जिंकून आणले. तर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेसची मतं फुटली. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले. मात्र, चंद्रकांत हंडोरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये पक्षाचं एकही मत नसलेले भाजपचे प्रसाद लाड विजयी झाले. भाजपकडून दोन्ही विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलं. मात्र, पक्षाची मतं फुटल्यानं पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांच्यासारखे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. चव्हाण यांनी या पराभवावरुन आज पक्षाला घरचा आहेर दिलाय.

पक्षादेश धुडकावून विरोधकांना मत देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांची नावंही समोर यायला हवी. ही गंभीर घटना विधिमंडळ पक्षात घडलीय. 7 आमदारांनी पक्षाचा आदेश धुडकावला होता. त्यांच्यावर कारवाई करायची की नाही हे सोनिया गांधी ठरवतील. अशा बेशिस्तपणे पक्ष चालणार असेल तर बरोबर महत्वाच्या वेळी काही सदस्य पक्षाला अडचणीत आणतील. अशांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची नावं समोर आणायला हवी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्ष नेतृत्वाकडे केलीय.

विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय घडलं?

राज्यसभा निवडणुकीदरम्यान भाजपनं तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. तेव्हा भाजपनं माघार घ्यावी यासाठी महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांना भेटले. त्यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीने आपला एक उमेदवार मागे घ्यावा. तसं केल्यास भाजप विधान परिषद निवडणुकीवेळी अतिरिक्त उमेदवार देणार नाही, असं फडणवीसांनी सांगितलं. मात्र, त्यावेळी भाजप आणि मविआलातील बोलणी फिस्कटली. विधान परिषद निवडणुकीत भाजपनं आपल्याकडे संख्याबळ नसतानाही पाच उमेदवार दिले. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं प्रत्येकी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र, निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली आणि चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि भाजपचे प्रसाद लाड विजयी झाले.

चंद्रकांत हंडोरेंचाही इशारा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि मुंबईचे प्रभारी, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी चेंबूरमध्ये 24 जुलै रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. तेव्हा आपण आणि आपले कार्यकर्ते ज्यांनी क्रॉस वोटिंग केले त्यांच्यावर नाराज आहोत, कारवाई झाली नाही तर निर्णय घेऊ, असा इशाराच हंडोरे यांनी स्वपक्षीयांना दिला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.