मुंबई: सातारा जिल्ह्यातील रणजितसिंह देशमुख शिवसेनेतून स्वगृही काँग्रेसमध्ये परतले आहेत. मुंबई येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. रणजितसिंह देशमुखांच्या पक्षप्रवेशावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करायचे आहेत, असं वक्तव्य केलं. तर, पृथ्वीराज चव्हाण हे देश पातळीवरील नेते आहेत.आम्हाला त्यांच्या मार्गदर्शानाची गरज असल्याचं थोरात म्हणाले. (Prithviraj Chavan comment on Balasaheb Thorat)
पृथ्वीराज चव्हाण यांनी आमच्याकडून रणजितसिंह देशमुख यांच्यावर अन्याय झाला असल्याचे म्हटले. ते अत्यंत तडफेने काम करतात, असंही चव्हाण म्हणाले. रणजितसिंह यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करताना काँग्रेस पक्ष बळकट करायचा असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहोत. मात्र, त्यातूनही आपल्याला काँग्रेला बळकट करायचं आहे. काँग्रेसला बळकट करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांचेही हात बळकट करायचे आहेत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. (Prithviraj Chavan comment on Balasaheb Thorat)
बाळासाहेब थोरात यांनी यावेळी पृथ्वीराज चव्हाण देश पातळीवरील नेते आहेत, असं म्हटलं. आम्हाला राज्यात काँग्रेसला वाढवण्यासाठी त्यांच मार्गर्शन लागणार आहे, म्हणून साताऱ्यातील जबाबदारी तरुणांनी घेतली पाहिजे, अशी आशा थोरात यांनी व्यक्त केली.
रणजित देशमुख यांनी सूतगिरणी यशस्वी केली, याच काय रहस्य आहे? हे त्यांना विचारावा लागेल. काँग्रेसला पुन्हा एकदा वैभव आणण्याचं काम आपलं आहे. थोड्या अडचणी आहेत पण आपल्याला मेहनत करायची आहे. आपण जनतेसाठी काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही मोठे व्हा पक्ष आपोआप मोठा होईल, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.
रणजितसिंह देशमुख यांच्या पक्षप्रवेशाला गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते.
दरम्यान, रणजितसिंह देशमुख हे सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2007 साली जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर विकासकामं करत माण- खटाव तालुक्यात त्यांनी काँग्रेस पक्षाची पाळुमुळे घट्ट केली. 2003 च्या दुष्काळात सोनिया गांधी यांच्या दुष्काळी तालुक्यांच्या पाहणी दौऱ्याचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सातारा दौरा यशस्वी करण्यामागे तत्कालीन युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता.
काँग्रेसमधील अंतर्गत कलहातून त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आपल्या राजकीय हितसंबधांचा उपयोग करून देशमुख यांनी गत दुष्काळात दोन्ही तालुक्यात सुमारे 70 चारा छावण्या सुरू करून दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा दिला होता.
शिवसेना नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही परतणार, वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार प्रवेशhttps://t.co/SYZEFHwbhK@ShivSena @INCIndia
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 11, 2020
संबंधित बातम्या :
पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी जाहीर; अभिजीत वंजारी, जयंत असनगावकरांना तिकीट
(Prithviraj Chavan comment on Balasaheb Thorat)