भाजपप्रवेशाची ऑफर होती, पण… : पृथ्वीराज चव्हाण
या, आमच्याकडे या, तुमचा चांगला उपयोग होईल, असं गमतीने म्हणत आपल्याला भाजपप्रवेशाची ऑफर आली होती, अशी कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिली.
पुणे : आपल्यालाही भाजपप्रवेशाची ऑफर होती, मात्र ती गंभीर नव्हती, तर गमतीतच होती, (Prithviraj Chavan BJP Offer) अशी कबुली माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कराड दक्षिणमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची तयारी (Prithviraj Chavan BJP Offer) करत असल्याचं स्पष्टीकरणही चव्हाणांनी दिलं.
‘भाजपप्रवेशाची सिरीअस ऑफर नव्हती. पण आपलं गमतीत… या, आमच्याकडे या, तुमचा चांगला उपयोग होईल, पण गमतीने होतं. पण आता अमित शाहांनी मला इतकं सर्टिफिकेट दिलं. (Prithviraj Chavan BJP Offer) आता कोणाच्या सर्टिफिकेटची गरज आहे’ असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
उदयनराजेंविरुद्ध आघाडीचा एक्का बाहेर, पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी?
आपण स्वतः कराड दक्षिणमधून निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं स्पष्टीकरण चव्हाणांनी दिलं. मी गेली पाच वर्ष या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे कराड दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, असं चव्हाणांनी सांगितलं.
उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. यावेळी पृथ्वीराज चव्हाणांना उदयनराजेंविरोधात उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र याबाबत थेट उत्तर देण्याचं त्यांनी टाळलं. पक्ष सांगेल तो आदेश पाळण्याची तयारी पृथ्वीराज चव्हाणांनी दर्शवली. तसंच उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाचा काही परिणाम होणार नाही असंही त्यांनी सांगितलं.
उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने आता सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होण्याची चिन्हं आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली लोकसभेची ही जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan vs Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुढे करण्यात आलं आहे.