जेव्हा शाह-फडणवीसांनी आमीष दाखवूनही विलासकाकांनी भाजपला नकार दिला…

कराडमध्ये विलासकाकांचे पुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या काँग्रेस प्रवेशावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी किस्सा सांगितला होता. Prithviraj Chavan Vilaskaka Patil Undalkar

जेव्हा शाह-फडणवीसांनी आमीष दाखवूनही विलासकाकांनी भाजपला नकार दिला...
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 12:44 PM

कराड : काँग्रेसच्या विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ असलेले माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर (Vilaskaka Patil Undalkar) यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांनी सलग 35 वर्ष कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उंडाळकरांना भाजपप्रवेशासाठी आमीष दाखवलं होतं, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे साताऱ्यातील दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. (Prithviraj Chavan shared Congress leader Vilaskaka Patil Undalkar was lured by BJP)

“विधानसभा निवडणुकांच्या वेळी उदयसिंह पाटील उंडाळकर आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. यामुळे पक्षाची ताकद क्षीण झाली. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या गुरु-चेल्याने राज्यातील दोन्ही काँग्रेसचे (राष्ट्रवादी आणि काँग्रेस) 40 नेते फोडले. साम दाम दंड भेद वापरुन अनेक पक्ष फोडले” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं होतं. कराडमध्ये विलासकाकांचे पुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या काँग्रेस प्रवेशावेळी चव्हाण बोलत होते.

“ज्यांना काँग्रेसची परंपरा आहे त्यांनी काँग्रेस पक्ष सुधारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. विलासकाकांनाही आमिष दाखवले. काकांना स्वातंत्र्य सैनिकी परंपरा आहे. ते आमिषाला बळी पडले नाहीत. सर्व मिळून आता सातारा जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिती सुधारणार आहोत. आजच्या मेळाव्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरली आहे. निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी सुरु केलेले उद्योग पुन्हा सुरु राहिले असते, तर राज्याचे फार नुकसान झाले असते. म्हणून दगडापेक्षा वीट मऊ या हिशोबाने शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.

कृष्णाकाठावर हाडवैराची सांगता

पृथ्वीबाबा आणि विलासकाका या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरु होता. दोघांच्याही राजकीय वैरामुळे अनेकदा काँग्रेसला फटकाही बसला होता. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अपक्ष लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

विलासकाका उंडाळकर कोण आहेत?

काँग्रेसी विचारधारेशी एकनिष्ठ असलेला नेता अशी उंडाळकर यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करत असताना त्यांना सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली होती. या सर्व क्षेत्रात त्यांनी चांगले काम करुन  महाराष्ट्राच्या जडणघडणीला हातभार लावला. (Prithviraj Chavan shared Congress leader Vilaskaka Patil Undalkar was lured by BJP)

विलासकाका उंडाळकर तब्बल 7 टर्म म्हणजेच सलग 35 वर्षे माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर हे कराड दक्षिणचे आमदार राहिले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये चव्हाण विजयी होऊन ते कराड दक्षिणचे आमदार झाले होते.

काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील उंडाळकर हे राजकीय विरोधक पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. विलासकाका पाटील उंडाळकर यांचा बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.

संग्रहित व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन

पृथ्वीबाबा विरुद्ध विलासकाका : कृष्णाकाठावर हाडवैराची सांगता !

“आता एकच अजेंडा…” काँग्रेसप्रवेशानंतर उदयसिंह पाटलांचा निर्धार, पृथ्वीबाबा-विलासकाका एकत्र

(Prithviraj Chavan shared Congress leader Vilaskaka Patil Undalkar was lured by BJP)

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....