तुमचा तर पॉर्न कँडिडेटला पाठिंबा, त्यावर काय म्हणाल?; प्रियंका चतुर्वेदी यांचा भाजपला थेट सवाल
ठाकरे गटाला राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल करत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या एका जाहिरातीमुळे वातावरण चांगलंच तापलं. मात्र त्यांच्या या टीकेला प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
ठाकरे गटाला राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल करत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या एका जाहिरातीमुळे वातावरण चांगलंच तापलं. मात्र त्यांच्या या टीकेला आता शिवसेना नेत्या, राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिल आहे. तुमचा तर पॉर्न कँडिडेटलाच पाठिंबा आहे, त्याबद्दल काय म्हणाल ? असा सवाल विचारत चतुर्वेदी यांनी भाजपावर पलटवार केला आहे. कर्नाटकमधील सेक्स स्कँडलने संपूर्ण देशच हादरला आहे, त्याचाच दाखल देत प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपावर टीका केली आहे.
काय आहे प्रकरण ?
कर्नाटकातील भाजपा-जेडीएस आघाडीचे उमेदवार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना वादात अडकला आहे. त्याचे काही काही आपत्तीजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल. हे सर्व अश्लील व्हिडीओ आहेत. या व्हिडीओमुळे कर्नाटकातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या व्हिडीओमध्ये कथितरित्या प्रज्वल दिसत आहे. जनता दल सेक्युलरचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी या व्हिडीओद्वारे महिलांना ब्लॅकेमेल केल्याचा आणि त्यांचं शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या घरातील एका मोलकरणीनेच हा प्रकार उघडकीस आणला आणि एकच खळबळ माजली. दरम्यान हा प्रकार उघडकीस येताच रेवन्ना हे देशाबाहेर पळून गेल्याचे समोर आले. ते जर्मनीमध्ये असल्याचे वृत्त आहे. या एकंदर प्रकरणावरूनच देशातील वातावरण तापले आहे.
काय म्हणाल्या प्रियांका चतुर्वेदी ?
चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर केलेल्या आरोपाला प्रत्युतर देत शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रज्वल रेवन्ना प्रकरणावरून भाजपावर निशाणा साधला. तुम्ही तर पॉर्न कँडिटेट उभा केलाय त्यावर तुमचं काय म्हणणं आहे ? प्रज्वलबद्दल पंतप्रधान काहीच का बोलत नाहीत ? अमित शाह हासनमध्ये का नाही गेलेत? असा प्रश्न त्यांनी विचारला. भाजपनं प्रज्वल याला परदेशात जायला मदत केली, असा आरोपही त्यांनी केला. जरा लाज वाटू द्या आणि बुडून मरा तुम्ही, असं म्हणत चतुर्वेदी यांनी भाजपावर टीका केली
चित्रा वाघ यांचे आरोप
शिवसेना ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर भाजपाने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गट हा महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये महिला अत्याचारासंबंधी प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यावरून चित्रा वाघ यांनी निशाणा साधला. ठाकरे गटाच्या जाहिरातीतील एक माणूस महिला अत्याचार कधी थांबणार असा प्रश्न विचारतोय. पण त्याचे ‘उल्लू’ ॲपवरील एका वेबसीरिजमध्ये नको ते कृत्य करतानाचे व्हिडीओ, क्लिप्स आहेत. अशा माणसाला घेऊन त्यांनी ( ठाकरे गटाने) महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली ‘ असा सवाल वाघ यांनी विचारला. महाराष्ट्रामध्ये पब, पार्टी आणि पॉर्न असा किळसवाणा प्रकार आणला जातोय, त्याबद्दल आम्हाला उद्धव ठाकरेंना जाब विचारायचा आहे असंही चित्रा वाघ म्हणाल्या.