Profile of NCP Ministers : राष्ट्रवादीच्या 10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्र्यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा

महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळविस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या 12 आणि काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनीही शपथ घेतली.

Profile of NCP Ministers : राष्ट्रवादीच्या 10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्र्यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा
Follow us
| Updated on: Dec 30, 2019 | 11:55 PM

मुंबई : महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळविस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या 12 आणि काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनीही शपथ घेतली. दरम्यान याआधी तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदं झाली आहेत. राष्ट्रवादीच्या ज्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे त्यांच्या राजकीय वाटचालीचा हा संक्षिप्त आढावा (Profile of NCP Ministers).

1. अजित पवार (उपमुख्यमंत्री)

नाव : अजित अनंतराव पवार जन्म : 22 जुलै 1959. जन्म ठिकाण : देवळाली-प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. शिक्षण : बी. कॉम. ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा अपत्ये : एकूण 2 (दोन मुले) व्यवसाय : शेती पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतदारसंघ : 201-बारामती, जिल्हा पुणे.

इतर माहिती : विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता. इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि., भवानीनगर, माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि., जिल्हा पुणे; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट पुणे; मार्च 1991 ते ऑगस्ट 1991 तसेच डिसेंबर 1994 ते डिसेंबर 1998 अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; 11 डिसेंबर 1998 ते 17 ऑक्टोबर 1999 अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई : 19 डिसेंबर 2005 पासून संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध उत्पादक संघ; 28 सप्टेंबर 2006 पासून अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ; सप्टेंबर 2005 ते 23 मार्च 2013; अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन; 13 ऑगस्ट 2006 पासून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन; 17 जून 1991 ते 18 सप्टेंबर 1991 सदस्य, लोकसभा; 1991-95 (पो.नि.) 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा

28 जून 1991 ते नोव्हेंबर 1992 कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री : 27 ऑक्टोबर 1999 ते 25 डिसेंबर 2003 पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन खात्याचे मंत्री; 26 डिसेंबर 2003 ते 31 ऑक्टोबर 2004 ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे कोकण पाटबंधारे महामंडळे) खात्याचे मंत्री : 9 नोव्हेंबर 2004 ते 7 नोव्हेंबर 2009 जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010 जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) व ऊर्जा खात्याचे मंत्री; 11 नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन आणि ऊर्जा); ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड. दि. 23 नोव्हेंबर, 2019 ते 26 नोव्हेंबर, 2019 पर्यंत उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

2. दिलीप वळेस पाटील

नाव : दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील जन्म : 30 ऑक्टोबर, 1956 जन्म ठिकाण : निरगुडसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे . शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), डी. जे., एल.एल.एम. ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती किरण अपत्ये : एकूण 1 (एक मुलगी) व्यवसाय : शेती व व्यापार पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतदारसंघ : 196 – आंबेगाव, जिल्हा पुणे.

इतर माहिती : महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात तसेच सहकारी चळवळीमध्ये राज्यातील नेत्यांच्या सानिध्यात राहून सक्रिय सहभाग; संस्थापक – अध्यक्ष, राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र, पुणे, या संस्थेमार्फत ग्रामीण, दुर्गम आदिवासी भागातील जनतेच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले; ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायास प्रोत्साहन देऊन संस्थांचे जाळे विकसित केले व त्याद्वारे सर्वसामान्य जनता विशेषतः ग्रामीण महिला वर्गाच्या आर्थिक सक्षमीकरणाचे कार्य; विश्वस्त . यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व महाराष्ट्रातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी निकटचा संबंधः संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक; संस्थापक-चेअरमन, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना

1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009,2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 1992-93 समिती प्रमुख, विधिमंडळ अंदाज समिती सन 1998-99 मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र विधान सभेतील “उत्कृष्ट संसदपटू” या पुरस्काराने सन्मानित; ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर, 2002 उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; डिसेंबर, 2002 ते नोव्हेंबर 2004 ऊर्जा, व उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; नोव्हेंबर 2004 ते मार्च 2005 ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून) व वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री; मार्च 2005 ते डिसेंबर 2008 ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; डिसेंबर 2008 ते ऑक्टोबर, 2009 वित्त व नियोजन खात्याचे मंत्री;

मंत्रीपदी कार्यरत असताना महत्वपूर्ण धोरणात्मक व उल्लेखनीय निर्णय घेतले, त्यामध्ये प्रामुख्याने ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ’ या कंपनीची स्थापना करून गतीने विकास केला, त्यामुळे राज्यात संगणक साक्षरता वाढीचे महत्त्वाचे कार्य होऊ शकले विद्युत कायदा 2003 ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली; ऊर्जा क्षेत्रात राज्याला योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करून सूत्रधारी कंपनी, महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या चार कंपन्यांची स्थापना केली व ऊर्जा विकासासाठी रोडमॅप केला, 6000 मेगावॅटचे प्रकल्प उभारण्याचे व विद्युत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले; 2009-2014 अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा; या काळात विधान मंडळाचे कामकाज योग्य पद्धतीने चालावे यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले .

2012-13 मध्ये महाराष्ट्र विधान मंडळाच्या अमृत महोत्सव समारंभाचे भारताच्या राष्ट्रपती महामाहिम प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन केले; तसेच यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रदर्शन व चर्चा सत्रांचे आयोजन ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

3. धनंजय मुंडे

नाव                  : धनंजय पंडितराव मुंडे जन्म                  : 15 जुलै, 1975 जन्म ठिकाण      : मुंबई शिक्षण              : बी.एस.एल. ज्ञात भाषा          : मराठी, हिंदी, इंग्रजी. वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती राजश्री. अपत्ये               : एकूण 2 (दोन मुली) व्यवसाय           : शेती, व्यापार व समाजसेवा पक्ष                   : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मतदारसंघ         : 233-परळी

इतर माहिती       :  अध्यक्ष, नाथ प्रतिष्ठान, परळी वैजनाथ, या संस्थेमार्फत सामुहिक विवाह, वृक्ष लागवड, आरोग्य तपासणी शिबीरांचे, विविध क्रीडा स्पर्धाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजना विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंचे वाटप; 2003 मध्ये घाटनांदूर येथील रेल्वे अपघातात 12 जणांचे प्राण वाचविले; ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी अनेक गावात 200 पेक्षा अधिक विंधन विहिरी घेतल्या; 2001 मध्ये बेरोजगार व दहशतवाद विरोधी युवक मोर्चा;

2008 दिल्ली येथील युवाक्रांती रॅलीत महाराष्ट्रातील युवकांचे नेतृत्व; 2009 मध्ये पुणे येथे युवा संकल्प रॅलीचे आयोजन केले. 1997 – 98 भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी आघाडीचे प्रमुखः 1998 – 2001 उपाध्यक्ष व 2001 – 2007 सरचिटणीस व 2007-2010 अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा; 2002-2007सदस्य, 2007-2010 उपाध्यक्ष, जिल्हापरिषद बीड; संचालक, संत जगमित्र सहकारी सुतगिरणी मर्यादित टोकवाडी, परळी वैजनाथ; 2010-13, 2013-16 सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद डिसेंबर 2014 ते जुलै, 2016 विरोधी पक्षनेता, विधानपरिषद, जुलै, 2016 मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेवर फेरनिवड, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते; 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.

4. अनिल देशमुख

नाव : अनिल वसंतराव देशमुख जन्म : 9 मे, 1950 जन्म ठिकाण : नागपूर शिक्षण : एम्. एस्सी. (अंग्री.) ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी. वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती आरती अपत्ये : एकूण 3 (दोन मुलगे एक मुलगी) व्यवसाय : शेती पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतदारसंघ : 48 – काटोल, जिल्हा – नागपूर

इतर माहिती : अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांशी निकटचा संबंध, शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न, 1970 ते 1999 काँग्रेस पक्षाचे कार्य, 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; 23 मे 1972 ते 9 जून 1992 सभापती, पंचायत समिती, नरखेड, जिल्हा नागपर; 9 जुलै 1992 ते 12 मार्च 1995. अध्यक्ष, जिल्हा परिषद, नागपूर, 1995 – 99, 1999 – 2004, 2004-2009, 2009-14 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा;

मार्च 1995 ते जुलै 1999 शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य खात्याचे राज्यमंत्री; ऑक्टोबर 1999 ते मार्च 2001 शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे राज्यमंत्री; मार्च 2001 ते ऑक्टोबर 2004 राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

5. हसन मुश्रीफ

नाव : हसन मियालाल मुश्रीफ जन्म : 24 मार्च 1954 जन्म ठिकाण : कागल, जिल्हा कोल्हापूर. शिक्षण : बी. ए. (अर्थशास्त्र) ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी. वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती साहेरा. अपत्ये : एकूण 4 (तीन मुलगे व एक मुलगी) व्यवसाय : शेती. पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मतदारसंघ : 273 – कागल, जिल्हा – कोल्हापूर

इतर माहिती : विद्यार्थी चळवळीत सहभाग; अध्यक्ष, आदर्श शिक्षण संस्था, कागल; अध्यक्ष, भाई माधवराव बागल शिक्षण संस्था, कोल्हापूरः अध्यक्ष, नागनाथ शिक्षण संस्था, एकोंडी; शेतकरी, दुर्बल घटक व मागासवर्गीयांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील; महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी मा. शरदरावजी पवार यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सक्रिय सहभागः शेतकरी संघटनेच्या तंबाखू व दूध दरवाढ आंदोलनात सक्रीय सहभाग; सदस्य व 1997-98 सभापती, पंचायत समिती, कागल; सदस्य, जिल्हा परिषद, कोल्हापूर : 1986 – 2015 संचालक, काही काळ व्हाईस चेअरमन व चेअरमन, कोल्हापूर जिल्हा मध्यवती सहकारी बँक; या बँकेच्या माध्यमातून अनेक नाविण्यपूर्ण योजना सभासदांच्या हितार्थ राबविल्या त्यामुळे शासनाने या बँकेचा विशेष गौरव केला;

अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना, कागल; संचालक व उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या. (महानंद), गोरेगाव, मुंबई; व्हाईस चेअरमन, खा. सदाशिवराव मंडलिक, कागल तालुका सहकारी साखर कारखाना, हमीदवाडा; सदस्य, कागल तालुका खरेदी विक्री संघ संस्थापक – संचालक. छत्रपती शाहू सह. साखर कारखाना लि. कागल; व्हाईस चेअरमन, कागल तालुका सह. सूत गिरणी मर्या. व शरद सह. सूत गिरणी मर्या. कागल; संचालक, कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग सहकारी संस्था; उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी;

1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; मार्च 2001 ते जुलै 2004 पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री; जुलै 2004 ते ऑक्टोबर 2008 पशुसंवर्धन, दुग्धविकास, शालेय शिक्षण, औकाफ खात्यांचे राज्यमंत्री; नोव्हेंबर 2008 ते नोव्हेंबर 2009 नगरविकास, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्याक, औकाफ. विधि व न्याय खात्याचे राज्यमंत्री : नोव्हेंबर 2009 ते जून 2014, कामगार खात्याचे मंत्री; 27 जून 2014 ते ऑक्टोबर 2014 जलसंपदा (कृष्णाखोरे महामंडळ) या खात्याचे मंत्रीः ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेर निवड.

6. राजेश टोपे

नाव : राजेश अंकुशराव टोपे जन्म : 11 जानेवारी 1969 जन्म ठिकाण : औरंगाबाद शिक्षण : बी. ई. (मेकॅनिकल) ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी. वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती मनिषा. अपत्ये : एकूण 1 (एक मुलगा) व्यवसाय : शेती. पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मतदारसंघ : 100 – घनसावंगी, जिल्हा जालना.

इतर माहिती : 1991-95 कार्यकारिणी सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद; सचिव, मत्स्योदरी शिक्षण संस्था, जालना; अध्यक्ष, खोलेश्वर बहुउद्देशीय संस्था, अंकुशनगर, जालना या संस्थेतर्फे सामुदायिक विवाहाचे आयोजन; 1997 पासून अध्यक्ष, समर्थ सहकार साखर कारखाना लि., अंकुशनगर; 1994 पासून संस्थापक-अध्यक्ष, यशवंत सहकारी सूत गिरणी लि.. अंबड; 1995 पासून संचालक, दि महाराष्ट्र स्टेट को ऑप हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन, मुंबई; अध्यक्ष, समर्थ सहकारी बँक, जालना; सदस्य व 1996 ते ऑक्टोबर 1999 विरोधी पक्ष नेता, जिल्हा परिषद, जालना; 1996 राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जेल भरो आंदोलनात सहभागः 1997 बेरोजगार युवकांच्या आंदोलनात अटक; 1992-96 अध्यक्ष, जालना जिल्हा युवक काँग्रेस (आय); 1996-99 उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (आय); मे 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य;

1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा मार्च 2001 ते जानेवारी 2003 जलसंधारण, व्यापार, वाणिज्य आणि पर्यावरण खात्याचे राज्यमंत्री; जानेवारी 2003 ते जुले 2004 पर्यावरण व उद्योग खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर 2004 ते डिसेबर 2008 नगरविकास, सामान्य प्रशासन, नागरी जमीन कमालधारणा, जलसंधारण व संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री; डिसेबर 2008 ते ऑक्टोबर 2009 उच्च व तंत्रशिक्षण वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री नोव्हेंबर 2009 ते सप्टेंबर, 2014 उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

7. जितेंद्र आव्हाड

नाव : डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड जन्म : 5 ऑगस्ट 1963 जन्म ठिकाण : नाशिक शिक्षण : बी. ए., मास्टर ऑफ लेबर स्टडीज (एम. एल. एस.), पीएच. डी. (मुंबई विद्यापीठ.) ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती ऋता अपत्ये : एकूण 1 (एक मुलगी) व्यवसाय : शेती व व्यापार पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतदारसंघ : 149- मुंब्रा – कळवा, जिल्हा ठाणे

इतर माहिती : शालेय जीवनापासून सामाजिक कार्यात सहभाग; 1977 ठाणे येथील सेंट जॉन या शाळेतील स्कूल पार्लमेंट मध्ये पंतप्रधान म्हणून निवड; 1980-81 जिमखाना सचिव, बी. एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे; 1981 सरचिटणीस, ऑल इंडिया स्टूडंट ऑर्गनायझेशन; 1987-88 विद्यापीठ प्रतिनिधी, महाराष्ट्र इन्स्टीट्युट ऑफ लेबर स्टडीज 8 ऑक्टोबर 2013 रोजी महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक चळवळी या विषयावरील शोध प्रबंधास मुंबई विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्राप्त; सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ; संस्थापक, संघर्ष सेवाभावी संस्था, ठाणे; के. लिलावती सतीश आव्हाड एज्युकेशन या संस्थेमार्फत औरंगाबाद येथे एरोनॉटिकल महाविद्यालय तसेच मुखेड, जि. नांदेड येथे डी. एड. कॉलेज सुरु केले; अध्यक्ष, अखिल भारतीय वंजारी युवक संघ; अध्यक्ष, ठाणे जिल्हा योगा असोसिएशन; प्रमुख सल्लागार, कास्ट्राईब जीवन प्राधिकरण व आरोग्य सेवा कर्मचारी व महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघटनाः अध्यक्ष, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन;

अध्यक्ष, इंडियन पायलट गिल्ड कर्मचारी संघटना; ठाणे येथील “नवा – ए – फन” संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल “जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित; मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या घटना उप समितीवर निवडा अध्यक्ष, ठाणे जिल्हा खो – खो संघटना; 1988-91 सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश एन. यु. एस. आय. विद्यार्थी संघटनाः 1991-93 सरचिटणीस, अखिल भारतीय एन. यु. एस. आय; 1993-98 अध्यक्ष, ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळ; 1993-96 सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी; 1999-2006 अध्यक्ष, अखिल भारतीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस कमिटी; 2006 पासून राष्ट्रीय सचिव, अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; 2008 पासून अध्यक्ष, ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षः 2012 प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; 2013-14 कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षः

सदस्य, महाराष्ट विधानमंडळ आश्वासन समिती, आमदास निवास व्यवस्था समिती; 2008 मुख्यप्रतोद, विधानपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष; 2009 व 2014 प्रतोद ( विधानसभा ) विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; 2010 नवीन युवाधोरण ठरविण्यासाठी शासनाने गठित केलेल्या समितीचे सदस्य; एड्स फोरम समितीचे सदस्य; 2011 सदस्य, राज्यातील खाजगी व धर्मादाय रुग्णालय तपासणी विधिमंडळ तदर्थ समिती; 2012 समिती प्रमुख, उपविधान समिती; डिसेंबर 2009 तालिका अध्यक्ष, विधानसभा; 2002-2008, 2008-2009 सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; मे 2014 ते सप्टेंबर, 2014 वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन खात्याचे मंत्री; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

8. शामराव पाटील

नाव                  : शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील जन्म                  : 29 जुलै, 1961 जन्म ठिकाण      : कराड, जिल्हा सातारा शिक्षण              : एफ. वाय. बी. ए. ज्ञात भाषा          : मराठी, हिंदी, इंग्रजी. वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती जयमाला. अपत्ये               : एकूण 1 (एक मुलगा) व्यवसाय           : शेती व सामाजिक कार्य पक्ष                   : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मतदारसंघ         : 259- कराड(उत्तर), जिल्हा सातारा

इतर माहिती       : 2008 पासून अध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्था, यशवंतनगर; 2002 पासून अध्यक्ष, महाराष्ट्र एज्युकेशन संस्था, कराड; 1994 पासून गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, शिक्षण मंडळ; 2005 पासून कार्यकारी विश्वस्त, वेणुताई चव्हाण चरिटेबल पब्लिक ट्रस्ट, कराड, 2013 पासून अध्यक्ष, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, कराड, 2014 पासून अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, कराड; 1992 पासून संचालक व 1996 पासून चेअरमन, सह्याद्री सहकारी साखर लि., यशवंतनगर; या कारखान्यास राष्ट्रीय साखर संघाकडून 1998-99 चा केन डेव्हलमेंट द्वितीय क्रमांक अॅवार्ड; 2011-12 उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम पुरस्कार; 2012-12 चा तिसरा तसेच केन डेव्हलमेंटचा तृतीय पुरस्कार मिळविला;

1994-96 चेअरमन, सह्याद्री ऊस उत्पादक व तोडणी वाहतूक संस्था; अध्यक्ष, पी. डी. पाटील सहकारी बँक लि., कराड; चेअरमन, संजीवनी नागरी  सहकारी पतसंस्था, कराड, चेअरमन, कृष्णाई सहकारी दुध उत्पादक संस्था, कराड, 2010 पासून संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ, नवी दिल्ली; डिसेंबर 2003 पासून उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई, 1992-99 काँग्रेस पक्षाचे कार्य, 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाचे कार्य 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 2012-14 समिती प्रमुख अंदाज समिती; आक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

राष्ट्रवादी राज्यमंत्री

1.दत्तात्रय भरणे

नाव                  : दत्तात्रय विठोबा भरणे जन्म                  : 1 जून, 1968 जन्म ठिकाण      : अंथुर्णे शिक्षण              : बी.कॉम. ज्ञात भाषा          : मराठी, हिंदी, इंग्रजी. वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सारिका. अपत्ये               : एकूण 1 (एक मुलगा) व्यवसाय           : शेती पक्ष                   : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मतदारसंघ         : 200-इंदापूर

इतर माहिती       : 1992 पासून संचालक, 2003-2008 चेअरमन , श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, इंदापूर; 1996 पासून संचालक, 2002-2003 चेअरमन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; 1991-99 काँग्रेस पक्षाचे कार्य 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; 2012-14 सदस्य व मार्च 2012 ते सप्टेंबर 2014 अध्यक्ष, जिल्हापरिषद, पुणे; या काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल समाज कल्याण विभागाचा 2013 चा “अपंग कल्याण राज्य पुरस्कार” प्राप्त; 2014-19 सदस्य महाराष्ट्र विधानसभा; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.

2. आदिती तटकरे

नाव                  : आदिती सुनील तटकरे शिक्षण              : बी.ए., मास्टर ऑफ आर्टस् ज्ञात भाषा          : मराठी, हिंदी, इंग्रजी. पक्ष                   : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मतदारसंघ         : 193-श्रीवर्धन

इतर माहिती       :  जयहिंद कॉलेजमध्ये 2002-2009 प्राध्यापक म्हणून काम केले. यूपीएससी परीक्षांसाठी 2002-2009 पर्यवेक्षक (सुपरवायझर) म्हणून काम केले.2002-2009 पासून सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय. 2012 साली राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये सामील. कोकण विभागीय समन्वयक म्हणून काम सुरू. 23 फेब्रुवारी 2017 रोजी वरसे येथील रोहा ग्रुपमधून रायगड जिल्हा परिषद सदस्य. 21 मार्च, 2017 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड. 25 नोव्हेंबर 2019 पर्यंत रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. ऑक्टोबर, 2019 महाराष्ट्र विधानसभेवर निवड.

3. संजय बनसोडे

नाव                  : संजय बाबुराव बनसोडे जन्म                  : 1 जुलै, 1973 शिक्षण              : 12 वी ज्ञात भाषा          : मराठी, हिंदी व इंग्रजी वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी शिल्पा व्यवसाय           : शेती/राजकारण पक्ष                   : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय). मतदारसंघ         : 237- उदगीर (अनुसूचित जाती) इतर माहिती       : ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधासभेवर निव

4. प्राजक्त तनपुरे

नाव                  : प्राजक्त तनपुरे जन्म                  : 13 सप्टेंबर 1976 शिक्षण              : बी.ई.,एम.बी.ए., एम.एस. ज्ञात भाषा          : मराठी, हिंदी व इंग्रजी वैवाहिक माहिती : विवाहित व्यवसाय            : शेती पक्ष                    : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतदारसंघ          : 223-राहुरी इतर माहिती        : प्रसाद शुगर कारखान्याचे चेअरमन, लोकनियुक्त नगराध्यक्ष, ऑक्टोबर, 2019 मध्ये   महाराष्ट्र विधानसभेवर निवड.

5. राजेंद्र यड्रावकर

नाव                  : राजेंद्र शामगोंडा पाटील (यड्रावकर) जन्म                  : 5 मे 1970 शिक्षण              : Diploma (Civil) ज्ञात भाषा          : मराठी, हिंदी, इंग्रजी. पक्ष                   : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मतदारसंघ         : 280-शिरोळ

इतर माहिती     :  अध्यक्ष, शरद सहकारी साखर कारखाना लि ., नरंदे, ता. हातकणंगले अध्यक्ष; पार्वती को. ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट लि ., यड्राव, ता. शिरोळ अध्यक्ष पार्वती सहकारी सूतगिरणी लि., कुरुंदवाड, ता. शिरोळ अध्यक्ष दि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ को ऑप. स्पिनिंग मिल्स लि., मुंबई अध्यक्ष पद्मावती यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्या., यड्राव, ता. शिरोळ अध्यक्ष पार्वती को – ऑप. हौसिंग सोसायटी लि., यड्राव, ता. शिरोळ संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशन लि., संचालक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., कोल्हापूर संचालक कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी लि., यड्राव, ता. शिरोळ शैक्षणिक अध्यक्ष शामराव पाटील (यड्रावकर) एज्युकेशनल ऍन्ड चॅरीटेबल ट्रस्ट, जयसिंगपूर संचलीत-शरद इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यड्राव, ता. शिरोळ-शरद इन्स्टीट्युट ऑफ टेक्नालॉजी (पॉलिटेक्निक), यड्राव, ता. शिरोळ – शरद कृषि महाविद्यालय, जैनापूर, ता. शिरोळ – शामराव पाटील (यड्रावकर) औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, यड्राव, ता. शिरोळ ज्ञान गंगा हायस्कूल व प्राथमिक विद्यामंदीर, जयसिंगपूर, ता. शिरोळ-दानलिंग विद्यालय, उमळवाड, ता. शिरोळ शरद इंग्लिश मेडीयम स्कूल, यड्राव, ता. शिरोळ शरद प्ले-ग्रुप ऍन्ड नर्सरी, यड्राव, ता. शिरोळ-शरद कॉम्प्युटर इन्स्टिट्युट, यड्राव, ता. शिरोळ आर्थिक–अध्यक्ष, यड्राव  को. ऑप. बँक लि., यड्राव, ता. शिरोळ

राजकीय

कार्याध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा. अध्यक्ष, एन. एस. यु. आय. शिरोळ तालुका मा. उपाध्यक्ष; कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस ( आय ) मा . संघटक सचिव; महाराष्ट्र युवक काँग्रेस (आय) (1995-99) मा. सरचिटणीस; महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (1999 ते 2005) मा. सरचिटणीस; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.