Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayan Rane : शिंदे सरकारमुळे नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या ‘त्या’कारनाम्यामुळे प्रकल्प गुजरातला, राणेंनी दिले स्पष्टीकरण

राज्यात विकासकामे जोमात सुरु आहेत. त्यावर काही बोलण्यासारखे आता राहिलेच नाही. त्यामुळे कोणताही मुद्दा काढून टीका करायची याशिवाय विरोधकांकडे काही कामच राहिले नसल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

Narayan Rane : शिंदे सरकारमुळे नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या 'त्या'कारनाम्यामुळे प्रकल्प गुजरातला, राणेंनी दिले स्पष्टीकरण
केंद्रीय मंत्री नारायण राणेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 6:50 PM

मुंबई :  (Vedanta Project) वेदांता प्रकल्पावरुन राज्याचे राजकारण तापले आहे. आरोप-प्रत्यारोप हे सुरुच असताना आपल्या आक्रमक शैलीमुळे चर्चेत असलेले  (Narayan Rane) केंद्रीय मंत्री नारायण राणे हे यावर काय बोलणार? याकडे लक्ष लागले होते. अखेर उशिरा का होईना त्यांची प्रतिक्रिया समोर आली असून, महाविकास आघाडीमध्ये तडजोड व्यवस्थित झाली नाही म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे त्यांनी सांगितले आहे. (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. शिंदे सरकार स्थापन होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला आहे. या प्रकल्पाचे काम गेल्या अनके दिवसांपासून सुरु होते. पण राज्यात तिघाडी सरकार असल्यामुळे तडजोड झाली नाही आणि प्रकल्प इतरत्र गेल्याचे ते म्हणाले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून या ठिकाणी मिनी ट्रेन सुरु करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आगामी बजेटमध्ये हा निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यात विकासकामे जोमात सुरु आहेत. त्यावर काही बोलण्यासारखे आता राहिलेच नाही. त्यामुळे कोणताही मुद्दा काढून टीका करायची याशिवाय विरोधकांकडे काही कामच राहिले नसल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

शरद पवार हे राज्याचे 4 वेळेस मुख्यमंत्री होते. एवढ्या मोठ्या कालावधीत राज्यात का औद्योगिक क्रांती झाली नाही. शिवाय आताही शरद पवारांची राजवट आणि तीन पक्षाचे सरकार यामुळेच राज्यात उद्योग आले नसल्याचे राणे म्हणाले आहेत.

गेल्या अडीच वर्षाच्या काळात राज्यात विकास कामांचा झपाटा सुरु आहे. जनतेच्या हिताची कामे शिंदे सरकारने केली आहेत. शिवाय जनतेच्या मनातले सरकार सध्या सत्तेत आहे. त्यामुळे राज्याची चिंता सोडा आपल्या पक्षाचे बघा असा सल्ला नारायण राणे यांनी विरोधकांना दिला आहे.

शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.