कोल्हापूर : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. पहिल्या दोन टप्प्यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर, आता तिसऱ्या आणि टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केला. त्यामुळे राजू शेट्टी यांची संपत्तीही समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात राजू शेट्टी यांची संपत्ती दुुप्पट झाली आहे. अर्थात, राजू शेट्टी यांनी संपत्ती दुप्पट होण्याची कारणेही प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहेत.
राजू शेट्टी यांची संपत्ती :
2014 साली राजू शेट्टी यांची एकूण मालमत्ता 83 लाख 87 हजार रुपये होती. आता म्हणजे 2019 साली तीच मालमत्ता 2 कोटी 36 लाख रुपये एवढी झाली आहे. या मालमत्ता वाढीची कारणंही राजू शेट्टी यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहेत.
राजू शेट्टी यांची संपत्ती वाढण्याची कारणे :
खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई येथील फ्लॅट विकल्याने संपत्तीत 98 लाखाची वाढ झाली आहे. तसेच, सरकारी मूल्यांकनाप्रमाणे जमिनीत 10 लाख 70 हजारांची वाढ झाली आहे. शिवाय, लोकवर्गणीतून घरबांधणीसाठी 22 लाखांचा समावेश करण्यात आला असून, शासकीय पगार आणि भत्ता याचाही संपत्ती विवरणपत्रात समावेश केला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
राजू शेट्टी यांच्या संपत्तीचा तपशील :