कटरामध्ये सिद्धूंचा विरोध, भाविकांकडून मोदी-मोदीच्या घोषणा
नवी दिल्ली : काँग्रेसचे पंजाबचे मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांना शनिवारी जम्मूच्या कटरा येथे विरोधाचा सामना करावा लागला. कटरा येथील वैश्नो देवीच्या दर्शनासाठी आलेल्या सिद्धूंना भाविकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी भाविकांनी सिद्धूंसमोर पंतप्रधान मोदींच्या नावाच्या घोषणाही केल्या. When Sidhu face the Modi Modi again….#Katra @sherryontopp pic.twitter.com/DzBKJtCeNf — Vinesh Kataria (@VineshKataria) April 6, 2019 सिद्धू […]
नवी दिल्ली : काँग्रेसचे पंजाबचे मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांना शनिवारी जम्मूच्या कटरा येथे विरोधाचा सामना करावा लागला. कटरा येथील वैश्नो देवीच्या दर्शनासाठी आलेल्या सिद्धूंना भाविकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी भाविकांनी सिद्धूंसमोर पंतप्रधान मोदींच्या नावाच्या घोषणाही केल्या.
When Sidhu face the Modi Modi again….#Katra @sherryontopp pic.twitter.com/DzBKJtCeNf
— Vinesh Kataria (@VineshKataria) April 6, 2019
सिद्धू हे नवरात्री सुरु होण्यापूर्वी वैश्नो देवीच्या दर्शनासाठी पोहोचले. तिथे त्यांनी देवीकडे त्यांचा पक्ष लोकसभा निवडणुका जिंकावा, अशी प्रार्थना केली. त्यानंतर जेव्हा ते कटरा येथे त्यांना भाविकांनी घेरलं. त्यांचा विरोध करत मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. सिद्धूंना भाविकांनी केलेल्या या विरोधाला जम्मू-काश्मीरच्या भाजप सरकारनेही समर्थन दिलं आहे. भारताच्या विरोधात सिद्धू जे काही बोलले लोक त्यापासून नाराज असल्याचं, भाजपने सांगितलं.
Blessed to be in the feet of the Divine Mother on the first day of #Navratras
An arduous journey made easy & time saving. Kudos to the @SMVDSB for starting the new cable-car to Bhairon Baba!
Auspicious start to the election campaign… Off to delhi to meet the CP @RahulGandhi pic.twitter.com/HDHIxpAphz
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) April 6, 2019
पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धूंनी पाकिस्तानच्या समर्थनात वक्तव्य केलं होतं. तसेच त्यांनी भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशवाद्यांच्या ठिकाणांवर करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकचे पुरावेही मागितले होते. त्यापूर्वी त्यांनी करतारपूर कॉरिडोअर येथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं कौतूकही केलं होतं. या सर्व घटनांमुळे सिद्धू हे भाजपच्या निशाण्यावर आले. तसेच, भारतीय नागरिकांकडूनही त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं.
यामुळे त्यांना ‘द कपिल शर्मा शो’मधूनही बाहेर करण्यात आलं. त्यांच्या या वक्तव्यांचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. सिद्धू यांना कपिलच्या शोमधून काढण्याची मागणी होऊ लागली. हा वाद इतका विकोपाला गेला की, सोनी चॅनलला सिद्धूंना शोमधून काढावं लागलं. यानंतर या कार्यक्रमात अर्चना पुरणसिंग दिसल्या, तर एका एपिसोडमध्ये क्रिकेटर हरभजन सिंगही दिसला.