CAA Protest LIVE: बॉलिवूड अभिनेते फरहान अख्तर आणि सुशांत सिंग राजपूतही ऑगस्ट क्रांती मैदानात
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) उद्रेक पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकही रस्त्यावर उतरत आहेत (Protest against CAA and NRC).
मुंबई : देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) उद्रेक पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकही रस्त्यावर उतरत आहेत (Protest against CAA and NRC). सरकारने हा कायदा तत्काळ मागे घ्यावा म्हणून आज (19 डिसेंबर) देशभरात आंदोलने केली जात आहेत. महाराष्ट्रात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिक उत्स्फुर्तपणे एकत्र येत मोर्चात सहभागी होत आहेत. या सर्व धर्मीयांचा लाक्षणिक सहभाग दिसत आहे (Protest against CAA and NRC).
LIVE Updates
[svt-event title=”सुभाषचंद्र भोस यांचे पणतू अदिदेंदु भोस यांचा सरकारच्या भूमिकेला पाठिंबा” date=”19/12/2019,7:36PM” class=”svt-cd-green” ] सुभाषचंद्र भोस यांचे पणतू अदिदेंदु भोस यांचा सरकारच्या भूमिकेला पाठिंबा, विरोधातील आंदोलनांमागे विरोधी शक्तीचा हात, आसाममध्ये बंगाली लोकांची संख्या वाढत आहे त्यामुळेच आंदोलनं होत असल्याचा आरोप [/svt-event]
[svt-event title=”राज बब्बर, मिलिंद देवरांसह काँग्रेसचे अनेक नेते ऑगस्ट क्रांती मैदानावर” date=”19/12/2019,6:12PM” class=”svt-cd-green” ]
LIVE: राज बब्बर, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, हुसेन दलवाई असे अनेक काँग्रेस नेते ऑगस्ट क्रांती मैदानावरhttps://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/SLfKu9vAPo
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2019
[/svt-event]
[svt-event title=”युवकांसोबत आहे, त्यांनी आंदोलनाचं नेतृत्व करावं : अभिनेते सुशांत सिंग राजपूत” date=”19/12/2019,6:05PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING : युवकांसोबत आहे, त्यांनी आंदोलनाचं नेतृत्व करावं, बॉलिवूड अभिनेते सुशांत सिंग राजपूत ऑगस्ट क्रांती मैदानावरhttps://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/kQsb8ZIFdX
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2019
[/svt-event]
[svt-event title=”बॉलिवूड अभिनेते फरहान अख्तर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानावर” date=”19/12/2019,6:05PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING : बॉलिवूड अभिनेते फरहान अख्तर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानावरhttps://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/cvNdxsMPAH
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकांचा निषेध” date=”19/12/2019,4:59PM” class=”svt-cd-green” ] नागरिकत्व विधेयकाविरोधात अनेक सामाजिक संघटनांनी आणि विविध राजकीय पक्षांनी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाला विद्यार्थी संघटना, साहित्यिक आणि सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणारा असल्याचं मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. [/svt-event]
मुंबई
नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी कायदा आणि विद्यार्थ्यांवरील हिंसक कारवाई याविरोधात मुंबईमध्ये मागील 2-3 दिवसांपासून सातत्याने आंदोलने होत आहेत. आजही टाटा इंस्टिट्युटच्या (टीस) विद्यार्थ्यांनी “हम भारत के लोग” या बॅनरखाली आंदोलन केलं. आपला निषेध नोंदवण्यासाठी देशभरातील टीसच्या विद्यार्थ्यांनी मास बंक केला. मुंबईच निषेध करण्यासाठी विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात भव्य आंदोलनाचं आवाहन केलं आहे.
नागरीकत्व सुधारणा विधेयकाला सामाजिक संघटनांचा जोरदार विरोध कायम आहे. या संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हे कायदे महाराष्ट्रात लागू करु नये म्हणून मागणी देखील केली आहे.
कल्याणमध्ये देखील या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीय नागरिकांनी मोर्चा काढला. कल्याण पश्चिममधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसीलदार कार्यालय असा हा शांतीपूर्ण मोर्चा झाला. शेवटी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं.
पुणे
केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पुण्यात काँग्रेसने निदर्शने केली. यावेळी दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील अमानुष पोलीस कारवाईचाही निषेध नोंदवण्यात आला. पुणे शहर काँग्रेसतर्फे आज फर्ग्युसन रोडवरील गुडलक चौकात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद सरकारविरोधात घोषणा देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
दुसरीकडे भाजपची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) पुणे विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला.
नाशिक
नाशिकमधील मालेगाव येथे देखील दोन्ही कायद्यांविरोधात मोर्चा काढण्यात आला. मालेगाव महापालिका ते शाहिद चौकपर्यंत हा मोर्चा झाला. मोर्चात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. मोर्चाच्या पार्शवभूमीवर मालेगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
कोल्हापूर
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हिंसक कारवाई झाली. ही कारवाई करणाऱ्या पोलिसांविरोधात कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी मशाल मार्च काढला. काँग्रेस राष्ट्रवादीसह पुरोगामी विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य गेटसमोर हे आंदोलन केलं. यावेळी हिंसाचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे दोन्ही कायदे त्वरित रद्द करावेत अन्यथा या विरोधात देशव्यापी लढा उभारला जाईल. यात कोल्हापूरातील विद्यार्थी संघटना पुढाकार घेतील असा इशारा देण्यात आला.
सोलापूर
सोलापूरमध्ये सीएए-एनआरसी कायद्यांविरोधात निषेध नोंदवण्यासाठी परिवर्तनवादी संघटनांकडून मानवी साखळी करण्यात आली. शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक लोक एकत्रित आले आणि त्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून आपला निषेध नोंदवला. मानवी साखळीनंतर उपस्थितांनी सीएए कायद्याच्या प्रति फाडून संताप व्यक्त केला. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं जाहीर वाचनही करण्यात आलं. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात युवकांचा प्रतिसाद दिसून आला.
सोलापूर येथेही दोन्ही कायद्यांविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) निदर्शनं केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने माकपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. माजी आमदार आणि कामगार नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली.
बीड
बीडमध्ये विद्यार्थी ‘इन्क्लाब झिंदाबाद’चा नारा देत सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. हे कायदे देशाची पुन्हा एकदा फाळणी करण्यासाठीचा डाव असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. देशातील शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला यांचे शिक्षण, बेरोजगारीसारखे मुलभूत प्रश्न बाजूला ठेवले जात आहेत. उलट त्यावरील लक्ष विचलित करण्यासाठीच देशात धार्मिक तेढ निर्माण केला जातो आहे, असाही आरोप केला जात आहे. याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला.
शहरातील बलभीम महाविद्यालयापासून या मोर्चाला सुरवात करण्यात आली. त्यानंतर मुख्य रस्त्यावरुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी सरकार विरोधी घोषणा देत नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यात आला.
लातूर
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी लातूरमध्ये युवकांनी मुंडन आंदोलन केलं. मुंडण केल्यानंतर डोक्याचे केस गृहमंत्री अमित शाह यांना पाठवण्यात येणार आहेत. या आंदोलनात शेकडो युवक सहभागी झाले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लातूरमध्ये युवकांनी तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने केली. संतापलेल्या युवकांनी घोषणाबाजी करत स्वतःचं मुंडन करून घेतलं. तहरीक-ए-इन्कलाब या संघटनेने या मुंडन आंदोलनाचं आयोजन केलं होते.
अमरावती
अचलपूर परतवाड्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात हजारोंच्या संख्येमध्ये नागरिकांनी मूकमोर्चा काढला. जमियते ऊलमाईन या संघटनेच्यावतीने परतवाड्यातील जामा मशिद येथून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी मोर्चात सहभाग घेतला. हातामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा हटवा अशा प्रकारचे पोस्टर दिसत होते. अतिशय शांतताप्रिय पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला. हे कायदे मुस्लिम समाजाच्या विरुद्ध असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
जळगाव
नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून जळगाव महापालिकेच्या महासभेत भाजप आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी थेट राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा गोंधळ झाला.