टीका करण्याचा त्यांना अधिकार, पण…; अजित पवार यांनी बावनकुळेंना विचारला थेट ‘हा’ प्रश्न
Ajit Pawar on Chandrashekhar Bawankule : लोकसभा निवडणुकीवर भाष्य, चंद्रशेखर बावनकुळेंच्या टीकेला उत्तर अन् गोपीचंद पडळकर यांचा समाचार; अजित पवार यांची सविस्तर प्रतिक्रिया
पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर वक्तव्यावर भाष्य केलंय. तसंच बावनकुळेंना त्यांनी प्रश्नही विचारला आहे. टीका करणे हा त्यांचा अधिकार आहे. ओबीसींना एकत्र प्रतिनिधित्व मिळत नव्हतं तेव्हा कोर्टात जाऊ ठरलं होतं. आयोग नेमला. त्याचा निकाल सर्वश्रुत आहे. मग एक वर्षात तुम्ही निवडणुका घेतल्या का? असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे. अजित पवार पुण्यात बोलत होते.
पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या बैठका होत आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण आणि लोकसभा मतदारसंघाच्या स्वतंत्र बैठका होत आहेत. पुणे जिल्हा ग्रामीणच्या बैठक होतेय. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार उपस्थित आहेत. तिथे अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तर राज्यातील काही लोकसभेच्या मतदारसंघातील शरद पवार आढावा घेणार आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांनी टोला लगावला आहे. निवडणुका समोर ठेवून काही करायची आमची इच्छा नाही. मंडल आयोगाची अंमलबजावणी शरद पवारांनी केली. महिलांना प्रतिनिधीत्व न देणं त्यांना पटत असेल. त्यांना वाटत असेल 20 लोकांचं मंत्रिमंडळ नीट चालतं, असं अजित पवार म्हणालेत.
ठाकरे गटाची मुंबई महापालिकेमध्ये ताकद जास्त आहे. इतर ठिकाणी स्थानिक बाबी लक्षात घेऊन निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणालेत.
पिंपरी-चिंचवडचं नामांतर जिजाऊनगर करण्याची मागणी होत आहे. भक्ती शक्ती प्रतिष्ठान कडून ही मागणी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी बॅनर लावून ही मागणी करण्यात आली आहे. त्यावर अजित पवार यांनी बॅनर लावताना अनधिकृत लावू नका, असं ते म्हणालेत.
पडळकरांचं वक्तव्य अन् अजित पवारांचं उत्तर
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा एकेरी भाषेत टीका केली आहे. “गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी शरद पवारांनी मस्ती केली. यावर्षीही पवार का नाही आला. पवार चार वेळा मुख्यमंत्री होता. बारा वर्षे केंद्रात मंत्री होता. तो पण आता होता मागं कधी होता मला माहिती नाही”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. त्याला आता अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
ज्यांचे जसे संस्कार आहेत तसं ते बोलतात. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?, असं अजित पवार म्हणालेत.