धनंजय मुंडे यांनी ‘ही’ एक गोष्ट करावी, मी स्वत: हार घालून त्यांचा सत्कार करेन; अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 22, 2023 | 12:00 PM

Amol Kolhe on Dhananjay Munde Meet Piyush Gotal : धनंजय मुंडे यांनी 'ही' एक गोष्ट करावी, ...तर मी त्यांचा हार घालून सत्कार करेन; धनंजय मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावर काय म्हणाले अमोल कोल्हे? पाहा...

धनंजय मुंडे यांनी ही एक गोष्ट करावी, मी स्वत: हार घालून त्यांचा सत्कार करेन; अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
Follow us on

पुणे | 22 ऑगस्ट 2023 : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे. धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोरं कांद्याच्या निर्यातीवर लावलेल्या कराचा विषय मांडवा. मी स्वःत कांद्याचा हार घालून त्यांचा सत्कार करेन, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. माझी महाराष्ट्र राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन आहे की, आपला प्रश्न जो पर्यंत मार्गी लागत नाही. तोपर्यंत कोणताही मंत्री तुमच्या गावात आला की त्या मंत्र्यांचा सत्कार कांद्याचा हार घालून करा, असं अमोल कोल्हे म्हणाले.

कांद्या निर्यातीवर केंद्र सरकारने 40 % कर लावला आहे. त्या विरोधात आता आंदोलन केलं जात आहे. पुण्यातील आळेफाट्यावरही आज शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन करत आहेत. कांदा निर्यातीवर 40 टकके शुल्क लागू केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी रास्ता रोको आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले आहेत. कल्याण-अहमदनगर आणि पुणे-नाशिक महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आळेफाटा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीबाबत हा जो निर्णय घेतला आहे. त्यावर पुनर्विचार करावा. आता 2410 रुपये भाव देत आहेत.आधीच हा भाव कांद्याला का दिला नाही?, असा सवाल अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. आम्ही शेतकरी केंद्र सरकारला ठणकावून सांगतोय. हा निर्णय मागे घ्या… केंद्र सरकारच्या या निर्णयाने पाकिस्तान, श्रीलंका इथल्या शेतकऱ्यांचं भलं होणारं आहे. देशातील शेतकऱ्यावर मात्र यामुळे अन्याय होणार आहे, असं अमोल कोल्हे म्हणालेत.

सत्ता येते आणि जाते. पण शेतकऱ्याचं हित जपलं तर राज्याचा विकास होणार आहे. धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे जाऊन ही निर्यात शुल्क मागे घ्यावी. कांद्याला हमी भाव मिळून द्यावा. मी स्वतः कांद्याची माळ घालून आंदोलनात सहभागी झालोय, असंही अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितलं.