पुण्यातील 8 पैकी 6 मतदारसंघ आम्हाला द्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी

लोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून  पुण्यातील आठ विधानसभापैंकी सहा जागांची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.

पुण्यातील 8 पैकी 6 मतदारसंघ आम्हाला द्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी
Follow us
| Updated on: Jun 17, 2019 | 11:26 AM

मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून  पुण्यातील आठ विधानसभापैंकी सहा जागांची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा वगळता इतर सहा मतदारसंघ आपल्या वाट्याला यावेत अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मुंबईत झालेल्या पक्ष बैठकीत पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची आघाडी आहे. त्यामुळे जागावाटपांच्या चर्चेला आता सुरुवात झाली आहे.

पुण्यातील हडपसर, खडकवासला, पर्वती,वडगाव शेरी,कोथरुड आणि शिवाजीनगर हे सहा मतदारसंघ आपल्याला मिळावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती.  पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत, तर आठपैकी 6 मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या जागा आपल्याला मिळाव्या अशी मागणी केली.

2014 ची निवडणूक

दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नव्हती. शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही आघाडी तुटली होती. त्यामुळे सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुण्यातील 8 जागांवर सर्व पक्षीय उमेदवार होते. त्यावेळी भाजपने बाजी मारली,  मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार 6 मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होते.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.