पूण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजे यांना अटक करा, गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?
पूणे बंदला शिवप्रेमींचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
पूणे, शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) अवमान प्रकरणी आज पूणे बंदची हाक देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते उदयन राजे भाेसले यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन करण्यात येत आहे. पूण्यातल्या या आंदाेलनाला शिवप्रेमींचा प्रचंड प्रतीसाद मिळत आहे. राज्यपाल भगतसिंह काैश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निशेधार्थ पुण्यात आंदाेलन (Pune Band) करण्यात येत आहे. वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी या आंदाेलनाला विराेध केला आहे. यासाेबतच खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांना अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली.
काय म्हणाले सदावर्ते?
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या बंदला तिव्र विराेध केला आहे. हा बंद असंविधानीक असून हे आंदाेलन जनतेवर लादलेले असल्याचे ते म्हणाले. सामान्य दुकानदार, फेरीवाले आणि रिक्षा चालकांसारखे घटक यामध्ये भरडले जात असल्याचे ते म्हणाले. याआधी सर्वाेच्च न्यायालयाने 24 नाेव्हेंबर 2022 राेजी अशा प्रकारचे बंद बेकायदेशीर असल्याचे सांगितले हाेते, असे सदावर्ते म्हणाले.
यासाेबतच सर्वसामान्यांना वेठीस धरून याआधीच्या केलेल्या बंद आणि आंदाेलनांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली असल्याचे सदावर्ते म्हणाले, त्यामूळे उदयनराजे भाेसले यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
बंदच्या नावाखाली सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्यांना पाेलीसांनी तत्काळ अटक करावी अशी मागणी वकील सदावर्ते यांनी केली आहे. लाेकप्रतिनीधींचे हे वर्तन बेकायदेशिर असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान पूण्याच्या बंदला शिवप्रेमींचा उत्फूर्त प्रतीसाद मिळत आहे.