Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार कुटुंबाचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीतील ग्रामस्थांचा कल कोणाकडे? पाहा…

Sharad Pawar Home Town Katewadi People Reaction on Ajit Pawar : शरद पवारांच्या काटेवाडीमधील लोकांच्या मनात काय? साहेब की दादा? वाचा सविस्तर...

पवार कुटुंबाचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीतील ग्रामस्थांचा कल कोणाकडे? पाहा...
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 3:04 PM

काटेवाडी, बारामती : अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. अशात राष्ट्रवादीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची भूमिका काय असा सवाल उपस्थित होत आहे. अशा सगळ्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे. काटेवाडीतील लोकांना या सगळ्या घडामोडींवर काय वाटतं? हे आम्ही जाणून घेतलं.

काटेवाडी ग्रामपंचायत येथील लोकांच्या मनात काय? पवार कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीतील ग्रामस्थांचा कल कोणाकडे? या प्रश्नांची उत्तरं आम्ही जाणून घेतली.

काटेवाडीमधील काहीजणांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा दिला तर काहींनी अजित पवार यांच्या भूमिकेचं समर्थन केलं.

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका युवकाने शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. मी 20 वर्षांचा आहे पण मी 80 वर्षाच्या युवकासोबत आहे, अशी प्रतिक्रिया त्या तरूणाने दिली आहे.

साहेबांनी दगडाला शेंदूर फासून म्हसोबा केला. तसंच आताही पवारसाहेब दुसऱ्या दगडाला शेंदूर फासून निवडून आणतील, असंही एका व्यक्तीने म्हटलं आहे.

या सर्व घडामोडींमध्ये आम्ही अजितदादांच्या पाठीशी ठामपणे आहोत. अजित पवार हे युवा आहेत. त्यामुळे त्यांना भविष्य आहे. त्यामुळं ते सत्तेत गेले. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं काही लोकांनी म्हटलं आहे.

अजितदादांनी जे केले ते योग्यच आहे. आज उपमुख्यमंत्री झालेत उद्या मुख्यमंत्री होतील. अजितदादांनी मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. आज जरी दादा आणि साहेब वेगळे झाले असले तरी भविष्यात ते एकत्र येतील. ते वेगळे होत नाहीत हेच सत्य आहे, असं काटेवाडीतील स्थानिकांनी म्हटलं आहे.

उद्या पक्षात फूट पडली तरी आम्ही दादांसोबत आहोत, असंही काहींनी म्हटलं आहे.

पवार कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीतील युवकांचीही आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली. तेव्हा आमचा नेता फक्त अजितदादा आहेत. ते जे करतील त्याला आमचं समर्थन आहे. अजितदादा जो निर्णय घेतात तो विचारपूर्वक घेतात. त्यामुळं ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असं काटेवाडीतील युवकांनी म्हटलं आहे.

अजितदादांनी जे केले ते योग्यच आहे. अजितदादा कायम विकासाची भूमिका घेणारे नेते आहेत.आम्ही कायम दादासोबत असणार आहोत, असंही हे तरूण म्हणाले.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.