अजित पवारांना 440चा करंट लागला पाहिजे… चिंचवड पोटनिवडणूक प्रचार शिगेला, भाजप नेता आक्रमक, काय म्हणाले पहा…

चिंचवडमध्ये कमळाचं बटण एवढ्या जोरात दाबा की अजित पवारांना 440 चा करंट लागला पाहिजे, असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.

अजित पवारांना 440चा करंट लागला पाहिजे... चिंचवड पोटनिवडणूक प्रचार शिगेला, भाजप नेता आक्रमक, काय म्हणाले पहा...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 11:29 AM

पुणेः पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीत (By Election) मविआ विरोधात भाजपचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपने एकेक करून जवळपास सगळ्याच दिग्गजांना निवडणूक प्रचारात उतरवलंय. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. कसब्यात ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीने श्वास घेणारे गिरीश बापट यांना प्रचारात उतरवण्यावरून भाजपवर तीव्र टीका होतेय. तर चिंचवडमध्ये बावनकुळे यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. चिंचवडमध्ये कमळाचं बटण एवढ्या जोरात दाबा की अजित पवारांना 440 चा करंट लागला पाहिजे, असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.

काय म्हणाले बावनकुळे?

चिंचवडमध्ये प्रचारादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, खरं तर ही लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. आपण बिनविरोधसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विनंती केली होती. पण अखेर निवडणूक लागली. त्यामुळं 26 फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात दाबा, अजित पवारांना 440 वोल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की पुन्हा त्यांनी चिंचवडचे नावच घेऊ नये. असा त्यांना धडा शिकवा, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं..

दिवसभर मॅरेथॉन बैठका

चिंचवड मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. जगताप यांच्या प्रचारासाठी काल दिवसभर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण मतदारसंघात मॅरेथॉन दौरा केला.

डबल इंजिन सरकारचा पिंपरी चिंचवडला फायदा मिळणार, विकासाची कामे पूर्ण करण्याकरता मत निर्माण केलं आहे, असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलं. अंधेरीची निवडणूक लागली त्यावेळी शरद पवार यानी भाजपने ही निवडणूक लढू नये अशी सूचना केली. आम्ही देखील महाविकास आघाडीला विनंती केली मात्र ती त्यांनी मान्य केली नाही, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं.

फडणवीस त्या भूकंपातून सावरले नाहीत…

अजित पवारांना 440 चा करंट द्या, या वक्तव्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे थोडा राज्याचा राजकारणाचा अभ्यास करा. आदरणीय अजितदादा पवार यांनी तुम्हाला आणि तुमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना सकाळीच भूकंपाचा झटका दिला होता.

यातून तुमचा पक्ष तुमचे नेते अजून पर्यंत सावरलेला नाही त्यामुळे आदरणीय अजितदादा पवार यांना 440 करंट द्या हे बोलणं कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा अस आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपल्याला करत आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.