कसबा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, हेमंत रासने, रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, काय घडलं?

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ येथे पोट निवडणूक जाहीर झाली आहे. काल 26 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं.

कसबा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, हेमंत रासने, रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, काय घडलं?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 11:10 AM

योगेश बोरसे, पुणे : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोट निवडणुकांसाठी नुकतच मतदान पार पडलं. मतदानाचा दिवस भाजप आणि महाविकास आघाडीच्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. तर आज मतदानाच्या दुसऱ्या दिवशीही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यासह काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तसेच राष्ट्रावादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.   भाजपचे कसब्याचे उमेदवार हेमंत रासने यांच्या मतदानाची जास्तच चर्चा झाली. हेमंत रासणे मतदानाला आले तेव्हा त्यांनी गळ्यात भाजपचं उपरणं घातलं होतं. कमळाचं चिन्ह असलेलं हे उपरणं घालूनच त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला. रासने यांना हा प्रकार चांगलाच भोवला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आचारसंहितेचा भंग

हेमंत रासने यांनी कमळाचं चिन्ह असलेलं उपकरणं परिधान करून मतदान केलं. त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला होता. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची आक्रमक मागणी त्यांनी केली होती. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी रासने यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हेमंत रासने यांनी निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

धंगेकराचं उपोषण

तर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर आरोप करीत उपोषण केलं. भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. पत्नीसह त्यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. हा आचारसंहितेचा भंग असल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.  तर  रुपाली पाटील यांनी गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कसब्यात १६ उमेदवार

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर इथे पोट निवडणूक जाहीर झाली आहे. काल २६ फेब्रुवारी रोजी कसब्यातील आमदारकीसाठीची ही पोट निवडणूक पार पडली. भाजप, काँग्रेस या दोन प्रमुख उमेदवारांसह इतर १६ उमेदवारांनी या निवडणुकीत नशीब आजमावलं आहे. निवडणुकीत काल ५०.०६ टक्के मतदान झालं. कसब्यातील अनेक मतदारांचं यादीत नाव न आल्याने त्यांना मतदान करता आलं नाही. या निवडणुकीचा निकाल येत्या 02 मार्च रोजी जाहीर होईल. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्याविरोधात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यां

चिंचवडमध्ये किती टक्के मतदान?

तर भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवडमध्ये पोटनिवडणूक पार पडली. येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये चुरस पहायला मिळत आहे. येथे एकूण २८ उमेदवारांनी नशीब आजमावलं. चिंचवड पोट निवडणुकीत जवळपास ५०.४७ टक्के मतदान झालं. भाजपने येथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तिकिट दिलं. तर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नावा काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता येत्या ०२ मार्च रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.