Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीआरएसच्या एन्ट्रीनं महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम?; बावनकुळे म्हणाले, होय…

Chandrashekhar Bawankule on BRS : बीआरएसची एन्ट्री अन् महाराष्ट्राचं राजकारण; चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्ट भाष्य

बीआरएसच्या एन्ट्रीनं महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम?; बावनकुळे म्हणाले, होय...
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 3:37 PM

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीआरएसच्या महाराष्ट्रातील एन्ट्रीवर भाष्य केलंय. काँग्रेस-राष्ट्रवादी गोष्ट तयार करत आहे. राजकारणात कोणीही नवं आलं की बी टीम. आमचेच लोक त्यांच्या पक्षात गेलेत. ती आमची बी टीम नाही. नवीन पक्षाची भीती पवार आणि काँग्रेस ला वाटते.बीआरएसशी आम्हाला काही देणं घेणं नाही, असं बावनकुळे म्हणालेत.

एका परिवारातल्या दोन भावांमध्ये काही कारणाने मतभेद होत असतात. पण फेविकॉल का जोड पक्का आहे. शिवसेना-भाजपचा जोड फेविकॉलचा आहे. तो कधीही तुटणार नाही, असं बावनकुळे म्हणालेत.

मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा व्हायचा तेव्हा होईल, असं म्हणत मंत्रिमंडळ विस्तारावर त्यांनी भाष्य केलंय.

भाजपचा प्लॅन जयंत पाटलांनी माहित झालं असेल तर काय.. .गोपनीय पद्धतीने भाजपच्या बैठकीला जयंत पाटील आले असतील. ते कसे आले कुठे आले त्यांना विचारा, असं म्हणत जयंत पाटलांनाही बावनकुळे यांनी टोला लगावला आहे.

मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले. 2014 ते 2019 च्या निवडणुकांमध्ये जो जाहीरनामा दिला गेला त्याप्रमाणे सरकारने काय काम केलं ते राज्यातल्या 3 कोटी घरापर्यंत पोहोचणार आहोत.संपर्क ते समर्थन आणि घर चलो अभियान, संपर्क ते समर्थनमध्ये आम्ही महत्वाच्या 1 हजार लोकांचा घरी भेटी देतो आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

टिफिन बैठकीतून संवाद साधणार आहोत. प्रत्येकाने घरून टिफीन आणला आहे, ही आमची टिफिन बैठक आहे, असंही ते म्हणालेत.

कर्नाटकला काँग्रेसला मिळालेलं एक मत किती धोकादायक आहे, हे उद्धव ठाकरे यांना कळालं आहे. राहुल गांधी यांचा सांगण्यावरून त्यांनी सावरकर धडा काढला. धर्मांतर कायदा बदलला. उद्धव ठाकरे लंडनमध्ये काँग्रेस देश विरोधी उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? कालपासून उत्तर मिळालेलं नाही, असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते आहेत. श्रीकांत शिंदे चांगले काम करत आहेत. एखादी घटना आमच्या युतीवर परिणाम करू शकत नाही.2024 मध्ये दिसेल सेना सोबत राहतील आणि आहेच. थोडा गैरसमज किंवा समज त्यामुळे काही फरक पडणार नाही.अतिउत्साही कार्यकर्ते असतात. भावनेचा भरात कोणी काही करतं-बोलतं. मी सूचना दिलेल्या आहेत. पहिल्या जाहिरातीला दुसऱ्या जाहिरातीने नष्ट केलं, असं बावनकुळे म्हणालेत.

मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.