PMC Election 2022: पुण्याच्या प्रभाग क्र. 25 आगामी निवडणुकीत बदलणार गणितं; राष्ट्रवादीसाठी सोपी नसणार लढत
राज्यात सत्ताबदल झाला असून याचाही येत्या निवडणुकीवर नक्की परिणाम होणार आहे. त्यासाठी आता राष्ट्रवादीने आतापासूनच कंबर कसली आहे.
पुणेः राज्यात एका वर्षापूर्वी मुंबईनंतरची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) मान पटकावला होता. आतापर्यंत सगळ्यात मोठं शहर असलेल्या मुंबईचं क्षेत्रफळ हे 460 चौरस किलोमीटर एवढं आहे म्हणजेच आता पुणे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यातलं सगळ्यात मोठं शहर बनलं आहे कारण 23 गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर आता महापालिकेची हद्द ही 485 चौ. किलोमीटर एवढी झाली असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे तर महसूल विभागाच्या मते हे क्षेत्रफळ 516 चौरस किलोमीटर एवढं झालं आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी पुणे महानगरपालिकेकडे आपला मोर्चा वळवला आहे. पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी पक्षाची पकड असली तरी राज्यातील सत्ताबदलाचा परिणाम या महानगरपालिकेवर नक्कीच होणार आहे. भाजपमधील बडे बडे नेते पुणे महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी आता सत्ताबदलाचा फायदा उठवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच भाजप आतापासूनच जय्यत तयारीला लागले आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 25 वानवडी अ,ब, क आणि ड (Ward no. 25 Wanwadi A, B, C, D) अशा चार विभागातील चार उमेदवार आहेत, पुणे शहर राष्ट्रवादीचा(NCP) बालेकिल्ला समजला जात असला तरी केंद्रातील भाजपच्या सत्तेचा परिणाम आता प्रत्येक जिल्ह्यांसह तालुक्यावर होत आहे. आता तर राज्यात सत्ताबदल झाला असून याचाही येत्या निवडणुकीवर नक्की परिणाम होणार आहे. त्यासाठी आता राष्ट्रवादीने आतापासूनच कंबर कसली आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भारतीय जनता पार्टी | ||
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | ||
अपक्ष | ||
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | ||
शिवसेना | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
अजित पवार कंबर कसणार
महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सगळं लक्ष आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे दिले आहे. त्यामुळे वानवडी प्रभाग क्र. 25 अ, ब, क आणि ड यामध्ये दोन उमेदवार हे भाजपचे विजयी झाले आहेत तर दोन उमेदवार हे राष्ट्रवादीचे विजयी झाले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत हे चित्र बदललेले तर चारही उमेदवार कोणत्या पक्षातील असतील हे आता निवडणुकीत सिद्ध होणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
राष्ट्रीय काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
शिवसेना | ||
भारतीय जनता पार्टी | कालिंदा मुरलीधर पुंडे |
विजयी उमेदवार आणि आरक्षण
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 25 अ मध्ये भारतीय जनता पार्टीचे धनराज बाबुराव घोगरे, प्रभाग क्र.25 ब मध्ये कालिंदा मुरलीधर पुंडे, प्रभाक्र, 26 क मध्ये रत्नप्रभा सुदाम जगताप आणि प्रभाग क्र. 25 ड मध्ये प्रशांत सुदाम जगताप हे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत या प्रभागामध्ये 25 अ आणि ब मध्ये सर्वसाधारण महिला आणि प्रभाग क्र. 25 क मध्ये सर्वसाधारण अशा प्रकारे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काय चित्र असणार हे आता निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
शिवसेना | ||
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी | जगताप रत्नप्रभा सुदाम | जगताप रत्नप्रभा सुदाम |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
भारतीय जनता पार्टी |
वॉर्ड कुठून पासून कुठ पर्यंत
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.25 हा हडपसर, गावठाण, सावतवाडी असा असून या प्रभागामध्ये 57,385 एवढी लोकसंख्या असून अ.जा. 7387 अ. ज. 545 इतकी आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
अपक्ष | ||
भारतीय जनता पार्टी | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | जगताप प्रशांत सुदाम | जगताप प्रशांत सुदाम |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | ||
शिवसेना |