Pune | येत्या 15 दिवसात अख्खी शिवसेना आमच्यासोबत येणार; आढळराव पाटलांचं सर्वात मोठं विधान

आढळराव पाटील बोलताना म्हणाले की, अनेक शिवसैनिक मला भेटून माझ्या निर्णयाचे स्वागत करत आहेत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले नाहीत, हिंदुत्वाचे विचार सोडले नाहीयंत. त्यामुळे आम्ही काही चूक केली किंवा पक्ष सोडलायं किंवा आम्ही गद्दारी केली असे अजिबातच नाहीयं.

Pune | येत्या 15 दिवसात अख्खी शिवसेना आमच्यासोबत येणार; आढळराव पाटलांचं सर्वात मोठं विधान
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 2:52 PM

आंबेगाव : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. राज्यात शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये संघर्ष होताना देखील दिसतोयं. शिरूर लोकसभेचे माजी खासदार उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivaji Adahrao Patil) यांनी शिवसेनेतून फारकत घेत मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. यानंतर शिरूर मतदार संघातील शिवसैनिकांनी त्यांचा निषेध केला. यावेळी अनेक घडामोडी देखील झाल्या ज्यांनी आढळरावांचा विरोध केला त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात झाले. यावर आता आढळराव पाटील हे स्वत: बोलले असून आंदोलन (Movement) वगैरे हे सर्वकाही कटकारस्थान असल्याचे आढळराव पाटील म्हणाले आहेत.

शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मोठे विधान

आढळराव पाटील बोलताना म्हणाले की, अनेक शिवसैनिक मला भेटून माझ्या निर्णयाचे स्वागत करत आहेत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले नाहीत, हिंदुत्वाचे विचार सोडले नाहीयंत. त्यामुळे आम्ही काही चूक केली किंवा पक्ष सोडलायं किंवा आम्ही गद्दारी केली असे अजिबातच नाहीयं. सर्वांना हा माझा निर्णय पसंत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होणारी गळचेपी आणि होणारा अत्याचार हा सगळया शिवसैनिकांनी भोगालंय.

हे सुद्धा वाचा

मतदार संघातील अनेक शिवसैनिक माझ्यासोबतच

पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले, ज्या लोकांनी माझ्याविरोधात आंदोलन केली, त्यातला एकही शिवसैनिक नव्हता. हे सर्व शिवसेनाच्या विरोधात कटकारस्थान आणि पक्ष विरोधी कारवाई करून पक्षाने बाहेर केलेली मंडळी आहे. मी शिंदे गटात गेलो म्हणून अनेकांनी पद मिळण्याच्या उद्देशाने आंदोलन केली आहेत. मतदार संघातील अनेक शिवसैनिक माझ्या सोबतच आहे. अनेकजण फोन करून सांगतात कि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पुढील पंधरा दिवसात सगळी शिवसेनासोबत राहणार आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासोबत राहणार आहे. यामध्ये कोणतीही अडचण नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.