Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत

ग्रामीण आणि शहरी भागातील पदवीधर कोणाच्या बाजूने कौल देतात, पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवर स्पेशल रिपोर्ट

पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन 'पाटील' प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 4:04 PM

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात (Pune Graduate Constituency Election) यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात उमेदवारांपेक्षा दोन प्रदेशाध्यक्षांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बंडखोरी टाळण्यात यश आलं. पण मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरेंमुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. (Pune Graduate Constituency Election Candidates Special Report)

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण लाड (Arun Lad), भाजपचे संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी मनसेने पदवीधर निवडणुकीत उडी घेतल्यानं मतविभाजनाचा फटका टाळण्याचे आव्हान आहे.

आजोबा आमदार : रुपाली पाटील ठोंबरे

पदवीधर हा आत्तापर्यत दुर्लक्षित राहिलेला मतदारसंघ आहे. राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन पदवीधरमध्ये करत आले आहेत. या मतदारसंघात आजोबा आमदार असल्याने पदवीधरांचे प्रश्न सुटू शकले नसल्याचा आरोप मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला. मनसेने सत्ता नसतानाही पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावल्याचा दावाही त्यांनी केला.

पुणे पदवीधर मतदारसंघात सुमारे साडेपाच लाख मतदार असून त्यात सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यात आहे. त्याखालोखाल सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत. मागच्या पदवीधर निवडणुकीत पंधरा टक्के मतदान झाले. यावेळी मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

भाजपने अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावीपणे मतदार नोंदणी केल्याने याचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मतदार नोंदणी केलेले हजारो अर्ज बाद झाल्याचा फटकाही भाजपला बसू शकतो, अस राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

माझ्यासमोर कोणाचं आव्हान नाही : लाड

अरुण लाड यांनी मागील निवडणुकीत बंडखोरी करत 37 हजार मतं मिळवली होती. शांत स्वभावाचे राजकारणी म्हणून लाड यांची प्रतिमा आहे. बंडखोरीनंतर जयंत पाटील यांच्यासोबत असलेल्या जवळीकीमुळे त्यांना उमेदवारी मिळाल्याचं बोललं जातं. आम्ही खेडोपाडी फिरलोय, फक्त शहरापुरता हा मतदारसंघ मर्यादित नाही. त्यामुळे माझ्यासमोर कोणाचं आव्हान नाही, अस लाड म्हणतात.

संग्रामसिंह देशमुख यांचं घराणं नेहमीच काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्याविरोधात उभं ठाकलं. मात्र, आघाडीमुळे त्यांना पलूस-कडेगाव मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने 2014 ला त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये चंद्रकांत पाटील यांचे पाठबळ देशमुखांना महत्त्वाचे ठरणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात दोन्ही तुल्यबळ उमेदवार हे सांगलीतले आहेत. त्यामुळे त्या भागात वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात यावेळी मनसे फॅक्टर आघाडीला डोकेदुखी ठरणारा आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील पदवीधर कोणाच्या बाजून कौल देतात, आणि प्रभावी मतदार नोंदणी केल्याचा फायदा कोणाला होणार? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. (Pune Graduate Constituency Election Candidates Special Report)

गेल्या वेळी पुणे पदवीधर निवडणूक निकाल

चंद्रकांत पाटील (भाजप) (विजयी) –  61,453 सारंग पाटील (राष्ट्रवादी)- 59,072 अरुण लाड (बंडखोर)- 37,189 शैला गोडसे – 10,594 शरद पाटील – 8,519

संबंधित बातम्या :

पुणे पदवीधरचे चित्र स्पष्ट, राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात मुख्य लढत, 62 उमेदवार रिंगणात

विधानसभेला दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला, रुपाली पाटील-ठोंबरेंना पुणे पदवीधर निवडणुकीचे तिकीट

(Pune Graduate Constituency Election Candidates Special Report)

'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.