इंदापूरच्या आजी-माजी आमदारांची अजित पवारांकडे एकच मागणी; म्हणाले, दादा आम्हाला फक्त…

| Updated on: May 02, 2024 | 1:44 PM

Indapur MLA Dattatray Bharne and Harshwardhan Patil Request to Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. इंदापूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. यासभेवेळी अजित पवार यांच्यकडे एक मागणी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...

इंदापूरच्या आजी-माजी आमदारांची अजित पवारांकडे एकच मागणी; म्हणाले, दादा आम्हाला फक्त...
Follow us on

देशाचं लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात घडामोडींना वेग आला आहे. मतदानाला अवघे पाच दिवस राहिलेले असताना प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इंदापूर तालुक्यात सभा होत आहेत. अजित पवार आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार इंदापूर तालुक्यात आज सभा घेत आहेत. इंदापूर तालुक्यात अजित पवार यांच्या तीन सभा होणार आहेत. इंदापूरच्या सणसर, शेळगाव आणि निमगाव केतकीमध्ये अजित पवारांनी सभा होणार आहे. सणसरमध्ये त्यांची पहिली सभा पार पाडली.

आजी-माजी आमदारांची मागणी काय?

अजित पवारांच्या इंदापूर दौऱ्यादरम्यान इंदापूरच्या आजी-माजी आमदारांनी अजित पवार यांच्याकडे विशेष मागणी केली आहे. इंदापूर तालुक्याला पाणी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आपले दिवस चांगले सुरू आहेत. इंदापूरला आता पाण्याची समस्या सतावत आहे. दादांना एकच विनंती आहे की आम्हाला पाणी द्या…फडणवीस साहेबांना देखील एकच विनंती की नीरा देवधरचं पाणी द्या. अन्यथा आमचा शेतकरी अडचणीत येईल. आमच्या शेतकऱ्यांची शेती उध्वस्त होईल, अशी मागणी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?

काही गोष्टी वाटून घ्याव्या लागतील आणि द्याव्या ही लागतील. बारामतीपेक्षा इंदापूरचे मताधिक्य असले पाहिजे. परमेश्वराने आपल्याला डोळे, बुद्धी, डोके दिले आहे विचार करा. आपला खासदार सत्तेच्या प्रवाहात नव्हता म्हणून निधी मिळाला नाही. विधानसभेला जागा कुणाला सुटणार आहे का प्रश्न गौण आहे. एकत्र बसून निधी आणावा लागणार आहे. पाणी आणायला भक्कम नेतृत्व लागणार आहे. इंदापूर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. हा पाणीप्रश्न सुटला पाहिजे, असं इंदापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.

जास्तीत जास्त मतदान करून सुनेत्रा काकींना लोकसभेत पाठवायचं आहे. विद्यमान खासदार गेली, 10 वर्ष मोदींना आणि केंद्रसरकारच्या धोरणांना विरोध करत होत्या. म्हणून आपला विकास झाला नाही. केवळ त्यांनी विरोध केला आहे. अनेक काम आपल्याला करायची आहेत केंद्र सरकारच्या अनेक योजना राबवायच्या आहेत. आपण महायुती म्हणून मतदान करायचं आहे. विद्यमान या खासदार प्रवाहाच्या विरोधात आहेत. मोदींचे हात बळकट करण्यासाठी सुनेत्रा काकीनं मतदान करा, असं हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी म्हटलंय.