‘हे’ चिन्ह म्हणजेच पुण्याच्या कसबा पेठेत भाजपाचा उमेदवार, चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड येथे बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही प्रयत्न करणार.

'हे' चिन्ह म्हणजेच पुण्याच्या कसबा पेठेत भाजपाचा उमेदवार, चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 12:37 PM

योगेश बोरसे, पुणेः पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कोण उमेदवार असेल, यावरून आज महत्त्वाची बैठक पार पडली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जातेय का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याविषयी स्पष्टपणे सांगितलं.

हे चिन्ह हाच उमेदवार….

कसबा पेठेतून कोण लढणार यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या तरी कमळ चिन्ह हाच उमेदवार मानून भाजपा कामाला लागली आहे. कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी भाजपाच्या तीन समित्या काम करतात. त्यानुसार पुण्यातील या निवडणुकीसाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. लवकरच उमेदवाराचं नाव निश्चित केलं जाईल. जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात ही निवडणूक चालेल. परंपरागत मतदारसंघ असला तरी मार्जिन कशी वाढेल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

चार नावांवर बैठकीत चर्चा?

कसबा पेठेतून शैलेश टिळक, हेमंत रासणे, गणेश बिडकर आणि धीरज घाटे ही चार नावं चर्चेत आहेत. आजच्या बैठकीत या उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याचं म्हटलं जातंय. पुणे शहर भाजपकडून पक्षश्रेष्ठीना पाठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आज पहिली बैठक झाली. सांगोपांग विचार झाला. उमेदवारांचा विचार झाला. भाजपाच्या तीन समित्या- राज्याची संसदीय समिती, प्रदेशाची कोअर कमिटी, संसदीय समिती, निवडणूक संचालन समिती आहे, त्याद्वारे यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. राजकीय समितीत आमदार माधुरीताई मिसाळ प्रमुख असतील. संजयनाना काकडे, गिरीश गणेश बीडकर, धीरज घाटे, शैलेश टिळक हे एका समितीत असतील. संघटनात्मक समिती ही भाजपाची ताकद आहे. शहराचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे करतील. कसब्यातले नगरसेवक आहेत. तिसरी समिती ही निवडणूक संचालन समिती असेल. प्रमोद कोंडवे हे प्रमुख असतील.

बिनविरोधसाठी प्रयत्न करणार?

कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड येथे बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही प्रयत्न करणार. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक चुरशीची करण्याकरिता तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आम्ही गाफील न राहता तयारी सुरु केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.