Pune Lok sabha result 2019 : पुणे लोकसभा मतदारसंघ निकाल
पुणे लोकसभा मतदारसंघ : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीकडून गिरीश बापट यांनी बाजी मारली. पुणे लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 49.84 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 मध्ये 54.14 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 5 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं […]
पुणे लोकसभा मतदारसंघ : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीकडून गिरीश बापट यांनी बाजी मारली. पुणे लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 49.84 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 मध्ये 54.14 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 5 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात एकूण 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजप महायुतीकडून गिरीश बापट, तर काँग्रेस आघाडीकडून मोहन जोशी यांच्यातच प्रमुख लढत झाली.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
अपक्ष/इतर | अनिल जाधव (VBA) | पराभूत |
भाजप/शिवसेना | गिरीश बापट (भाजप) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | मोहन जोशी (काँग्रेस) | पराभूत |
राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक
सुरुवातीला एकतर्फी वाटणारी पुण्याची लढत शेवटच्या टप्प्यात मात्र रंगतदार झाली. 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपचे अनिल शिरोळे हे तीन लाख 15 हजार मतांनी विजयी झाले होते. मात्र यंदा त्यांचं तिकीट कापून भाजपने गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. भाजपने उमेदवार जाहीर करुन अनेक दिवस झाले तरी काँग्रेसचा उमेदवारच ठरत नव्हता.
उमेदवारीचा घोळ शिवाय पक्षाअंतर्गत वादामुळे काँगेसला ही निवडणूक काहीशी अवघड गेली. मात्र सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतलेल्या भाजपच्या गिरीश बापट यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली, तर 2014 च्या तुलनेत पुणे लोकसभा मतदारसंघात पाच टक्क्यांनी मतदानाची आकडेवारी घटली.
विधानसभानिहाय 2019 ची मतदानाची आकडेवारी
पुणे लोकसभा मतदारसंघ
विधानसभा 2019
कसबा 55.88 %
शिवाजीनगर 46.94 %
कोथरूड 50.26 %
वडगावशेरी 46.41 %
कॅन्टोन्मेंट 48.82 %
पर्वती 52.04 %
एकूण 49.84%
2014च्या निवडणुकीत पालकमंत्री गिरीश बापट ज्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आले आहेत, त्या कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान यंदा सुद्धा झालं. 2019 मधील पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 75 हजार 39 मतदारांपैकी 10 लाख 34 हजार 130 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे 2014 च्या तुलनेत इथं मतदानात 5 टक्यांनी घट झाली. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं.
यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट्य
यावेळी पुण्यातील लढत चुरशीची होणार अशीच चर्चा होती, मात्र काँग्रेसने घातलेला उमेदवारीचा घोळ तसेच तुल्यबळ उमेदवार न देता, निष्ठावंत असणाऱ्या मोहन जोशी यांना तिकीट दिले. मात्र जोशी बापटांसमोर तसं कडवं आव्हान उभं करण्यास तितके यशस्वी झाले नाहीत.
यावेळी पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न, मेट्रोचे रखडलेलं काम, पाणी पुरवठा, यासह स्थानिक मुद्यांवर ही निवडणूक झाली.
कोणाकोणाच्या सभा?
- मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा
- नितीन गडकरी 2 सभा
- प्रकाश जावडेकर 2 सभा
- विनोद तावडे – 1 सभा
- पृथ्वीराज चव्हाण 2 सभा
- शरद पवार 2 सभा
- अजित पवार 4 सभा