पुणे मेट्रोवरुन भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई? फडणवीस पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करणार

अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे मेट्रोवरुन भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई? फडणवीस पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करणार
देवेंद्र फडणवीस पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करणार
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 6:18 PM

पुणे : पुणे मेट्रोच्या कामावरुन आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल रन पार पडली होती. त्यावेळी अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस उद्या दुपारी 3 वाजता शिवाजीनगर इथल्या मुख्य टर्मिनसवरील मेट्रोच्या कामाची पाहणी करणार आहेत. (Devendra Fadnavis will inspect the work of Pune Metro tomorrow)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पुणे मेट्रोच्या ट्रायल रनच्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे मेट्रोचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलाय. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करणार आहेत. उद्या सकाळी फडणवीस आपले नियोजित कार्यक्रम करतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता ते शिवाजीनगर इथल्या मेट्रोच्या मुख्य टर्मिनसच्या कामाची पाहणी करणार आहेत. मेट्रोची ट्रायल रन अजित पवारांच्या उपस्थितीत झाली असली तरी मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं जाईल असं भाजपचे स्थानिक नेते सांगत आहेत.

‘पुण्याची ‘आधुनिक पुणे’ अशी ओळख निर्माण होणार’

पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते. आता मेट्रोमुळे पुण्याची ओळख ‘आधुनिक पुणे’ अशी होणार आहे, असं सांगतानाच मेट्रोच्या कामासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. अजित पवार यांच्या हस्ते पुणे मेट्रोची ट्रायल रन पार पडली.

पुणेकरांचं स्वप्न पूर्ण होणार

अत्याधुनिक, आरामदायी प्रवासाचे जलद व वेळेवर पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करणारी ट्रायल रन ठरणार आहे. पुणेकरांना निर्धारीत वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेसोबतच पुणेकरांचे वेळेचे गणित जुळवून आणणाऱ्या वाहतूक आधुनिक व्यवस्थेची ही ट्रायल रन आहे. या ट्रायल रनच्या निमित्ताने पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. महामेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरात सुरु असणारे मेट्रो रेल्वेंचे काम निर्णायक टप्प्यावर आहे. लॉकडाऊनच्या काळातही काम सुरु होते. 60 टक्के काम आजच्या घडीला पूर्ण झाले आहे. अत्यंत वेगाने,विश्वासाने, निर्धाराने,कोणताही अपघात न होता, हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यात महामेट्रोच्या, पुणे मेट्रोच्या सर्व इंजिनियर, अधिकारी, कर्मचारी बांधवांची मोठी मेहनत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले होते.

इतर बातम्या :

अजितदादांचा पुणे मेट्रोला हिरवा झेंडा, वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पहिली ट्रायल रन

मेट्रोमुळे पुण्याची ‘आधुनिक पुणे’ अशी ओळख निर्माण होणार; मेट्रोसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही: अजित पवार

Devendra Fadnavis will inspect the work of Pune Metro tomorrow

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.