पुणे : राज्यातील (Municipal elections) महापालिका निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. अंतर्गत हालचाली सुरु झाल्या असून प्रत्येक (Politics Party) पक्षही कामाला लागला आहे. मे महिन्यात आरक्षण जाहीर झाले असल्याने इच्छूक आता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. (Pune) पुणे महापालिकेत 58 प्रभागात 173 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. हे सर्व असले तरी पालिकेवर भाजपाचे वर्चस्व असून महर्षी यार्डातील प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा डंका पाहवयास मिळाला आहे. चारपैकी तीन वार्डामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. तर दोन नंबरचा पक्ष हा भाजपा ठरला होता. त्यामुळे यंदा या प्रभागात भाजपा सर्वस्व पणाला लावणार की राष्ट्रवादी पक्ष आपला गढ शाबूत ठेवण्यात यशस्वी राहणार हे पहावे लागणार आहे.
महर्षी यार्डातील प्रभाग क्रमांक 39 मध्ये चार जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर आव्हान होते ते भाजापाचे. या काळात बदलाचे वारे होते. त्यामुळे पुणे महापालिकेवरही कमळच फुलले होते. पण महर्षी नगरातील या प्रभागात 4 पैकी ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. यामध्ये बाळासाहेब धनकवडे, आश्विनी सागर भागवत, तांबे विशाल विलास यांचा समावेश राहिला आहे. कमी मताधिक्याने का होईना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना येथे विज खेचून आणता आला होता.
पुणे महापालिकेतील प्रभाग क्र. 39 मध्ये खरी लढत झाली ती भाजपा, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारामध्ये खरी लढत झाली होती. 2 वार्डामध्ये अपक्षांनी नशीब आजमावले होते. मात्र, येथेही त्यांना अपयशालाच सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाच्या उमेदवाराच्या मतामध्ये एवढा फरक राहिलेला नव्हता. पण काही मतांच्या अंतराने का होईना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला या ठिकाणी यश मिळाले होते.
प्रभाग क्रमांक 39 अ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बाळाभाऊ धनकवडे यांना सर्वाधिक 16 हजार 99 मते मिळाली तर भाजपाचे तपकिर अभिषेक यांना 8 हजार 762 एवढी मते मिळाली. ‘ब’ मध्ये राष्ट्रवादीच्या आश्विनी सागर भागवत यांना 11 हजार 451 मते तर भाजपाच्या मोहिनी देवकर यांना 11 हजार 46 मते मिळाली होती. ‘क’ मध्ये भाजपाच्या वर्षा तापकिर यांना 12 हजार 135 तर राष्ट्रवादीचे श्रध्दा परांडे यांना 10 हजार 486 मते मिळाली होती. व ‘ड’ राष्ट्रवादीचे विशाल तांबे यांना 11 हजार 621 व भाजपाचे गणेश भिंताडे यांना 10 हजार 308 असे मतं होती.
बटाणे अनिल भीमाशंकर (शिवसेना)
धनकवडे बाळाभाऊ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
सुतार ऋषी अनंता (मनसे)
तापकीर अभिषेक अर्जून (भाजपा)
उमेदवार | पक्ष | विजयी/ आघाडी |
---|---|---|
धनकवडे बाळाभाऊ | राष्ट्रवादी | विजयी उमेदवार |
बटाणे अनिल भीमाशंकर | शिवसेना | |
सुतार ऋषी अनंता | मनसे | |
तापकीर अभिषेक अर्जून | भाजपा | |
आश्विनी सागर भागवत (कॉंग्रेस)
देवकर मोहिनी राजेंद्रकुमार (भाजपा)
परदेशी किरण पांडूरंग (अपक्ष)
पवार निकिता संजय (शिवसेना)
उमेदवार | पक्ष | विजयी/आघाडी |
---|---|---|
आश्विनी सागर भागवत | राष्ट्रवादी | विजयी |
देवकर मोहिनी राजेंद्रकुमार | भाजपा | |
पवार निकिता संजय | शिवसेना | |
परदेशी किरण पांडूरंग | अपक्ष |
भोसले तेजश्री अनिल (शिवसेना)
चव्हाण सुवर्णा विकास (अपक्ष)
कोंडे ज्योती प्रवीण (मनसे)
परांडे श्रध्दा गोरक्ष (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
तापकिर वर्षा विलास (भाजपा)
उमेदवार | पक्ष | विजयी / आघाडी |
---|---|---|
तापकिर वर्षा विलास | भाजपा | विजयी |
परांडे श्रध्दा गोरक्ष | राष्ट्रवादी | |
कोंडे ज्योती प्रवीण | मनसे | |
भोसले तेजश्री अनिल | शिवसेना |
आंदोली नरसिंगरावर लिंगय्या (अपक्ष)
भिंताडे गणेश उत्तम (भाजपा)
गोगावले चंद्रकांत शिवाजी (मनसे)
खेडेकर सुनिल पांडूरंग (शिवसेना)
तांबे विशाल विलास (राष्ट्रवादी कॉग्रेस)
उमेदवार | पक्ष | विजयी / आघाडी |
---|---|---|
तांबे विशाल विलास | राष्ट्रवादी | विजयी |
खेडेकर सुनिल पांडूरंग | शिवसेना | |
गोगावले चंद्रकांत शिवाजी | मनसे | |
भिंताडे गणेश उत्तम | भाजपा | |
आंदोली नरसिंगरावर लिंगय्या | अपक्ष |
प्रभाग क्र 39 हा महर्षी नगरातील मार्केट यार्ड चा परिसर आहे. यामध्ये डीएसके, चंद्रदीप, टी.एम.बी. कॉलनी, पारसनीस कॉलनी, आंबेडकर नगर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पंचदीप कॉलनी, कुमार सिध्दवाला सोसायटी, वेगा सेंटर स्वारगेट, आयकर कार्यालय, मुकूंद नगर, कुमार पुरम, झांबरे पॅलेस. गुलटेकडी, इंदिरानगर, प्रेमनगर, हमाल नगर, कटारिया हायस्कूल या भागाचा समावेश होतो.