PMC election 2022 : प्रभाग क्रमांक 40 मनसेच्या वसंत मोरेंचे अस्तित्व राहणार का कायम, उर्वरीत वार्डात कुणाचा झेंडा?
प्रभाग क्र. 40 मध्ये लक्षवेधी निवडणुक ठरली ती मनसेचे वसंत मोरे आणि अभिजीत माधवराव कदम यांच्यामध्ये. या दोन पक्षात रस्सीखेच झाली असली तरी राष्ट्रवादीचे बेलदरे शंकराव विठ्ठल यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. बेलदरे यांना 8 हजार 226 मते मिळाली असली तरी याच मतामुळे वसंत मोरे यांना फायदा झाला होता.
पुणे : पुणे महापालिकेच्या (Reservation) आरक्षण सोडतीनंतर आता महापालिका निवडणुकांचे वारे जरा अधिक वेगाने वाहू लागले आहे. गत निवडणुकीपासून या पालिकेच्या निवडणुकीचे चित्र बदलले आहे. (Pune Corporation) पुणे पालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता असून बिबेवाडी गंगाधाम या भागातील 40 नंबर प्रभागात मनसेचे वसंत मोरे हे विजयी झाले होते. इतर तीन वार्डामध्ये मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला दबदबा कायम ठेवला होता. तर भाजपाला या प्रभागात खातेही उघडता आले नव्हते. गेल्या पाच वर्षात (Maharashtra) राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलाचे काय परिणाम यंदा स्थानिक पातळीवर होणार हे पहावे लागणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना या प्रमुख पक्षातच खरी लढत असून यंदा काय होणार हे पहावे लागणार आहे.
283 मतांनी मनसेचे मोरे विजयी
प्रभाग क्र. 40 मध्ये लक्षवेधी निवडणुक ठरली ती मनसेचे वसंत मोरे आणि अभिजीत माधवराव कदम यांच्यामध्ये. या दोन पक्षात रस्सीखेच झाली असली तरी राष्ट्रवादीचे बेलदरे शंकराव विठ्ठल यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. बेलदरे यांना 8 हजार 226 मते मिळाली असली तरी याच मतामुळे वसंत मोरे यांना फायदा झाला होता. आता गेल्या 5 वर्षात येथील स्थानिक प्रश्न, वसंत मोरेंचे झोकामध्ये येणे अशा गोष्टींमुळे यंदा नेमकं काय चित्र राहणार हे पहावेा लागणार आहे.
प्रभाग क्र. 40 अ मधील उमेदवार
बेलदरे अमित बबन (मनसे)
बेलदरे संदीप बाळासाहेब (भाजपा)
बेलदरे युवराज संभाजी (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
अॅड. राजेंद्र शिवाजीराव धोंडे (शिवसेना)
जाधव निखिल अशोक (बहुजन मुक्ती पार्टी)
कांबळ प्रदीप शंकर (अपक्ष)
उमेदवार | पक्ष | विजयी/ आघाडी |
---|---|---|
बेलदरे युवराज संभाजी | राष्ट्रवादी | विजयी |
अॅड. राजेंद्र शिवाजीराव धोंडे | शिवसेना | |
बेलदरे संदीप बाळासाहेब | भाजपा | |
बेलदरे अमित बबन | मनसे | |
कांबळे प्रदीप शंकर | अपक्ष |
प्रभाग क्र. 40 ब मधील उमेदवार
बाबर अमृता अजित (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
जाधव स्वप्नाली महेश (भाजपा)
काकडे दिपाली अमोल (मनसे)
कांबळे प्रभा (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टाी)
अर्चना शहा (अपक्ष)
सोकांडे मंगल अरुण (शिवसेना)
उमेदवार | पक्ष | विजयी/ आघाडी |
---|---|---|
जाधव स्वप्नाली महेश | भाजपा | विजयी |
बाबर अमृता अजित | राष्ट्रवादी | |
काकडे दिपाली अमोल | मनसे | |
कांबळे प्रभा | बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी | |
सोकांडे मंगल अरुण | शिवसेना | |
अर्चना शहा | अपक्ष |
प्रभाग क्र. 40 क मधील उमेदवार
कोंढरे स्मिता सुधीर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
सुनिता लिपाणे राजवाडे (भाजपा)
फाटे सारिका विकास (मनसे)
थोरवे कल्पना संभाजी (शिवसेना)
उमेदवार | पक्ष | विजयी/आघाडी |
---|---|---|
कोंढरे स्मिता सुधीर | राष्ट्रवादी कॉंग्रेस | विजयी |
सुनिता लिपाणे राजवाडे | भाजपा | |
फाटे सारिका विकास | मनसे | |
थोरवे कल्पना संभाजी | शिवसेना |
प्रभाग क्र. 40 ड मधील उमेदवार
बेलदरे शंकराव विठ्ठल (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
जगताप सुमंत दत्तु (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी)
अभिजीत माधवराव कदम (भाजपा)
कोंढरे धनराज दिनकर (शिवसेना)
मोरे वसंत कृष्णा (मनसे)
उमेदवार | पक्ष | विजयी/ आघाडी |
---|---|---|
मोरे वसंत कृष्णा | मनसे | विजयी |
अभिजीत माधवराव कदम | भाजपा | |
कोंढरे धनराज दिनकर | शिवसेना | |
बेलदरे शंकराव विठ्ठल | राष्ट्रवादी कॉंग्रेस | |
जगताप सुमंत दत्तु | बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी |
प्रभाग क्र 40 चे क्षेत्र
गंगाधाम, सॅसबरी पार्क, आनंद सोसायटी, रम्य नगरी सोसायटी, सिंहगड कॉलेज, मिरा सोसायटी, गुरुनानक नगर, वृंदावन सोसायटी, डायस प्लॉट, मंत्री इस्टेट, रायसोनी रेसिडन्सी, चंद्रनगरी सोसायटी, सिटी पार्क, हिमगिरी रेसिडेन्सी, बिबेवाडी, पितळेनगर, हाईड पार्क, विद्याननगर कॉलनी, गुरुगणेश सोसायटी, पार्श्वनाथ सोसायटी, कुबेर पार्क, सहानी सुजान पार्क, माऊंट कार्मल हायस्कूल, पारसी कॉलनी इ
लोकसंख्या
प्रभाग क्र. 40 मध्ये 62 हजार 740 एवढी मतदार असून अनुसूचित जातीचे 8 हजार 167 तर अनुसूचित जमातीचे 531 मते आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय चित्र राहणार हे पहावे लागणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=w8lpsOnoP4w