Video : ट्रॅफिक हटवण्यासाठी आमदारांना गाडीतून खाली उतरावं लागलं, व्हिडीओची सर्वत्र चर्चा
सणासुदीच्या काळात पुण्यात वाहतुक समस्या अधिक होते. तसेच लोकांनी त्यावर अधिक तक्रारी देखील केल्या आहेत. परंतु ठोस उपाय योजना जोपर्यंत होत नाहीत. तोपर्यंत पुण्यातलं ट्रॅफिक असचं राहिलं असं वाटतंय.

पुणे : पुणे नाशिक (Pune Nashik) महामार्गावरील वाहतुक कोंडीचा परिणाम राजगुरुनगर शहरातून जाणा-या भिमाशंकर (Bhimashankar) मार्गावर होतं आहे. त्याचबरोबर शाळकरी मुलांचा त्याच रस्त्याने वावर असल्याने दिवसभर वाहतूक कोंडी असते. या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी,कामगार वर्गासह आमदाराला ही सामना करावा लागत आहे. अशातच राजगुरुनगर शहरातल्या वाहतुकोंडीत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite-Patil) अडकले होते. वाहतुक कोंडी इतकी झाली होती, आमदारांना गाडीतून खाली उतरावं लागलं. आमदार तिथली वाहतुक व्यवस्था सुरळीत करीत असताचा व्हिडीओ सध्या चांगलाचं व्हायरल झाला आहे.
पुण्यात अधिक वाहतुक कोंडी समस्या असल्याची अनेकदा व्हि़डीओच्या माध्यमातून दिसून आलं आहे. परंतु आज चक्क आमदार तिथल्या ट्रॅफिकमध्ये अडकले. बराचवेळ झाल्यानंतर गाडी एकाच जागी असल्यामुळे आमदार गाडीतून उतरले. ज्यावेळी त्यांनी तिथलं ट्रॅफिक पाहिलं त्यावेळी त्यांनी वाहतुक कोंडी सोडवण्यास मदत केली. त्यावेळी घटनास्थळी त्यांच्यासोबत एक पोलिस आणि एक नागरिक दिसत आहे.
सणासुदीच्या काळात पुण्यात वाहतुक समस्या अधिक होते. तसेच लोकांनी त्यावर अधिक तक्रारी देखील केल्या आहेत. परंतु ठोस उपाय योजना जोपर्यंत होत नाहीत. तोपर्यंत पुण्यातलं ट्रॅफिक असचं राहिलं असं वाटतंय.


