पुण्यात राष्ट्रवादीने माध्यमांसमोर डमी राज्यपालांचं धोतर फेडलं, काळी टोपी जाळली; पुढे काय झालं? पाहा…

पुण्यात राष्ट्रवादीचं अनोखं आंदोलन.....

पुण्यात राष्ट्रवादीने माध्यमांसमोर डमी राज्यपालांचं धोतर फेडलं, काळी टोपी जाळली; पुढे काय झालं? पाहा...
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 12:41 PM

पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) केली आणि राज्यात एकच वादंग निर्माण झालेला पहायला मिळालं. “शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं आणि पुन्हा महाराष्ट्र राज्याचा रोष राज्यपालांनी ओढवून घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत असून पुण्यात राष्ट्रवादीने आक्रमक होत डमी राज्यपालांचे धोतर फेडण्याचे अनोखे आंदोलन करत राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आक्रमक होऊन राज्यभर आंदोलन करत आहे. आज पुण्यात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वारगेट येथील सावरकर पुतळ्याजवळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने डमी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आणत त्यांना उठाभाषा काढायला लावण्याबरोबरच त्यांचं धोतर फेडत अनोख्या पद्धतीने आंदोलन केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्हाला सांगायचे आहे की, हा महाराष्ट्र कालही छत्रपतींचा होता आजही छत्रपतींचा आहे आणि उद्याही छत्रपतींचा राहील. मात्र भाजपची लाचारी पत्करलेल्या मुख्यमंत्र्यांना सावरकरांचा अपमान दिसतो पण छत्रपतींच्या अपमानावर ते सोयीस्कर मौन बाळगून आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या शिवप्रेमींची तुम्ही परीक्षा बघू नका. राज्यपालांची जर पुढच्या दोन दिवसात बदली केली नाही तर या महाराष्ट्रातील शिवप्रेमी राज्यपाल जिथं दिसतील तिथे त्यांचं धोतर भेटतील. याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची राहील असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्
सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?.
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा.
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती.
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य.
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?.
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल.
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका.
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?.
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'.