30 तारखेपर्यंत भाजपमध्ये मोठे बदल होतील; चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत
Chandrashekhar Bawankule on BJP Change : भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता; चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत
पुणे : भाजपत अंतर्गत बदल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतेय. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुजोरा दिला आहे. भाजपत मोठे बदल होण्याचे संकेत बावनकुळे यांनी दिले आहेत. 30 तारखेपर्यंत पुणे भाजपमध्ये मोठे बदल होतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते.
जे पी नड्डा यांचे एकुण 13 कार्यक्रम राज्यात होत आहेत. आज ते पुण्यात आहेत. 3 वाजता या बैठकीला ते येतील. आज एक वर्गदेखील आम्ही घेणार आहोत. केंद्र सरकारच्या कामाचा एक महिना आम्ही घर घर चलो अभियान आम्ही राबवत आहोत. 9 वर्ष केंद्राने जे केलं ते आम्ही घेउन घरोघरी जात आहोत. राज्यभर 35 लाख कार्यकर्ते काम करतील, असं बावनकुळे म्हणालेत.
संजय राऊतांवर घणाघात
चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे. संजय राऊत यांना निवडणुकीत कळेल की जे पी नड्डा काय आणि कोण आहेत!, असं बावनकुळे म्हणालेत.
संजय राऊतला मुंबईत कुणी आलं की भीती असते की त्यांची सेना किंचित होइल. त्यांचे नेते भाजपत येतील ही त्यांची भीती वाटते. जे पी नड्डा सगळीकडे फिरत आहेत. तसंच ते पुण्यातही आले आहेत. संजय राऊत यांना मिर्ची यासाठी लागली असेल की आम्ही म्हणालो की मुंबई महापालिका निवडणूक आम्ही जिंकू. बघू कोण हारत कोण जिंकत घोडे मैदान लांब नाही. प्रभाग रचनेत त्यांच्या सरकारनं नियमांचं उल्लंघन केलं आहे, असंही ते म्हणालेत.
निवडणुक लागलीच नाही तर त्याचा विचार काय करायचा. 2024 मध्ये भाजप आणि शिवसेना पुण्यात एकत्र लढेल, असं म्हणत चंद्रसेखर बावनकुळे यांनी पुण्यातील लोकसभेच्या संभाव्य पोटनिवडणुकीवर भाष्य केलंय.
डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यावर आताच बोलणं योग्य नाही, असं ते म्हणाले.
राज्यात आलेले सरकारं नैसर्गिक आहे. 2019 मध्ये सगळे आमदार युती म्हणून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील हे त्या सगळ्यांनी मान्य केलं होतं. भाजप-सेना युतीच्या मतदानावर सगळे निवडून आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतावर हे निवडून आले नव्हते. त्यामुळे ही आमची नैसर्गिक युती आहे. आमचं सरकार हे जनतेच्या मनातील सरकार आहे, असं बावनकुळे म्हणालेत.