मनसेचे किती आमदार-खासदार? राज ठाकरे यांनी आमच्यावर टीका करू नये; नारायण राणे यांचं टीकास्त्र
Narayan Rane on Raj Thackeray : राज ठाकरे, मनसेचे आमदार-खासदार अन् टीका टिपण्णी; नारायण राणे यांचा थेट निशाणा
पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात बोलताना मनसे पक्ष आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांचे किती आमदार खासदार आहेत,त्यांनी आमच्यावर बोलू नये. त्यांना आमच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असं म्हणत नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. जे कोणी दंगल करेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं नारायण राणे म्हणालेत.
रोजगाराच्या मुद्द्यावरून ठाकरेंवर निशाणा
मोदी सरकार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सरकारी कार्यालय आणि सरकारी 10 लाख नोकरी दिल्या जाणार आहेत. सरकारने आतापर्यंत 3 लाख नोकऱ्या दिल्या आहेत. नको त्या ठिकाणी नको ते विषय नको. ज्या माणसानं अडीच वर्षात एकही नोकरी दिली नाही त्याची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करु नये, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरून पोपट हा शब्द चर्चेत आला आहे. त्यावर बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत याला काम धंदा नाही. शिवसेना पोपट मातोश्रीत होता तोवर ठीक होता. आता मुख्यमंत्री झाल्यावर लगेच यांना अस म्हणू नये. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये आहेत”, असं राणे म्हणालेत.
आपल्याला उद्योग कसे येतात माहिती आहे का? अनेक परदेशी उद्योग महाराष्ट्रात येतात. मग बारसूतील प्रकल्पाला विरोध का? ठाकरे ना विचारा… कोळसा प्रकल्प मालक उद्धव ठाकरे यांना भेटले त्यांना विचारा. बारसूला सुपारी घेऊन विरोध केला जातोय, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
विनायक राऊत यांना इंग्लिश अर्थ कळत नाही. आम्हाला नुसता प्रकल्प नको तर पूर्ण सुविधासह द्या आमची मागणी आहे. त्यांनी ते व्यवस्थित समजून घ्यावं, असंही ते म्हणालेत.