Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते, पण ते खोटं बोलतात; रोहित पवार यांचा थेट निशाणा

Rohit Pawar on Devendra Fadnavis : राज्यातल्या आरोग्य विभागात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. हाफकीन माणूस आहे की, कंपनी हे सुद्धा आपल्या आरोग्यमंत्र्यांना माहित नाही; रोहित पवार यांची शिंदे सरकारवर घणाघाती टीका. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा, वाचा...

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते, पण ते खोटं बोलतात; रोहित पवार यांचा थेट निशाणा
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 1:22 PM

अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 21 ऑक्टोबर 2023 :  राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे. कंत्राटी भरतीचा निर्णय शिंदे सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावर रोहित पवार बरसले. अजितदादा आमच्या सरकारच्या काळातही उपमुख्यमंत्री होते. दादा तिथं असते तर त्यांनी त्यांना लगेच सांगितलं असतं की देवेंद्र फडणवीस तुम्ही खोटं बोलत आहात. ते आमच्या नेत्यांना माफी मागयला लावत आहेत. देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते आहेत. पण ते आता खोटं जास्त बोलत आहेत, असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांच्या नेतृत्वात युवा संघर्ष यात्रा काढली जात आहे. त्यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं. युवा संघर्ष यात्रेला यश येताना दिसत आहे. सरकारने देखील याची दखल घेतली आहे. कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द केला आहे. पोलिसांकडून या यात्रेची माहिती घेण्यात आली आहे. म्हणूनच काल हा जीआर मागे घेतला. काल देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार तिथं नव्हते. नाहीतर अजित पवार यांनी तिथंच त्यांना उत्तर दिलं असतं, असं रोहित पवार म्हणालेत.

14 मार्च 2023 ला जीआर शिंदे सरकारने काढला होता. सगळे जीआर त्यांच्याच सरकारने काढले होते. शिंदे सरकार आणि भाजप खोटं बोलत आहेत. सगळे पद कंत्राट भारतीने भरण्याचा निर्णय त्यांच्या सरकारने घेतला होता. आम्ही काढेलला जीआर हा काही मर्यादित पदांसाठी होता. तुम्ही 2014 मध्ये सत्तेत आला तेव्हा रद्द का केला नाही? 1998 मध्ये पहिला जीआर निघाला तेव्हा राज्यात कुणाचं सरकार होतं? तुम्ही आमच्या मोठ्या नेत्यांना माफी मागायला सांगतात. तुम्ही1998 चा जीआर वाचा भाजपच्या लोकांनी आमच्या नेत्याची माफी मागावी. भाजपच्या नेत्यांनी माफी मागत नाक घासावं, अशी आक्रमक भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.

नव्या नोकरभरतीसाठी आदेश काढा. अडीच लाख पद रिक्त आहेत ती भरा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. सगळा महाराष्ट्र भिकारी झाला तरी मी होणार नाही, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले होते. एवढा अहंकार या मंत्र्यांना आहे, असा घणाघातही रोहित पवार यांनी केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.