पुणे : हुलग्याच्या वाफ्याने हुरळून जाणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेंद्र फडणवीस नाहीत. ते महाराष्ट्राच्या राजकारणातले नवे आर्य चाणक्य आहेत. बारामतीच्या घाशातून सत्ता त्यांनी काढून आणली आणि दाखवून दिलं की हे महाराष्ट्राच्या राजकारणातील जाणता राजा नाहीत. तर नेते राजे आहेत, असं म्हणत सदाभाऊ यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिलं आहे.
अजित पवार यांनी काल बोलताना विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद नको, असं म्हटलं त्याला सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिलं आहे. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कार्यकर्त्यांना खुश ठेण्यासाठी नेत्यांना असं बोलावं लागतं. असं बोललं की बातमी होते. गावात चर्चा सुरू होते. पक्षच त्यांची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी आहे, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. त्यात संधी मिळणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर मी गेली 32 वर्ष शेतकरी चळवळीत काम करत आहे. आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी लढतो. आमचा पिंड शेतकऱ्याचा आहे. आघाडी सरकारमध्ये देखील आम्ही आंदोलनं केली. आमदारकी येते जाते मंत्री पदापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्न मोठा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही भाजपासोबत आहोत, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
चांगलं दाखवतात आणि वाईट झाकून ठेवतात. ते जर शेतकऱ्यांच्या बाजून आहेत तर शेतकरी विध्येयकाला त्यांनी का विरोध केला हे सांगावं, असं त्यांनी म्हटलंय.
शिंदे-फडणवीस सरकारने एक वर्ष पूर्ण केलं आहे. आमची लढाई प्रस्तापित विरुद्ध विस्तपित आहे. जोपर्यंत आम्हाला घेऊन भाजप जाईल तोपर्यंत भाजपसोबत जाऊ, असं सदाभाऊ म्हणाले.
BRS पक्षाने राज्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. त्यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकारआहे. आले तरी काही फरक पडणार नाही. उद्या मी देखील तेलगणात जाऊन शेती बघेल. त्यांनां देखील आमचा ऊस द्राक्ष डाळिंब दाखवू, असं ते म्हणाले.