पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापनदिन कार्यक्रम मुंबईमधल्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यात बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक इच्छा बोलून दाखवली. मला विरोधी पक्षनेतेपदावर बसण्यात फार रस नव्हता. सर्व आमदारांनी सह्या केल्या आणिन त्यांच्या आग्रहाखातर मी विरोधी पक्षनेता झालो. एक वर्ष हे पद सांभाळतोय. पण आता मला या पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा आणि मला पक्ष संघटनेची जबाबदारी द्या. त्या पदाला न्याय द्यायचं काम करेन, असं अजित पवार म्हणाले. त्यावर आता राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजितदादाची इच्छा पूर्ण व्हावी, हीच माझीही इच्छा आहे. अजितदादाला संघटनात्मक पदावर संधी द्यायची की नाही संघटनात्मक निर्णय आहे, असं त्या म्हणल्या.
मला मनापासून आनंद हे की दादालाही संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे कार्यकर्ता केडरमध्ये उत्साह संचारलाय. दादाला प्रदेशाध्यक्षपद द्यायचं की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे दरवर्षी यशस्वीनी सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा पार पडतो आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. यंदा सोहळ्याला जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची देखील उपस्थितीत आहेत. यावेळी सुप्रिया सुळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस यांचा या सरकार मध्ये सातत्याने अपमान होतो आहे. सरकार कडून अपमान केला जातोय, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
गद्दार शब्द वापरला तर जेलमध्ये टाकू, असं म्हणत आहेत. गद्दार ही काही शिवी नाही. ते म्हणू शकतात, आम्ही नाही म्हणू शकत? आम्ही बोललो तर आम्हाला जेलमध्ये टाकणार, हे चुकीचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
पांडुरंग हा एकच देव आहे जो म्हणतो मला भेटायला यायची गरज नाही, मी तुम्हाला भेटायला येईन. पण वारकऱ्यांवर होणारा हल्ला असेल, महिलांवर होणारे अत्यावर असतील, या सगळ्या विरोधात लढायला हवं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.