वंचित बहुजन आघाडी भाजपसोबत जाणार? प्रकाश आंबेडकर यांनी दोन वाक्यात प्रश्न मिटवला…

Prakash Ambedkar On BJP Vanchit Aghadi : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतं आहे. यात ते इतर पक्षांना आपल्या सोबत घेताना दिसत आहेत. अशातच वंचित आणि भाजपची युती होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वंचित बहुजन आघाडी भाजपसोबत जाणार? प्रकाश आंबेडकर यांनी दोन वाक्यात प्रश्न मिटवला...
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 1:28 PM

पुणे | 17 जुलै 2023 : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे. अशात स्थानिक पक्षांना सोबत घेण्यावर भाजपचा जोर कायम दिसतो. अशात आता वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या तोंडावर भाजपसोबत जाणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

आधी एकनाथ शिंदे यांना भाजपने आपल्यासोबत घेतलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर आता अजित पवार भाजपसोबत गेले आहेत. त्यानंतर वंचित आणि भाजपची युती होणार का? हा प्रश्न चर्चेत आहे. अशात या सगळ्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तुम्ही भाजपसोबत जाणार का असा प्रश्न विचारला असता, वंचित बहुजन आघाडी भाजपबरोबर जाणार नाही. भविष्यात पुढे कोणाबरोबर जाऊ माहिती नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

भीमा कोरेगाव चौकशी आयोग, जुनी जिल्हापरिषद इमारतीमध्ये साक्ष नोंदवली जात आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील चौकशी आयोगात साक्ष नोंदवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आले आहेत. आज त्यांची चौकशी झाली. यावेळी तत्कालीन पोलीस अधिकारी सुवेज हक हे देखील उपस्थित होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासोबत एक चर्चा झाली. याबाबत कारवाई सुरू आहे. मी काही मुद्दे उपस्थिती केले आहेत. तसंच या मुद्द्यांची चौकशी करायला सांगितली आहे. कोर्टाने लेखी प्रतिज्ञापत्र स्वरूपात सादर करावं असं सांगितलं आहे. 24 तारखेला मी प्रतिज्ञापत्र सादर करेल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. या सरकारला शेतकऱ्यांचं काही देणं-घेणं नाही. काल झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वात शेवटी होते. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. याची माहिती या सरकारला आहे का? हे केवळ खिशे भरू सरकार आहे, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या बंडावरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं. दरवर्षी दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्र असतं. त्याचा धागा धरत आंबेडकरांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. यंदा अजित पवारांना दिवाळी एकट्याला साजरी करावी लागेल असं वाटतंय. पुढच्या वर्षी तरी कुटुंबासोबत दिवाळी करतील, अशी आहे, असं ते म्हणालेत.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.