Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना ओपन चॅलेंज, म्हणाले ‘हे’ करून दाखवाच!

Sanjay Raut on Devendra Fadnavis : आंबेडकर यांच्याबाबत प्रश्न विचारताच, संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना ओपन चॅलेंज

संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना ओपन चॅलेंज, म्हणाले 'हे' करून दाखवाच!
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 11:53 AM

पुणे : काही दिवसांआधी वंचितचे नेते, प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर जात माथा टेकला. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना याविषयी विचारण्यात आला. तेव्हा संजय राऊत यांनी राज्याचे देवेंद्र फडणवीस यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही राऊतांनी टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या औरंगजेबाच्या मुद्द्यावर आमची भूमिका स्पष्टच आहे. पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडावी. हिंदुत्वाच्या गोष्टी करता ना… मग स्पष्ट करा की तुमची भूमिका काय आहे. इतर लोक गेले होते तेव्हा फडणवीस यांनी किती मोठा फना काढला होता. मग आता का वेटोळं घालून बसलेत. त्यांना बोलता येत नाही का? राज्यकर्ते आहेत ना… मग बोला. फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना म्हणावं आंबेडकरांवर बोला, असं संजय राऊत म्हणालेत.

मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलंय. मणिपूरविषयी पंतप्रधान कधीच बोलणार नाहीत. त्यांच्या हातून मणिपूर गेलेलं आहे. मणिपूरमध्ये त्यांना हिंदू-मुस्लिम वाद करता येत नाही. ते करता आलं असतं तर पंतप्रधान बोलले असते, असं संजय राऊत म्हणालेत.

देशात हुकूमशाही आहे. आज भाडोत्री सैन्य काम करत आहे. शिंदेचे सैन्य हे भाडोत्री सैन्य आहेत. बाजार बुनग्यासोबत सरकार करत आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

या देशात मी म्हणजे सर्वस्व आहे. मी म्हणजे मालक आहे हे कधीच चाललं नाही. कुणीही मालक होऊ शकत नाही, असं म्हणत संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

आपण परत पराभूत होणार, असं म्हणत राऊतांनी शंभूराज देसाईवर टीका केलीय. आम्ही निवडणुका घ्या असं आव्हान देत आहोत. निवडणुका घ्या लोकांच्या भावना समजून घ्या, मात्र सरकार घाबरत आहे, असं म्हणत त्यांनी निवडणुकांच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत सध्या कराडच्या प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केलं.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.