Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांचे दावे फेटाळले; पहाटेच्या शपथविधीवर स्पष्टच बोलल्या…

Supriya Sule on Chhagan Bhujbal Statement : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची काल टीव्ही 9 मराठीवर मुलाखत झाली. यात त्यांनी मोठे दावे केले. हे दावे सुप्रिया सुळे फेटाळले आहेत. पहाटेच्या शपथविधीवर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या. त्या नेमकं काय म्हणाल्यात पाहा...

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांचे दावे फेटाळले; पहाटेच्या शपथविधीवर स्पष्टच बोलल्या...
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 10:53 AM

पुणे | 12 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची काल टीव्ही 9 मराठीवर मुलाखत प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत त्यांनी शरद पवार यांची भूमिका आणि राष्ट्रवादी पक्षाबाबत मोठे खुलासे केले. या वक्तव्यांबाबत आता सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे. छगन भुजबळ यांनी पहाटेचा शपथविधी आणि आता झालेला 2 जूनचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून घेतलेले आहेत. हे छगन भुजबळ यांनी स्वत:च कबूल केलं आहे. शरद पवारसाहेबांना अंधारात शपथ घेतली गेली. हे कालच्या मुलाखतीतून समोर आलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

छगन भुजबळ यांची टीव्ही 9 मराठीवर काल मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी 2019 आणि 2023 च्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर भाष्य केलंय.  2019 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. मंत्रिपदापासून खाते वाटपापर्यंतची सगळ्यावर बोलणी झाली होती. शिवसेनेला वगळून सरकार बनवण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी भाजपने शरद पवार यांना विचारलं आमच्यासोबत नक्की राहणार का? तेव्हा शरद पवार यांनी त्यांनी होकार दिला होता. पण नंतर पवारांनी माघार घेतली. पण अजितदादांनी शब्द दिला होता. त्यांनी तो शब्द पाळला. म्हणून ते भाजपसोबत गेले. त्यांनी पहाटेची शपथ घेतली, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. काल टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत.

छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत शरद पवार यांच्या राजकीय निर्णयांवर भाष्य केलं. यात त्यांनी वारंवार शरद पवार आणि भाजपची एकत्र येण्याची चर्चा झाली. मात्र नंतर शरद पवार यांनी माघार घेतली, असं भुजबळ म्हणाले. त्यावर विचारधारा वगैरे काही असतं की नाही? आम्ही पॉलिसी मेकर आहोत. आम्ही जनतेसाठी काम करतो. शरद पवार साहेबांनी त्यांच्या विचारधारेला कधीही सोडलं नाही. काँग्रेसचा विचार सोडणार नसल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी छगन भुजबळांचे सगळे दावे फेटाळले आहेत. आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही. काँग्रेसच्या विचारधारेशी प्रतारणा करणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.