रविकांत तुपकर यांना ‘स्वाभिमानी’चा अल्टिमेटम; म्हणाले, 15 ऑगस्टपर्यंत…

Swabhimani Shetkari Sanghatana News : तुमची बाजू मांडा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रविकांत तुपकर अल्टिमेटम!

रविकांत तुपकर यांना 'स्वाभिमानी'चा अल्टिमेटम; म्हणाले, 15 ऑगस्टपर्यंत...
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 3:37 PM

पुणे | 08 ऑगस्ट 2023 : मागच्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या रविकांत तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अल्टिमेटम दिला आहे. 15 ऑगस्टपर्यंत रविकांत तुपकर यांनी आपली बाजू मांडावी, अशा सुचना स्वाभिमानी संघटनेनं रविकांत तुपकर यांना दिल्या आहेत. आज पुण्यात स्वाभिमानीच्या बैठकीनंतर राजू शेट्टी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

15 ऑगस्टपर्यंत रविकांत तुपकर यांना समिती वेळ देत आहे. त्यांनी आपल म्हणणं समितीसमोर नोंदवावं म्हणजे समितीला निर्णय घेता येईल. तुपकर यांनी संघटनेसोबतच राहावं. 15 तारखेपर्यंत तुपकर आले नाहीत. तर समिती पुढचा निर्णय घेईल, असं स्वाभिमानी संघटनेच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जालिंदर पाटील यांनी म्हटलं आहे.

रविकांत तुपकर यांनी आरोप केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीची आज पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीचं तुपकर यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. पण ते या बैठकीला गैरहजर राहिले. तुपकरांनी केलेल्या आरोपांवर बैठकीत चर्चा केली गेली. या बैठकीनंतर स्वाभिमानी संघटनेच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जालिंदर पाटील आणि राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी संघटनेची भूमिका जाहीर केली आहे.

रविकांत तुपकर यांनी आमच्या नेत्यावर आरोप केले आहेत. तो सगळा वाद केवळ बुलढाण्यातला आहे. आज राज्यातले सगळे संघटनेचे प्रमुख नेते इथं आहेत. या सगळ्या नेत्यांनी शेट्टीसाहेबांनी विचारलं की, तुपकर यांनी केलेल्या आरोपांवर तुमच काय म्हणणं आहे?, असं जालिंदर पाटील यांनी सांगितलं.

एक तास त्यांनी स्पष्टीकरण दिलं. रविकांत तुपकर आले असते तर समोरा सामोर चर्चा केली असती. पण ते आले नाहीत, असं जालिंदर पाटील यांनी सांगितलं.

राजू शेट्टी यांनीही या बैठकीतील मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रविकांत तुपकर यांनी वेगळी भुमिका मांडायला सुरूवात केली आहे. आमच्या शेतकरी चळवळीसाठी ती हानीकारक बाब होती. म्हणून आज तातडीची बैठक बोलावली होती. त्यांना देखिल आमंत्रण पाठवलं होतं. त्यांनी आज या बैठकीला येणं अपेक्षित होतं. पण ते आले नाहीत मी आजच्या बैठकीत सगळे खुलासे केले आहेत, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

रोख माझ्यावर होता. त्यामुळे हे लोकं निर्णय घेताना मी निर्णय प्रक्रियेत सहभागी होणार नाही. एक समिती आम्ही स्वाभिमानमध्ये नेमली आहे. पाच जणांची समिती नेमली आहे. समितीने दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं आहे, समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असंही राजू शेट्टी म्हणाले.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.